एक्स्प्लोर

Bigg Boss Marathi Season 5 : 'बिग बॉस 5' मधून बाहेर पडण्याचा निर्णय का घेतला? अखेर महेश मांजरेकरांनी केला खुलासा, म्हणाले, 'सध्या मनात काही..'

Bigg Boss Marathi Season 5 : मराठी बिग बॉस 5 सीझनचं यंदा होस्टिंग रितेश देशमुख करणार आहे. पण महेश मांजरेकरांनी या कार्यक्रमातून एक्झिट का घेतली याविषयी त्यांनीच खुलासा केला आहे. 

Bigg Boss Marathi Season 5 : मराठी बिग बॉस 5 (Bigg Boss Marathi Season 5) ची घोषणा झाली आणि सगळ्यांची उत्सुकचा शिगेला पोहचली. या सीझनच्या पहिल्याच प्रोमोमध्ये प्रेक्षकांना एक मोठं सरप्राईज मिळालं आहे. कारण यंदाच्या या सीझनमध्ये होस्टच्या खुर्चीवर रितेश देशमुख (Riteish Deshmukh) बसणार आहे. त्यामुळे महेश मांजरेकरांची (Mahesh Manjrekar) या कार्यक्रमातून एक्झिट झाल्याने चाहत्यांना मोठा धक्का बसला. त्यानंतर मांजरेकरांनी या कार्यक्रमातून एक्झिट का घेतली हा एकच प्रश्न साऱ्यांना पडला होता. पण आता स्वत: महेश मांजरेकरांनी याबाबत खुलासा केला आहे. 

नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीमध्ये  सध्या इतर प्रोजेक्ट्समध्ये व्यस्त असल्याने त्यांनी या कार्यक्रमातून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला असल्याचं त्यांनी सांगितलं आहे. रितेश देशमुखला पाहून अनेकांना आनंद झाला. बिग बॉसच्या घरातील अनेक सदस्यांनी देखील रितेशचं स्वागत केलं. पण महेश मांजरेकर यांच्या एक्झिट कारण हे अनेकांना समजलं नाही. पण आता मांजरेकरांनी याबाबत खुलासा केल्याने अनेकांचा संभ्रम दूर झाला आहे. 

महेश मांजरेकरांनी काय म्हटलं?

बिग बॉसविषयी बोलताना महेश मांजरेकरांनी म्हटलं की, मी सध्या मणिरत्नम यांच्या 'ठग लाइफ' सिनेमात व्यस्त आहे. त्याचप्रमाणे सध्या एका कन्नड सिनेमाचंही काम सुरु आहे. त्या चित्रपटांसाठी मी दिल्ली,लंडन आणि बँकॉकमध्ये शुटींगसाठी धावतोय. त्याला दोन ते तून महिने तरी लागतीलच. हे दोन ते तीन महिने मी बाहेर असणार आहे. त्याचप्रमाणे मनात काही विषय घोळतायत आणि हे काम संपल्यानंतर माझ्या कलाकृतींसाठीचं काम सुरु करणार आहे. 

महाराष्ट्रात पुन्हा घुमणार बिग बॉसचा आवाज

हिंदीमधल्या अफाट यशानंतर 'बिग बॉस' हा कार्यक्रम मराठीतही सुरु झाला. “बिग बॉस मराठी”चा आवाज संपूर्ण महाराष्ट्राच्या घराघरांत जाऊन पोहोचला. प्रेक्षक या कार्यक्रमावर बेहद फिदा झाले. “बिग बॉस मराठी” च्या पहिल्या चार सिझनने मराठी प्रेक्षकांची तुफान मने जिंकली आणि मराठमोळ्या थिमसह बिग बॉसच्या चारही सिझनची जोरदार चर्चा झाली. आता त्याच 'बिग बॅास' मराठीच्या नव्या सिझनची जोरात तयारी सुरू झालीय.  

