एक्स्प्लोर

सैफच्या घरात कुठून अन् कसा घुसला, जेहच्या खोलीपर्यंत कसा पोहोचला? पोलिसांनी खाक्या दाखवताच आरोपी घडाघडा बोलला

Saif Ali Khan Attacked: सीसीटीव्हीचं जाळं एवढं सगळं भेदून चोरटा थेट घरात घुसून चाकू हल्ला करतोच कसा? असे अनेक प्रश्न अनुत्तरीत होते. अखेर आता सर्व प्रश्नांची उत्तर पोलीस चौकशीतून समोर आली आहेत. आता आरोपीनं याबाबत खुलासा केला आहे.

Saif Ali Khan Attack Case: सैफ अली खानच्या (Saif Ali Khan) घरात घुसून त्याच्यावर हल्ला करुन पळ काढणाऱ्या आरोपीच्या तीन दिवसांनी पोलिसांनी मुसक्या आवळल्या. कुणी एखादा भुरट्या चोर थेट सेलिब्रिटीच्य घरात घुसतोच कसा? इमारतीच्या गेटवर सुरक्षारक्षकांचा वेढा, सीसीटीव्हीचं जाळं एवढं सगळं भेदून चोरटा थेट घरात घुसून चाकू हल्ला करतोच कसा? असे अनेक प्रश्न अनुत्तरीत होते. अखेर आता सर्व प्रश्नांची उत्तर पोलीस चौकशीतून समोर आली आहेत. 

सैफ अली खानवरच्या तपासातली एक्स्क्लुजीव माहिती ABP 'माझा'च्या हाती लागली आहे. हल्लेखोर महोम्मद शहजादानं स्वतः यासंदर्भात माहिती दिली आहे. पोलिसांनी खाक्या दाखवताच आरोपीनं सर्वच सांगितलं. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीनं त्याच्या जबाबात सांगितलं की, काही दिवसांपूर्वीच आरोपीनं वांद्र्यातील एका हॉटेलमध्ये काम करायला सुरुवात केली होती. शिफ्ट संपल्यानंतर रात्री उशीरा तो वांद्र्याच्या परिसरात पायी चालत फिरायचा. असाच एक दिवस तो, चालत चालत सैफ राहत असलेल्या इमारतीजवळ पोहोचला.  त्याच्या लक्षात आलं की, इमारतीच्या मागच्या बाजूला कोणताही गार्ड किंवा सीसीटीव्ही फुटेज नाही, हे पाहिल्यानंतर तो सैफच्या घरात घुसला. पार्किंग एरियातून, तो पायऱ्यांजवळच्या फायर एग्जिटजवळ पोहोचला.  तसाच वर बाराव्या मजल्यावर गेला. तिथे गेल्यानंतर त्याचा डक्ट एरियामध्ये जाण्याचा रस्ता मिळाला आणि तिथून प्रवेश केल्यानंतर तो थेट सैफ अली खानच्या घरातील बाथरुमच्या आतमध्ये पोहोचला. आरोपीनं सांगितलं की, तो फक्त चोरीच्या उद्देशानं तिथं गेला होता. पण, अचानक गोंधळ उडाला आणि घरातील सर्वजण जागे झाले. त्यानंतर भेदरलेल्या चोरानं स्वरक्षणासाठी सैफ अली खानवर हल्ला केला." दरम्यान, आरोपी खरं बोलतोय की, खोटं हे शोधण्यासाठी पोलीस त्यावेळचा क्राईम सीन रिक्रिएट करणार आहेत. 

सैफवर हल्ला करणारा आरोपी पैलवान

पोलीस तपासात आणखी एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. सैफ अली खानवर हल्ला करणारा आरोपी पैलवान असल्याचं समोर आलं आहे. आरोपी मोहम्मद शहजादनं पोलिसांना सांगितलं की, तो बांगलादेशात स्पोर्ट्स खेळायचा. बांग्लादेशातील कुस्तीचा तो पैलवान होता. कमी वजनी गटात तो कुस्ती खेळायचा. त्यानं जिल्हास्तरीय आणि नॅशनल चॅम्पियनशिपमध्ये कुस्ती खेळली होती. कुस्तीचा खेळाडू असल्यामुळेच तो सैफ अली खानवर अगदी सहज हल्ला करू शकला.तसेच, आरोपीनं सांगितलं की, बेरोजगारीला कंटाळून तो बांगलादेशातून भारतात आला होता. पण, इथेही कोणतंच योग्य काम मिळत नसल्यामुळे त्यानं पुन्हा मायदेशी जाण्याचा निर्णय घेतला होता. 

