Runway 34 Film Box Office Collection : टायगरच्या 'हीरोपंती' समोर टिकला नाही अजयचा 'रन-वे 34' ; पाहा बॉक्स ऑफिस कलेक्शन
अजयच्या 'रनवे 34' (Runway 34) पेक्षा टायागरच्या 'हीरोपंती-2' (Heropanti 2) नं बॉक्स ऑफिसवर जास्त कलेक्शन केलं.
![Runway 34 Film Box Office Collection : टायगरच्या 'हीरोपंती' समोर टिकला नाही अजयचा 'रन-वे 34' ; पाहा बॉक्स ऑफिस कलेक्शन Runway 34 Heropanti 2 know Box Office Collection Runway 34 Film Box Office Collection : टायगरच्या 'हीरोपंती' समोर टिकला नाही अजयचा 'रन-वे 34' ; पाहा बॉक्स ऑफिस कलेक्शन](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/05/04/a9d5c6dd61a82c89b313fe7d9f64d545_original.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Runway 34 Film Box Office Collection : अभिनेता टायगर श्रॉफचा (Tiger Shroff) हीरोपंती-2 (Heropanti 2) आणि अजय देवगणचा (Ajay Devgn) 'रनवे 34' (Runway 34) हे दोन्ही चित्रपट 29 April 2022 रोजी प्रदर्शित झाले. दोन्ही चित्रपटांमध्ये दमदार स्टार कास्ट आहे. अजयच्या 'रनवे 34' पेक्षा टायागरच्या 'हीरोपंती-2' नं बॉक्स ऑफिसवर जास्त कलेक्शन केलं. जाणून घेऊयात या दोन्ही चित्रपटांचे बॉक्स ऑफिस कलेक्शन...
'हीरोपंती-2' चं बॉक्स ऑफिस कलेक्शन
'हीरोपंती-2' चित्रपटानं ओपनिंग-डे ला 6.25 कोटींची कमाई केली. या चित्रपटानं आत्तापर्यंत 16 कोटींची कमाई केली. हीरोपंती-2 चित्रपटामध्ये टायगरसोबतच अमृता सिंह,नवाजुद्दीन सिद्दीकी आणि तारा सुतारिया यांनी देखील प्रमुख भूमिका साकारली आहे. 2014 मध्ये रिलीज झालेल्या हीरोपंती या चित्रपटाचा हा दुसरा पार्ट असणार आहे.
View this post on Instagram
रनवे 34 चं बॉक्स ऑफिस कलेक्शन
65 कोटी बजेट असणाऱ्या रनवे 34 या चित्रपटानं आत्तापर्यंत 15.35 कोटींची कमाई केली आहे. या चित्रपटामध्ये अमिताभ बच्चन, आकांक्षा सिंह आणि रकुल प्रीत सिंह या कलाकारांनी प्रमुख भूमिका साकारली आहे. ‘रनवे 34’ हा चित्रपट सत्य घटनेवर आधारित थ्रिलर चित्रपट आहे.
View this post on Instagram
संबंधित बातम्या
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)