वन टू वन फाईटमध्ये मॅचोमॅन सैफ अली खानला मोहम्मद शहजाद कसा भारी पडला? बांगलादेशात खेळायचा कुस्ती
Saif Ali Khan Attacked Case: सैफ अली खानवर हल्ला झाल्यापासूनच आडदांड सैफसमोर आरोपी पुरून उरलाच कसा असा उपस्थित होत होता? आता याचं उत्तर समोर आलं आहे. आरोपी हा बांगलादेशातील कुस्तीपटू असल्याचं समोर आलं आहे.
Saif Ali Khan Attacked Case: सैफ अली खानच्या (Saif Ali Khan) घरात घुसून त्याच्या पाठीत चाकू भोसकणाऱ्या आरोपीला अटक करण्यात आली आहे. त्याला पाच दिवसांची पोलीस कोठडी (Five Day Police Custody) सुनावण्यात आली आहे. अशातच आरोपीची पोलिसांकडून कसून चौकशी सुरू आहे. अशातच आता आरोपीच्या कबुलीजबाबातून अनेक महत्त्वाच्या गोष्टी समोर आल्या आहेत. सैफ अली खानवर हल्ला झाल्यापासूनच आडदांड सैफसमोर आरोपी पुरून उरलाच कसा असा उपस्थित होत होता? आता याचं उत्तर समोर आलं आहे. आरोपी हा बांगलादेशातील कुस्तीपटू असल्याचं समोर आलं आहे.
पोलीस तपासात आरोपी मोहम्मद शहजादबाबत आणखी एक महत्त्वाची गोष्ट उजेडात आली आहे. ती म्हणजे, मोहम्मद शहजाद हा प्रोफेशनल कुस्तीपटू आहे. बांगलादेशात त्यानं जिल्हा आणि राष्ट्रीय स्तरावर कुस्तीचे फड गाजवले आहेत. कुस्तीपटू असल्यानंच तो झटापटीत सैफवर वरचढ ठरला, असा कयास लावला जात आहे.
सैफवर हल्ला करणारा 'प्रोफेशनल पैलवान'
सैफला चाकू भोसकणाऱ्या आरोपीची पोलिसांकडून कसून चौकशी सुरू आहे. पोलिसी खाक्या दाखवताच आरोपीनं घडाघडा घटनाक्रम सांगायला सुरुवात केली. नोकरीच्या शोधात आरोपी बांगलादेशातून भारतात आला आणि उत्तम नोकरीसाठी त्यानं मुंबई गाठलेली. पण नोकरी मिळत नसल्यानं तो बेरोजगारीला कंटाळला होता. आता तो बांगलादेशातून भारतात आला. पण, इथेही कोणतंच योग्य काम मिळत नसल्यामुळे त्यानं पुन्हा मायदेशी जाण्याचा निर्णय घेतला होता.
पोलीस तपासात आणखी एक खळबळजनक माहिती समोर आली आहे. सैफवर हल्ला करणारा आरोपी प्रोफेशनल कुस्तीपटू असल्याचं समोर आलं आहे. आरोपी मोहम्मद शहजादनं पोलिसांना सांगितलं की, तो बांगलादेशात स्पोर्ट्स खेळायचा. बांगलादेशातील तो प्रोफेशनल कुस्तीपटू होता. कमी वजनी गटात तो कुस्ती खेळायचा. त्यानं जिल्हास्तरीय आणि नॅशनल चॅम्पियनशिपमध्ये कुस्ती खेळली होती. कुस्तीपटू असल्यामुळेच तो सैफ अली खानवर अगदी सहज हल्ला करू शकला.
वांद्र्यात पायी चालत फिरायचा आरोपी
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीनं त्याच्या जबाबात सांगितलं की, काही दिवसांपूर्वीच आरोपीनं वांद्र्यातील एका हॉटेलमध्ये काम करायला सुरुवात केली होती. शिफ्ट संपल्यानंतर रात्री उशीरा तो वांद्र्याच्या परिसरात पायी चालत फिरायचा. असाच एक दिवस तो, चालत चालत सैफ राहत असलेल्या इमारतीजवळ पोहोचला. त्याच्या लक्षात आलं की, इमारतीच्या मागच्या बाजूला कोणताही गार्ड किंवा सीसीटीव्ही फुटेज नाही, हे पाहिल्यानंतर तो सैफच्या घरात घुसला.
पाहा व्हिडीओ : Saif Ali Khan Attackeसैफवर हल्ला करणारा आरोपी शेरीफुल शहजाद कुस्तीपटू,बेरोजगार असल्यानं भारतात घुसला
महत्त्वाच्या इतर बातम्या :