एक्स्प्लोर

Eknath Shinde Ajit Pawar: महायुतीच्या पहिल्याच पत्रकार परिषदेत शिंदे-दादांचे एकमेकांना चिमटे; सर्व खळखळून हसले, VIDEO

Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024: महायुतीच्या या यशानंतर काल एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांनी मुंबईत सायंकाळी पत्रकार परिषद घेतली.

Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024: राज्यात एकूण 288 जागांसाठी मतदान झाले. यातपैकी तब्बल 132 जागांवर भाजपने दणदणीत विजय नोंदवला आहे. या जागांसह भाजपा हा राज्यातील सर्वांत मोठा पक्ष ठरला आहे. सलग तिसऱ्या निवडणुकीत भाजपाने 100 पेक्षा अधिक जागा मिळवल्या आहेत. या निवडणुकीत भाजपानंतर एकनाथ शिंदे यांचा पक्ष दुसरा सर्वांत मोठा पक्ष ठरला आहे. या पक्षाला एकूण 57 जागा मिळाल्या आहेत. तर अजित पवार यांच्या पक्षाला एकूण 41 जागांवर विजय मिळाला. राज्यभरात महायुतील एकूण 232 जागा मिळल्या. तर महाविकास आघाडीला 49 जागांवर समाधान मानावे लागले. 

महायुतीच्या या यशानंतर काल एकनाथ शिंदे (Eknath Shinde), देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) आणि अजित पवार (Ajit Pawar) यांनी मुंबईत सायंकाळी पत्रकार परिषद घेतली. राज्यातील तमाम लाडक्या बहिणी, लाडके भाऊ, लाडके शेतकरी, युवक-युवती, ज्येष्ठ नागरिकांनी महायुतीला दिलेल्या भक्कम पाठिंब्यामुळेच आजचा हा महायुतीचा महाविजय शक्य झाला आहे, असं एकनाथ शिंदे यांनी सांगितले.  हा ऐतिहासिक विजय आहे, आजपर्यंत अनेक निवडणूका पाहिल्या मात्र ही निवडणूक जनतेनी हातात घेतली. लोकांनी मतांच्या स्वरुपातून प्रेमाचा वर्षावर केला. अटलसेतू, समृद्धी, कारशेडचं उद्घाटन केलं. विकासाला आम्ही प्राधान्य दिलं, कामाला प्राथमिकता दिली. राज्याच विकास करताना सर्व घटकांना आम्ही डोळ्यासमोर ठेवलं, असंही एकनाथ शिदेंनी सांगितले. 

राज्यशासन घरात बसून चालवता येत नाही- एकनाथ शिंदे

लोकसभेला लोकांच्या दारात जाऊन म्हणाले तरी नरेंद्र मोदी सत्तेत आले. जनतेने आता स्पष्ट कौल दिला. काही लोक दररोज सरकार पडणार हेच बोलयचे आम्ही आरोपांना आरोपांतून उत्तर न देता कामातून दिलं, असं एकनाथ शिंदेंनी सांगितले. मी लोकांमध्ये जायचो, दोन्ही उपमुख्यमंत्री २४×७  काम करतो. राज्यशासन घरात बसून चालवता येत नाही. 2019 ला जे सरकार यायला हवे होतं ते आलं नाही, असंही एकनाथ शिंदेंनी सांगितले. 

महायुतीच्या पहिल्याच पत्रकार परिषदेत शिंदे-दादांचे एकमेकांना चिमटे-

महायुतीच्या या पत्रकार परिषदेत एक मजेशीर किस्सा देखील घडला. एकनाथ शिंदे पत्रकारांशी बोलत असताना सरकार कोणाचं हे जनतेनं ठरवलं आहे. राष्ट्रवादी कोणाची हे देखील ठरवलं...(अजितदादांकडे बघून) असं एकनाथ शिंदे म्हणाले. यानंतर शिवसेना कोणाची हेही जनतेने ठरवले, असं अजित पवार म्हणाले. यानंतर पत्रकार परिषदेत एकच हशा पिकला. 

एकनाथ शिंदे आणि अजित पवारांचे एकमेकांना चिमटे, Video:

संबंधित बातमी:

Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024: शरद पवार, संजय राऊत, प्रियंका चतुर्वेदींची पुढची खासदारकी टर्म धोक्यात; महाविकास आघाडीला धक्का

एबीपी माझा ऑनलाईनमध्ये कॉपी एडिटर म्हणून कार्यरत. 2019 पासून लोकमत ऑनलाईनमधून पत्रकारितेची सुरुवात. राजकीय बातम्यांमध्ये हातखंडा, क्राईम, क्रीडा, निवडणूक विषयक बातम्यांमध्ये रस. 