पाहा व्हिडीओ : Saif Atatcker Santacruz police : सैफच्या आरोपी शहजादची रात्र सांताक्रूझ पोलीस कोठडीत

महत्त्वाच्या इतर बातम्या : 

Saif Ali Khan Attacked: झोप काढली, कपडे बदलले, पकडलं न जाण्यासाठी सर्वकाही केलं, पण पाठीवरच्या बॅगेमुळे पोलिसांनी हेरलं; सैफच्या आरोपीच्या मुसक्या कशा आळवल्या?

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Isha Ambani Grand Debut At 2026 Oscars: अंबानींच्या लेकीचा ग्रँड डेब्यू, स्ट्रॅपलेस गाऊनमध्ये ऑस्करच्या रेड कार्पेटवर उतरल्या ईशा अंबानी; हॉलिवूड स्टार्स पडल्या फिक्या
अंबानींच्या लेकीचा ग्रँड डेब्यू, स्ट्रॅपलेस गाऊनमध्ये ऑस्करच्या रेड कार्पेटवर उतरल्या ईशा अंबानी; हॉलिवूड स्टार्स पडल्या फिक्या
Oscars 2026 Winners Full List: 'वन बॅटल आफ्टर अनदर'ला 6, तर 'Sinners' ला 4 ऑस्कर; भारतीय सिनेमांच्या पारड्यात काय?
'वन बॅटल आफ्टर अनदर'ला 6, तर 'Sinners' ला 4 ऑस्कर; भारतीय सिनेमांच्या पारड्यात काय?
Avihitham Malayalam Dark Comedy Movie On OTT: रात्रीच्या अंधारात शेतात एकमेकांच्या मिठीत दिसलं जोडपं, गावभर चर्चा; 7.6 IMDb रेटिंगची डार्क कॉमेडी फिल्म पाहिली?
रात्रीच्या अंधारात शेतात एकमेकांच्या मिठीत दिसलं जोडपं, गावभर चर्चा; 7.6 IMDb रेटिंगची डार्क कॉमेडी फिल्म पाहिली?
Ankita Walawalkar On CM Devendra Fadnavis: 'महाराष्ट्राच्या नेत्यांमधील खरा बिग बॉस कोण?', अंकिता वालावलकरला सर्वांदेखत प्रश्न, कोकण हार्टेड गर्लनं दिलेल्या उत्तरानं लक्ष वेधलं
'महाराष्ट्राच्या नेत्यांमधील खरा बिग बॉस कोण?', अंकिता वालावलकरला सर्वांदेखत प्रश्न, कोकण हार्टेड गर्लनं दिलेल्या उत्तरानं लक्ष वेधलं

