Ritiesh Deshmukh : होस्टिंगसाठी रितेशने मांजरेकरांकडून काही सल्ला घेतला का? म्हणाला, 'अजून आमचं...'
Bigg Boss Marathi Season 5 : बिग बॉस मराठीच्या पाचव्या सिझनचं होस्टिंग करणार आहे. त्याचप्रमाणे होस्ट म्हणून महेश मांजरेकर यांची एक्झिट झाली आहे.
Bigg Boss Marathi Season 5 : बिग बॉस मराठीचा (Bigg Boss Marathi Season 5) पाचवा सिझन येत्या 28 जुलै पासून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या सिझनमध्ये कोणते लाडके कलाकार हे बिग बॉसच्या घरात स्पर्धक म्हणून सहभागी होणार याची उत्सुकता अनेकांना लागून राहिली असल्याचं पाहायला मिळतंय. बिग बॉसच्या पाचव्या सिझनची घोषणा झाली आणि रसिकांची प्रतीक्षा अखेर संपली. पण पहिल्याच प्रोमोमध्ये एक मोठं सरप्राईजही चाहत्यांना मिळालं होतं. या सिझनचं होस्टिंग हे अभिनेता रितेश देशमुख (Ritiesh Deshmukh) करणार आहे.
बिग बॉस मराठीचे पहिले चारही सिझन दिग्दर्शक महेश मांजरेकर यांनी होस्ट केले होते. पण पाचव्या सिझनमध्ये रितेशच्या एन्ट्रीने सगळ्यांनाच आश्चर्याचा धक्का बसला. त्याचप्रमाणे महेश मांजरेकर हा सिझन होस्ट का करत नाहीत? असा प्रश्नही अनेकांना पडला. त्यावर मांजरेकरांनी स्पष्टीकर दिलंच, पण रितेश आणि मांजरेकरांमध्ये काही संवाद झाला का? असाही प्रश्न अनेकांना पडलाय.
रितेश आणि महेश मांजरेकर यांचं बोलणं नाहीच...
दरम्यान बिग बॉस मराठीसाठी आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत रितेशने या प्रश्नावर भाष्य केलं आहे. तू होस्ट करणार हे ठरल्यानंतर तुझा आणि मांजरेकरांचा काही संपर्क झाला का? त्यावर रितेशने म्हटलं की, नाही, आमचं काहीही बोलणं झालेलं नाही. पण लवकरच आम्ही संवाद साधू. त्यामुळे मांजेरकरांची एक्झिट आणि रितेशची एन्ट्री यावर अद्याप तरी या दोघांमध्ये कोणताही संवाद झालेला नाही.
बिग बॉसमधील एक्झिटविषयी महेश मांजरेकर यांचं स्पष्टीकरण
बिग बॉसविषयी बोलताना महेश मांजरेकरांनी म्हटलं की, मी सध्या मणिरत्नम यांच्या 'ठग लाइफ' सिनेमात व्यस्त आहे. त्याचप्रमाणे सध्या एका कन्नड सिनेमाचंही काम सुरु आहे. त्या चित्रपटांसाठी मी दिल्ली,लंडन आणि बँकॉकमध्ये शुटींगसाठी धावतोय. त्याला दोन ते तीन महिने तरी लागतीलच. हे दोन ते तीन महिने मी बाहेर असणार आहे. त्याचप्रमाणे मनात काही विषय घोळतायत आणि हे काम संपल्यानंतर माझ्या कलाकृतींसाठीचं काम सुरु करणार आहे.
View this post on Instagram