एक्स्प्लोर
BEST Fleet: '...आधीच्या सरकारने Best ला West केले', DCM Eknath Shinde यांचा मागील सरकारवर निशाणा
बृहन्मुंबई विद्युत पुरवठा आणि परिवहन (BEST) उपक्रमाच्या ताफ्यात १५७ नव्या इलेक्ट्रिक वातानुकूलित बसेस दाखल झाल्या आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (CM Devendra Fadnavis), उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (DCM Eknath Shinde) आणि उपमुख्यमंत्री अजित पवार (DCM Ajit Pawar) यांच्या उपस्थितीत कुलाबा बस आगारात हा लोकार्पण सोहळा पार पडला. ‘आधीच्या सरकारने बेस्टला वेस्ट केले’, असा थेट आरोप उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबईची सार्वजनिक वाहतूक प्रदूषणमुक्त करण्यावर भर दिला आणि टप्प्याटप्प्याने ५,००० ई-बस दाखल करण्याचे उद्दिष्ट जाहीर केले. या बसेस 'वेट लीज' मॉडेलवर चालवल्या जाणार असून, यामुळे शहरातील प्रदूषण कमी होण्यास मदत होईल. या नवीन बसेसमुळे दररोज सुमारे १.९ लाख प्रवाशांना आरामदायी प्रवास करता येणार आहे. या बसेस महत्त्वाच्या रेल्वे आणि मेट्रो स्थानकांना जोडणार असल्याने 'लास्ट माईल कनेक्टिव्हिटी' सुधारण्यास मदत होईल. यावेळी मुख्यमंत्र्यांनी बेस्टला केवळ तिकीट दरावर अवलंबून न राहता उत्पन्नाचे इतर स्रोत शोधण्याचे निर्देशही दिले.
आणखी पाहा
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
राजकारण
महाराष्ट्र
महाराष्ट्र
Advertisement
Advertisement

















