(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Alia Bhat : "तुम क्या मिले" गाण्याकरता आलिया भटने "या" अभिनेत्याकडून घेतल्या होत्या टिप्स, नृत्यदिग्दर्शकाने केला खुलासा
"तुम क्या मिले" गाण्याच्या शुटींगपूर्वी आलिया भट शाहरूख खानला भेटायली गेली होती याबद्दल नृत्यदिग्दर्शिका वैभवी मर्चंटने अलीकडेच दिलेल्या मुलाखतीत खुलासा केला आहे.
Alia Bhat Visited To Shahrukh Khan : आलिया भट्ट आणि रणवीर सिंग यांचा 'रॉकी और रानी की प्रेम कहानी' हा चित्रपट सध्या थिएटरमध्ये आहे. त्याचा चित्रपट बॉक्स ऑफिसवरही चांगली कमाई करत आहे. रणवीर - आलियाची जोडी प्रेक्षकांना चांगलीच पसंतीस पडत आहे. सोशल मिडीयावर या चित्रपटाची जोरदर चर्चा सुरू आहे. चित्रपटाचे प्रमोशन देखील मोठ्या प्रमाणात सुरू आहे. या चित्रपटातील तुम क्या मिली हे गाणे रिलीज झाल्यापासून चाहत्यांना आवडले आहे. या गाण्यातील दोघांची केमिस्ट्री प्रेक्षकांना मोठ्या प्रमाणात पसंत पडली आहे. त्याचबरोबर या गाण्याचे सीन्सही लोकांना आवडले आहेत. तर या गाण्याचे शूट कश्मिरमध्ये झाले आहे. मात्र या गाण्याच्या शुटींगपूर्वी आलिया भट शाहरूख खानला भेटायली गेली होती याबद्दल नृत्यदिग्दर्शिका वैभवी मर्चंटने अलीकडेच दिलेल्या मुलाखतीत खुलासा केला आहे.
वैभवीने सांगितले तु क्या मिले हे गाणे शूट करणे रणवीर- आलिया दोघांकरता खरेतर अवघड होते. त्याकरता आलिया शाहरूख खानकडे टिप्स घेण्याकरता गेली होती. यापूर्वी रणवीरने फक्त एकदा ‘गुंडे’ चित्रपटात प्रियांका चोप्राबरोबर शिफॉन साडी, बर्फाळ प्रदेश अशा धाटणीचे रोमॅंटिक गाणे शूट केले होते. तर, आलियाने सुद्धा ‘स्टुडंट ऑफ द इयर’मधील “इश्क वाला लव्ह…”नंतर असे गाणे केले नव्हते.
2016 मध्ये शाहरूख आलियाने एकत्र काम केले होते
शाहरुख खान आणि आलिया भट्ट यांच्यात खूप चांगले बाँडिंग आहे. दोघांनी 2016 मध्ये आलेल्या 'डियर जिंदगी' चित्रपटात एकत्र काम केले होते. त्याने डार्लिंग्जची सह-निर्मितीदेखील केली, ज्यात आलिया भट्ट मुख्य भूमिकेत होती. गेल्या वर्षी शाहरुख खानने आलिया आणि रणबीरच्या 'ब्रह्मास्त्र 'पार्ट वनमध्येही कॅमिओ केला होता.
'तुम क्या मिले' या गाण्याबद्दल सांगायचे तर, त्याचे संगीत प्रीतमने दिले असून ते अरिजित सिंग आणि श्रेया घोषाल यांनी गायले आहे. हे गाणे चाहत्यांना खूप आवडले आहे. 'रॉकी आणि रानी की प्रेम कहानी' या चित्रपटात आलिया आणि रणवीरशिवाय धर्मेंद्र, जया बच्चन आणि शबाना आझमी यांसारखे कलाकारही महत्त्वाच्या भूमिकेत आहेत. 'रॉकी और रानी की प्रेम कहानी'मधून करण जोहरने सात वर्षांनी दिग्दर्शनात पुनरागमन केले आहे. या चित्रपटाचं कथानक इशिता मोईत्रा, शशांक खेतान आणि सुमित रॉय यांनी लिहिले आहे. धर्मा प्रॉडक्शन आणि वायकॉम18 स्टुडिओज यांनी या चित्रपटाची निर्मिती केली आहे. हा चित्रपट परस्परविरोधी व्यक्तिमत्त्व असलेल्या जोडप्यावर आधारित आहे जे प्रेमात पडतात आणि लग्न करण्यापूर्वी तीन महिने एकमेकांच्या कुटुंबासोबत राहण्याचा निर्णय घेतात.
इतर महत्वाच्या बातम्या