Director Taunt Kareena Kapoor: 21 कोटींचं मानधन घेते, तरीसुद्धा सिक्योरिटी अन् फुल-टाईम ड्रायव्हर अफॉर्ड करु शकत नाही; दिग्गज दिग्दर्शकाचा करिनाला सणसणीत टोला
Director Taunt Kareena Kapoor: दिग्दर्शक आकाशदीप साबीर यांनी पुढे बोलताना करिना कपूर-खानला सणसणीत टोला हाणला. ते म्हणाले की, तिला हिरोपेक्षा कामी मानधन मिळतं, त्यामुळेच ती फुल-टाईम वॉचमन ठेवण्याचा खर्च उचलू शकत नाही.

Director Taunt Kareena Kapoor: बॉलिवूड स्टार सैफ अली खानवर (Saif Ali Khan) त्याच्याच घरात घुसून चोरट्यानं केलेल्या हल्ल्यामुळे संपूर्ण इंडस्ट्री (Bollywood Indusriy) हादरली आहे. सैफच्या घरात चोरटा घुसूच कसा शकतो? असा प्रश्न अनेकांना पडला. चोरटा घरात घुसेपर्यंत सिक्युरिटी काय करत होते? सैफ-करिनाच्या घराबाहेर सीसीटीव्ही नाही? यांसारखे अनेक प्रश्न उपस्थित करण्यात येत आहेत. दरम्यान, सैफ अली खानवर झालेल्या चाकू हल्ल्यानंतर दिग्दर्शक आकाशदीप साबीर (Akashdeep Sabir) यांनी करीना कपूर-खानवर (Kareena Kapoor Khan) टीका केली. त्यांनी चित्रपटांमधील हिरो आणि हिरोईनच्या मानधनात असलेल्या तफावीबाबत थेट मत व्यक्त केलं आहे. ते म्हणाले की, 'पुष्पा 2' च्या यशाचं श्रेय अल्लू अर्जुनच्या लोकप्रियतेला जातं, त्यामुळेच अभिनेत्याला रश्मिका मंदानापेक्षा जास्त मानधन मिळालं.
दिग्दर्शक आकाशदीप साबीर यांनी पुढे बोलताना करिना कपूर-खानला सणसणीत टोला हाणला. ते म्हणाले की, तिला हिरोपेक्षा कामी मानधन मिळतं, त्यामुळेच ती फुल-टाईम वॉचमन ठेवण्याचा खर्च उचलू शकत नाही. Lehren Retro ला दिलेल्या मुलाखतीत बोलताना आकाशदीप म्हणाले की, करिना 21 कोटींचं मानधन घेते आणि आपल्या घराबाहेर सिक्युरिटीदेखील ठेवू शकली नाही. जेव्हा तुम्ही तिला 100 कोटींची फी द्याल, त्यावेळी कदाचित ती सिक्युरिटी आणि फुल-टाईम गॉर्ड ठेवू शकेल.
सैफ-करिनाला केला सपोर्ट
दिग्दर्शकानं बोलताना सांगितलं की, तो करीना कपूरला बऱ्याच काळापासून ओळखतो. तो म्हणाला, "जेव्हा मी करीनाला भेटलो तेव्हा ती लहान होती. मी सैफ आणि करीनाला पाठिंबा देण्यासाठी टीव्हीवर एक डिबेट केली आहे. मी करिश्माला डिरेक्ट आणि प्रोड्युस केलंय, त्यावेळी करिश्मा कपूरने सहारामध्ये पदार्पण केलं होतं. त्यावेळी करीना अभिनेत्री नव्हती, ती एक लहान मुलगी होती."
सैफवरील हल्ल्याबाबत काय म्हणाला दिग्दर्शक?
दिग्दर्शक आकाशदीप म्हणाला की, बॉलिवूडच्या टॉप कपल्सपैकी एक म्हणजे,सैफ-करिना. पण, त्यांच्याबाजून ज्यावेळी मीडिबेटमध्ये सहभागी झालेलो, त्यावेळी माझ्याकडे दोन प्रश्नांची उत्तरं नव्हती. मला डिबेटमध्ये विचारलं की, घराबाहेर सिक्युरिटी का नव्हती? सीसीटीव्ही कॅमेरे का नव्हते? पण, सीसीटीव्ही कॅमेरे कसे काय चोरट्याला रोखू शकले असते? ते चोराला अडवणार नाही, पण ते गुन्ह्याची उकल करण्यासाठी मदत करतील. दुसरा प्रश्न होता की, त्यांच्याकडे एक फुल टाईम ड्रायव्हर का नव्हता?
दिग्दर्शकाची पत्नी शीबा म्हणाली की, मुंबईतील अनेक घरांमध्ये स्टाफसाठी जागा नाही. यावर दिग्दर्शक म्हणाले की, त्यांनी खूप काही सहन केलं आहे, मला वाटतं की, आपण सैफला आराम करू दिला पाहिजे. मीडिया अनावश्यकपणे मुद्दा निर्माण करत आहे. सैफ अली खानवर एका चोरानं चाकूने हल्ला केला होता, त्यानंतर त्याच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली. या घटनेनं सर्वांना धक्का बसला आहे.
दरम्यान, वांद्रे भागात सैफ अली खानचं घर आहे. सैफ या घरात त्याची पत्नी करीना कपूर आणि त्याच्या दोन मुलांसह राहतो. त्याच्या याच घरात हल्लेखोर मोहम्मद शहजाद हा चोर चोरीच्या उद्देशानं शिरला होता. 16 जानेवारीला सैफवर हल्ला झाला. पोलिसांनी पुढच्या तीन दिवसांत म्हणजेच 19 जानेवारीला मोहम्मद शहजादला अटक केली. मात्र आता अभिनेता आकाशदीप याने याच प्रकरणावरुन करीनावर टीका केली आहे.
महत्त्वाच्या इतर बातम्या :























