एक्स्प्लोर

गुडन्यूज! पुणे, पिंपरी चिंचवडमध्ये स्वस्तात घर; म्हाडाच्या 4186 सदनिकांसाठी अर्ज करण्यास मुदतवाढ

सुधारित वेळापत्रकानुसार पुणे मंडळातर्फे सदनिका वितरणासाठी  प्राप्त अर्जांची संगणकीय सोडत आता दि. ११ डिसेंबर, २०२५ रोजी दुपारी १२.०० वाजता काढण्यात येणार आहे

मुंबई :  पुणे गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळातर्फे (म्हाडाचा घटक) पुणे, पिंपरी-चिंचवड व पीएमआरडीएसह सोलापूर, कोल्हापूर व सांगली जिल्ह्यातील विविध गृहनिर्माण योजनेतील ४,१८६ सदनिकांच्या विक्रीकरिता आयोजित संगणकीय सोडतीसाठी अर्ज सादर करण्यासाठी दि. २० नोव्हेंबर, २०२५ रोजी रात्री ११.५९ वाजेपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. त्यामुळे, इच्छुकांना घर (Home) खरेदीसाठी आणखी एक संधी मिळणार आहे. 

सुधारित वेळापत्रकानुसार पुणे मंडळातर्फे सदनिका वितरणासाठी  प्राप्त अर्जांची संगणकीय सोडत आता दि. ११ डिसेंबर, २०२५ रोजी दुपारी १२.०० वाजता काढण्यात येणार आहे. २० नोव्हेंबर, २०२५ रोजी रात्री ११.५९ वाजेपर्यंत अर्जदार ऑनलाइन अनामत रकमेचा भरणा करू शकणार आहेत. दिनांक २१ नोव्हेंबर, २०२५ रोजी संबंधित बँकेच्या कार्यालयीन वेळेपर्यंत RTGS/NEFT द्वारे अनामत रकमेचा भरणा अर्जदारांना करता येईल. पुणे मंडळातर्फे जाहीर करण्यात आलेली सोडत चार घटकांमध्ये विभागण्यात आली असून यामध्ये म्हाडा गृहनिर्माण योजनेतील प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य या योजनेअंतर्गत १६८३ सदनिका, प्रधानमंत्री आवास योजना (शहरी) अंतर्गत प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य या योजनेअंतर्गत २९९ सदनिका, १५ टक्के सर्वसमावेशक गृहनिर्माण योजनेअंतर्गत पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण हद्दीतील ८६४ सदनिका, २० टक्के सर्वसमावेशक गृहनिर्माण योजनेअंतर्गत पुणे महानगरपालिका, चिंचवड महानगरपालिका, पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण हद्दीतील एकूण ३२२२ सदनिकांचा समावेश आहे. 

घरासाठी येथे करा अर्ज

मंडळाचे  मुख्य अधिकारी राहुल साकोरे यांनी संगितले की,  कागदपत्रांची पूर्तता करण्यासाठी व इतर कारणास्तव अर्ज करण्यासाठी मुदतवाढ मिळण्याविषयी नागरिकांकडून सातत्याने मागणी करण्यात आली. यामुळे सदरची मुदतवाढ देण्यात आली आहे. प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य तत्वावरील योजनांच्या सदनिकांसाठी https://lottery.mhada.gov.in व  bookmyhome.mhada.gov.in या संकेतस्थळावर नोंदणी करावी. अर्ज नोंदणी व अर्ज भरणा प्रक्रियेकरिता मार्गदर्शन करणारी माहिती पुस्तिका https://housing.mhada.gov.in या म्हाडाच्या अधिकृत संकेतस्थळावर अर्जदारांच्या सोयीसाठी उपलब्ध करण्यात आली आहे.   अर्ज प्रक्रियेबाबत मदतीसाठी ०२२-६९४६८१०० या हेल्पलाइन क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन श्री. साकोरे यांनी केले आहे. सदनिकांच्या वितरणासाठी म्हाडाने कोणालाही प्रतिनिधी, सल्लागार व प्रॉपर्टी एजंट म्हणून नेमलेले नाही. अर्जदाराने कोणत्याही अशा व्यक्तीशी परस्पर व्यवहार करू नये तसे केल्यास पुणे मंडळ कोणत्याही व्यवहारास / फसवणूकीस जबाबदार राहणार नाही.

हेही वाचा

जाऊ दे रे गाडी... मुंबईकरांच्या सेवेत 150 बेस्ट बस; 21 मार्गावर धावणार लाल परी, 1.9 लाख प्रवाशांना सवारी

Covers Business, Environment and climate change, Health, Science & tech and Policies! Believes in strength of quill!
Read
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

 ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 8 नोव्हेंबर 2025 | शनिवार 
 ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 8 नोव्हेंबर 2025 | शनिवार 
Elon Musk Pay Package: एलाॅन मस्कना टेस्लानं दिलेला पगार किती ट्रिलीयन डाॅलर? तेवढ्यात स्वित्झर्लंड, सिंगापूर, इस्त्रायलसारखं किती देश खरेदी होतील??
एलाॅन मस्कना टेस्लानं दिलेला पगार किती ट्रिलीयन डाॅलर? तेवढ्यात स्वित्झर्लंड, सिंगापूर, इस्त्रायलसारखं किती देश खरेदी होतील??
Samantha Ruth Prabhu: समंथाला अखेर 'तो' मिळाला! म्हणाली, 'गेल्या दीड वर्षात मी माझ्या करिअरमध्ये काही धाडसी पावलं उचलली, ही फक्त सुरुवात आहे'
समंथाला अखेर 'तो' मिळाला! म्हणाली, 'गेल्या दीड वर्षात मी माझ्या करिअरमध्ये काही धाडसी पावलं उचलली, ही फक्त सुरुवात आहे'
लोकलच्या मोटरमनला लॉबीतच अडवले; प्रवाशांना वेठीस धरणाऱ्या रेल्वे कर्मचारी संघटनांची सीसीटीव्हीतून पोल खोल
लोकलच्या मोटरमनला लॉबीतच अडवले; प्रवाशांना वेठीस धरणाऱ्या रेल्वे कर्मचारी संघटनांची सीसीटीव्हीतून पोल खोल
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Sharad Pawar  : पार्थ पवार प्रकरणात फडणवीसांनी  चौकशी करून वास्तव समोर आणावं
Pune Land Scam: पार्थ पवार जमीन प्रकरणातील शीतल तेजवानीने देश सोडला
Mahapalikecha Mahasangram Sangli : 2 वर्ष रखडलेली निवडणूक,सांगलीकर त्रस्त;पालिकेचं समीकरण बदलणार?
Manoj Jarange Vs Dhananjay Munde : धनंजय मुंडेंचं आव्हान स्वीकारलं, जरांगे नार्को टेस्टसाठी तयार
Manoj Jarange Patil : 'दहा तारखेला हजर रहा!', मनोज जरांगे पाटलांना Mumbai Police चे समन्स

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
 ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 8 नोव्हेंबर 2025 | शनिवार 
 ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 8 नोव्हेंबर 2025 | शनिवार 
Elon Musk Pay Package: एलाॅन मस्कना टेस्लानं दिलेला पगार किती ट्रिलीयन डाॅलर? तेवढ्यात स्वित्झर्लंड, सिंगापूर, इस्त्रायलसारखं किती देश खरेदी होतील??
एलाॅन मस्कना टेस्लानं दिलेला पगार किती ट्रिलीयन डाॅलर? तेवढ्यात स्वित्झर्लंड, सिंगापूर, इस्त्रायलसारखं किती देश खरेदी होतील??
Samantha Ruth Prabhu: समंथाला अखेर 'तो' मिळाला! म्हणाली, 'गेल्या दीड वर्षात मी माझ्या करिअरमध्ये काही धाडसी पावलं उचलली, ही फक्त सुरुवात आहे'
समंथाला अखेर 'तो' मिळाला! म्हणाली, 'गेल्या दीड वर्षात मी माझ्या करिअरमध्ये काही धाडसी पावलं उचलली, ही फक्त सुरुवात आहे'
लोकलच्या मोटरमनला लॉबीतच अडवले; प्रवाशांना वेठीस धरणाऱ्या रेल्वे कर्मचारी संघटनांची सीसीटीव्हीतून पोल खोल
लोकलच्या मोटरमनला लॉबीतच अडवले; प्रवाशांना वेठीस धरणाऱ्या रेल्वे कर्मचारी संघटनांची सीसीटीव्हीतून पोल खोल
SIP Calculator : 10000 रुपयांच्या दरमहा गुंतवणुकीनं 20 वर्षात किती रुपयांचा फंड तयार होईल? जाणून घ्या समीकरण
10000 रुपयांच्या दरमहा गुंतवणुकीनं 20 वर्षात किती रुपयांचा फंड तयार होईल? जाणून घ्या समीकरण
Parth Pawar: पुण्यातील जमीन व्यवहार रद्द करण्यासाठी कायदा काय सांगतो? 21 नाही 42 कोटी भरावे लागणार
पुण्यातील जमीन व्यवहार रद्द करण्यासाठी कायदा काय सांगतो? 21 नाही 42 कोटी भरावे लागणार
मोठी बातमी! मनोज जरांगेंना मुंबई पोलिसांचं समन्स; मुंडेंसोबत वाद सुरू असतानाच चौकशीसाठी मुंबईत बोलावलं, प्रकरण काय?
मोठी बातमी! मनोज जरांगेंना मुंबई पोलिसांचं समन्स; मुंडेंसोबत वाद सुरू असतानाच चौकशीसाठी मुंबईत बोलावलं, प्रकरण काय?
हैदराबाद ते अमेरिकेत राज्यपाल! जोहरान ममदानींची जगभर चर्चा, पण गझला हाश्मींनी सुद्धा व्हर्जिनियाच्या लेफ्टनंट गव्हर्नर होत इतिहास रचला!
हैदराबाद ते अमेरिकेत राज्यपाल! जोहरान ममदानींची जगभर चर्चा, पण गझला हाश्मींनी सुद्धा व्हर्जिनियाच्या लेफ्टनंट गव्हर्नर होत इतिहास रचला!
Embed widget