Read More
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Live Blog Updates: इराणशी लढाई पूर्ण ताकदीनिशी सुरु राहणार- डोनाल्ड ट्रम्प
Live Blog Updates: इराणशी लढाई पूर्ण ताकदीनिशी सुरु राहणार- डोनाल्ड ट्रम्प
West Bengal : भाजपची पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीसाठी पहिली यादी जाहीर, ममता बॅनर्जींविरोधात उमेदवार ठरला 
भाजपची पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीसाठी पहिली यादी जाहीर, ममता बॅनर्जींविरोधात उमेदवार ठरला 
Supriya Sule On Baramati By Election 2026: बारामतीत एकीकडे बिनविरोधची चर्चा, दुसरीकडे लक्ष्मण हाकेंचं नाव पुढे; शरद पवारही उमेदवार देणार?, सुप्रिया सुळे म्हणाल्या...
बारामतीत एकीकडे बिनविरोधची चर्चा, दुसरीकडे हाकेंचं नाव पुढे; शरद पवारांकडूनही उमेदवार?, सुप्रिया सुळे म्हणाल्या...
Prajakt Tanpure :  प्राजक्त तनपुरेंची राहुरीच्या पोटनिवडणुकीवर पहिली प्रतिक्रिया, कार्यकर्त्यांचा उल्लेख अन् मुख्यमंत्र्यांचं कौतुक,राजकीय वर्तुळात चर्चा सुरु
प्राजक्त तनपुरेंकडून पोटनिवडणूक जाहीर होताच कार्यकर्त्यांचा उल्लेख आणि मुख्यमंत्र्यांचं कौतुक, राजकीय वर्तुळात चर्चा सुरु

व्हिडीओ

Sunetra Pawar Baramati : बारामतीत सुनेत्रा पवारांची निवड बिनविरोध होणार? Special Report
Dubai Airport Attack : दुबईत आगडोंब, आखातात बोंबाबोंब, हवाई वाहतूक विस्कळीत Special Report
Iran Israel Conflict Effect On Maharashtra : युद्धाचे दिवस सतरा, वडा पावलाही खतरा Special Report
Laxman Hake on Baramati : निधनाच्या तिसऱ्या दिवशी शपथ, दु:ख आम्हीच करु का? बारामती निवडणूक लढणार?
Yugendra Pawar Baramati : बारामतीची निवडणूक बिनविरोध झाली पाहिजे, सुनेत्रा काकींना साथ देऊ

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Mira Bhayander Hospital News: आयसीयूमध्ये उपचार घेणाऱ्या महिलेच्या हाताला उंदराने कुरतडले; आता महिलेचा मृत्यू, मीरा-भाईंदरमधील पंडित भीमसेन जोशी रुग्णालयातील धक्कादायक प्रकार
आयसीयूमध्ये उपचार घेणाऱ्या महिलेच्या हाताला उंदराने कुरतडले; आता महिलेचा मृत्यू, मीरा-भाईंदरमधील हादरवणारी घटना
West Bengal : भाजपची पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीसाठी पहिली यादी जाहीर, ममता बॅनर्जींविरोधात उमेदवार ठरला 
भाजपची पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीसाठी पहिली यादी जाहीर, ममता बॅनर्जींविरोधात उमेदवार ठरला 
Donald Trump : होर्मुझच्या सामुद्रधुनीवर अमेरिकेचं नियंत्रण, इराणची 100 जहाजं बुडवली, डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर अमेरिकेचं नियंत्रण, इराणची 100 जहाजं बुडवली, डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
Sahitya Akademi Award 2025 : राजू बाविस्कर यांच्या ‘काळयानिळ्या रेषा’ला साहित्य अकादमी पुरस्कार जाहीर
राजू बाविस्कर यांच्या ‘काळयानिळ्या रेषा’ला साहित्य अकादमी पुरस्कार जाहीर
उद्धव ठाकरेंचं विधानसभा अध्यक्षांना पत्र; राहुल नार्वेकर म्हणाले, आम्ही तुम्हाला मोकळं होऊ देणार नाही
उद्धव ठाकरेंचं विधानसभा अध्यक्षांना पत्र; राहुल नार्वेकर म्हणाले, आम्ही तुम्हाला मोकळं होऊ देणार नाही
Satara Election : साताऱ्यातील 11 पंचायत समित्यांमध्ये कोणाची सत्ता? भाजपकडे 5, राष्ट्रवादी काँग्रेस 5 आणि शिवसेनेची एका पंचायत समितीत सत्ता
साताऱ्यातील 11 पंचायत समित्यांमध्ये कोणाची सत्ता? भाजपकडे 5, राष्ट्रवादी काँग्रेस 5 तर सेनेची एका ठिकाणी सत्ता
Abhishek Sharma : सनरायजर्स हैदराबादला नवा कर्णधार मिळण्याची शक्यता, अभिषेक शर्माकडे संघाचं नेतृत्त्व जाणार, मोठं कारण समोर
सनरायजर्स हैदराबादला नवा कर्णधार मिळण्याची शक्यता, अभिषेक शर्माकडे संघाचं नेतृत्त्व जाणार, मोठं कारण समोर
Israel Iran Conflict : युद्धपिपासू ट्रम्प यांची कोंडी, होर्मुझमध्ये संयुक्त नौदल गस्तीचा प्रस्ताव ऑस्ट्रेलिया-जपानने धुडकावला
युद्धपिपासू ट्रम्प यांची कोंडी, होर्मुझमध्ये संयुक्त नौदल गस्तीचा प्रस्ताव ऑस्ट्रेलिया-जपानने धुडकावला
Embed widget