Bigg Boss OTT Season 2 Updates: करण जोहर नाही तर सलमान खान होस्ट करणार 'बिग बॉस ओटीटी 2'; कोणते कलाकार शोमध्ये होणार सहभागी?
सलमान खान (Salman Khan) हा बिग बॉस ओटीटी-2 (Bigg Boss OTT-2 ) होस्ट करताना दिसणार आहे.
Bigg Boss OTT Season 2 Updates: 'बिग बॉस ओटीटी' (Bigg Boss OTT) या वादग्रस्त रिअॅलिटी शोच्या पहिल्या सिझनला प्रेक्षकांची पसंती मिळाली आहे. 'बिग बॉस ओटीटी' चा पहिला सिझन निर्माता-दिग्दर्शक करण जोहरने (Karan Johar) होस्ट केला होता. आता लवकरच बिग बॉस ओटीटीचा दुसरा सिझन प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. पण या वेळी हा शो करण जोहर नाही तर अभिनेता सलमान खान (Salman Khan) होस्ट करणार आहे.
एका रिपोर्टनुसार, करण जोहर 'बिग बॉस ओटीटी सिझन 2' होस्ट करणार नाहीये. बिग बॉसचा (Bigg Boss) सूत्रसंचालक सलमान खान हा बिग बॉस ओटीटी-2 होस्ट करताना दिसणार आहे. त्यामुळे आता सलमानचे चाहते बिग बॉस ओटीटीचा दुसरा सिझन पाहण्यास उत्सुक आहेत.
'बिग बॉस ओटीटी सिझन 2' कधी येणार प्रेक्षकांच्या भेटीस?
'बिग बॉस ओटीटी 2' जूनच्या अखेरीस प्रेक्षकांच्या भेटीस येऊ शकतो, असं म्हटलं जात आहे. हा शो 3 महिने दाखवला जाईल. हा शो टीव्हीऐवजी OTT प्लॅटफॉर्मवर देखील प्रेक्षकांना बघता येणार आहे. Voot या ओटीटी प्लॅटफॉर्मवर बिग बॉस ओटीटीचा दुसरा सिझन तुम्ही पाहू शकणार आहात. 'बिग बॉस ओटीटी सिझन 2' चे होस्टिंग सलमान खान करणार असल्यानं त्याचे चाहते आता या कार्यक्रमाची उत्सुकतेने वाट बघत आहेत.
View this post on Instagram
'बिग बॉस ओटीटी' मध्ये कोणते स्पर्धक होणार सहभागी?
'बिग बॉस ओटीटी'च्या दुसऱ्या सीझनमध्ये काही प्रसिद्ध कलाकार सहभागी होणार आहेत, असे म्हटले जात आहे. 'लॉक अप'चा विजेता मुनावर फारुकी देखील बिग बॉस ओटीटी-2 मध्ये सहभागी होणार आहे, असं म्हटलं जात आहे. मुनव्वर व्यतिरिक्त अर्चना गौतमचा भाऊ गुलशन देखील 'बिग बॉस ओटीटी 2' मध्ये सहभागी होणार आहे, अशी चर्चा आहे. गुलशन 'बिग बॉस 16' मध्ये त्याची बहीण अर्चना गौतम कुटुंबातील सदस्य म्हणून गेला होता. अजून बिग बॉस ओटीटी या कार्यक्रमाच्या निर्मात्यांनी या कार्यक्रमात सहभागी होणाऱ्या स्पर्धकांबाबत कोणतीही माहिती दिलेली नाही. प्रेक्षक या कार्यक्रमाची उत्सुकतेने वाट बघत आहेत.
इतर महत्वाच्या बातम्य
Salman Khan : किलर लूकमधील फोटो शेअर करत सलमाननं मानले चाहत्यांचे आभार; 'हे' आहे कारण