व्हिडीओ

Baramati Rahuri Election : बारामती, राहुरीची पोटनिवडणूक 23 एप्रिलला, निवडणूक आयोगाची माहिती
North Korea Ballistic missile: एकीकडे इराण Vs अमेरिका युद्ध शिगेला, दुसरीकडे किम जोंग उन मैदानात, उत्तर कोरियाने 10 बॅलेस्टिक मिसाईल सोडल्या
Kishori Pednekar on Ritu Tawde : मुंबईच्या महापौर पंतप्रधान, मुख्यमंत्र्यांपेक्षा मोठ्या झाल्या का? पेडणेकर आक्रमक
kharg Island Special Report : इराणच्या मुकूटमणीवर अमेरिकेचा शक्तिशाली बॉम्बहल्ला
Election Comission PC : 5 राज्यांच्या निवडणुकांचे बिगुल वाजणार? निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Odisha Government Hospital Fire: जगण्याने छळलं होतं, सरकारी दवाखान्याच्या आगीनं सुटका केली; ओडिशात दवाखान्यात लागलेल्या 10 रुग्ण जिवंत जळाले, 11 कर्मचारी सुद्धा होरपळले
जगण्याने छळलं होतं, सरकारी दवाखान्याच्या आगीनं सुटका केली; ओडिशात दवाखान्यात लागलेल्या 10 रुग्ण जिवंत जळाले, 11 कर्मचारी सुद्धा होरपळले
'सुपरस्टार'ची एन्ट्री अन् भाजपची सत्ताकांक्षा! तमिळनाडूतील तब्बल साठ वर्षांचा दुष्काळ संपवण्यासाठी भाजपने थलापती विजयना जागांपासून मंत्रीपदापर्यंत कोणकोणती ऑफर दिली?
'सुपरस्टार'ची एन्ट्री अन् भाजपची सत्ताकांक्षा! तमिळनाडूतील तब्बल साठ वर्षांचा दुष्काळ संपवण्यासाठी भाजपने थलापती विजयना जागांपासून मंत्रीपदापर्यंत कोणकोणती ऑफर दिली?
Gas Shortage Pune: राज्य सरकारचा महत्त्वाचा निर्णय; गॅस एजन्सी, सिलेंडरच्या गाड्यांना संरक्षण देण्याचे पोलिसांना आदेश
राज्य सरकारचा महत्त्वाचा निर्णय; गॅस एजन्सी, सिलेंडरच्या गाड्यांना संरक्षण देण्याचे पोलिसांना आदेश
राज्य मंडळाचा मोठा दणका! दहावी बारावी परीक्षा सामूहिक कॉपी प्रकरणी तब्बल 103 शिक्षकांवर सर्जिकल स्ट्राईक; आत्तापर्यंत सर्वात मोठी कारवाई
राज्य मंडळाचा मोठा दणका! दहावी बारावी परीक्षा सामूहिक कॉपी प्रकरणी तब्बल 103 शिक्षकांवर सर्जिकल स्ट्राईक; आत्तापर्यंत सर्वात मोठी कारवाई
इस्त्रायल अमेरिकेची दमछाक सुरु होताच इराणकडून ताकद दाखवण्यास सुरुवात; आजवर न वापरलेली सेजल मिसाईल इस्त्रायलवर डागली, 2500 किमी टार्गेटची क्षमता, दुबई एअरपोर्टवर पुन्हा ड्रोन हल्ला
इस्त्रायल अमेरिकेची दमछाक सुरु होताच इराणकडून ताकद दाखवण्यास सुरुवात; आजवर न वापरलेली सेजल मिसाईल इस्त्रायलवर डागली, 2500 किमी टार्गेटची क्षमता, दुबई एअरपोर्टवर पुन्हा ड्रोन हल्ला
India Helped Bangladesh : संकट काळात भारतानं शेजारधर्म पाळला! अडचणीत असलेल्या बांगलादेशला मदतीचा हात, तब्बल 40 हजार टन इंधनाचा पुरवठा करणार
संकट काळात भारतानं शेजारधर्म पाळला! अडचणीत असलेल्या बांगलादेशला मदतीचा हात, तब्बल 40 हजार टन इंधनाचा पुरवठा करणार
Iran Israel America Conflict: होर्मुझच्या सामुद्रधुनीत आम्ही संरक्षण देणार, एकत्र मिळून पेट्रोलिंग करु; डोनाल्ड ट्रम्प यांचं तेल ग्राहक देशांना आवाहन
होर्मुझच्या सामुद्रधुनीत आम्ही संरक्षण देणार, एकत्र मिळून पेट्रोलिंग करु; डोनाल्ड ट्रम्प यांचं तेल ग्राहक देशांना आवाहन
Crime news: पारनेरमध्ये वारकरी संप्रदायाला काळिमा, वासनांध कीर्तनकार महाराजाकडून अल्पवयीन मुलीवर अत्याचार
पारनेरमध्ये वारकरी संप्रदायाला काळिमा, वासनांध कीर्तनकार महाराजाकडून अल्पवयीन मुलीवर अत्याचार
Embed widget