Athiya Shetty Wedding : सुनील शेट्टींच्या घरी लगीनघाई; अथिया- राहुल लवकरच अडकणार लग्नबंधनात
Athiya Shetty Wedding : अथिया शेट्टी - के एल राहुल डिसेंबरमध्ये लग्नबंधनात अडकणार आहेत.
Athiya Shetty KL Rahul Wedding : आलिया भट्ट आणि रणबीर कपूरच्या लग्नानंतर आता अथिया शेट्टी (Athiya Shetty) आणि के एल राहुल (KL Rahul) लग्नबंधनात अडकणार आहे. अथिया आणि क्रिकेटर के एल राहुल डिसेंबर 2022 मध्ये सात फेरे घेणार आहेत.
'तडप'सिनेमाच्या प्रीमिअर दरम्यान नुकतेच अथिया आणि के एल राहुल एकत्र स्पॉट झाले होते. रिपोर्टनुसार, अथिया आणि केएल राहुलच्या लग्नसोहळ्याची सुनील शेट्टींनी तयारी सुरू केली आहे. पंचतारांकित हॉटेलमध्ये अथिया आणि के एल राहुल यांचा लग्नसोहळा पार पडणार आहे.
View this post on Instagram
अथिया आणि के एल राहुल यांचा शाही विवाह सोहळा होणार आहे. या लग्नसोहळ्यात अनेक सेलिब्रिटी आणि उद्योगपती हजेरी लावणार आहेत. अथिया शेट्टी ही सुनील शेट्टीची मुलगी आहे.अथिया आणि केएल यांचे लग्न दाक्षिणात्य परंपरेनुसार होणार आहे. अथिया बॉलिवूड अभिनेता सुनील शेट्टी याची मुलगी आहे. आथियाने 2015 मध्ये अॅक्शन फिल्म 'हिरो'मधून बॉलिवूमध्ये पदार्पण केले होते.‘मुबारकान’, ‘नवाबजादे’ आणि ‘मोतीचूर चकनाचूर’ या चित्रपटांमध्ये आथियाने महत्वाची भूमिका साकारली आहे.
संबंधित बातम्या