'बिग बॅास'चे घर ही नेहमीच रसिकांच्या औत्सुक्याची, कुतूहलाची बाब असते. बिग बॅास मराठीचे हे आलिशान घर आकार घेऊ लागले आहे. तसेच बिग बॅासच्या घरातील अतरंगी मोहरे यांचीही कसून निवड प्रक्रिया सुरू झाली आहे. या सिझनमध्ये 'बिग बॅास'च्या या घरात आणखी काय काय नाविन्य असेल, काय एक्स्ट्रा गॅासिप अर्थात एक्स्ट्रा मनोरंजन पहायला मिळणार, याकडे प्रेक्षकांचे लक्ष लागून आहे.

ही बातमी वाचा : 

Bigg Boss OTT : 'बिग बॉस ओटीटी' मध्ये होणार टीम इंडियाच्या'या' धडाकेबाज फलंदाजाची एन्ट्री? सेलेब्सला मिळणार तगडं आव्हान

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

मोठं घबाड जप्त, साडे तीन कोटींची ATM व्हॅन पोलिसांच्या ताब्यात; पैशांच्या भरलेल्या बॅगा ठाण्यात
मोठं घबाड जप्त, साडे तीन कोटींची ATM व्हॅन पोलिसांच्या ताब्यात; पैशांच्या भरलेल्या बॅगा ठाण्यात
Ajit Pawar: अजित पवारांनी घेतली प्रकाश आंबेडकरांची भेट; कारणही सांगितलं, नेमकं काय म्हणाले?
अजित पवारांनी घेतली प्रकाश आंबेडकरांची भेट; कारणही सांगितलं, नेमकं काय म्हणाले?
मविआच्या जाहिरातीमधून अजित पवारांची बदनामा, खोटं वृत्त; राष्ट्रवादीच पोलीस आयुक्तांकडे तक्रार
मविआच्या जाहिरातीमधून अजित पवारांची बदनामा, खोटं वृत्त; राष्ट्रवादीच पोलीस आयुक्तांकडे तक्रार
Supreme Court on Government JOB : भरतीचे नियम मध्येच बदलता येणार नाहीत, सरकारी नोकऱ्यांबाबत सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्णय
भरतीचे नियम मध्येच बदलता येणार नाहीत, सरकारी नोकऱ्यांबाबत सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्णय
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Ashish Shelar PC : उद्धव ठाकरे...फेकमफाक बंद करा; आशिष शेलार संतापलेOne Minute One Constituency :  01 मिनिट 01 मतदारसंघ :  07 नोव्हेंबर 2024 : ABP MajhaABP Majha Marathi News Headlines 5 PM TOP Headlines 5 PM 07 November 2024TOP 25 | टॉप 25 बातम्यांचा वेगवान आढावा एका क्लिकवर सुपरफास्ट ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
मोठं घबाड जप्त, साडे तीन कोटींची ATM व्हॅन पोलिसांच्या ताब्यात; पैशांच्या भरलेल्या बॅगा ठाण्यात
मोठं घबाड जप्त, साडे तीन कोटींची ATM व्हॅन पोलिसांच्या ताब्यात; पैशांच्या भरलेल्या बॅगा ठाण्यात
Ajit Pawar: अजित पवारांनी घेतली प्रकाश आंबेडकरांची भेट; कारणही सांगितलं, नेमकं काय म्हणाले?
अजित पवारांनी घेतली प्रकाश आंबेडकरांची भेट; कारणही सांगितलं, नेमकं काय म्हणाले?
मविआच्या जाहिरातीमधून अजित पवारांची बदनामा, खोटं वृत्त; राष्ट्रवादीच पोलीस आयुक्तांकडे तक्रार
मविआच्या जाहिरातीमधून अजित पवारांची बदनामा, खोटं वृत्त; राष्ट्रवादीच पोलीस आयुक्तांकडे तक्रार
Supreme Court on Government JOB : भरतीचे नियम मध्येच बदलता येणार नाहीत, सरकारी नोकऱ्यांबाबत सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्णय
भरतीचे नियम मध्येच बदलता येणार नाहीत, सरकारी नोकऱ्यांबाबत सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्णय
Maharashtra Assembly Elections 2024 : विधानसभेची खडाजंगी : नाशिक पूर्व मतदारसंघात थेट लढत, ढिकले की गीते? कोण मारणार बाजी?
विधानसभेची खडाजंगी : नाशिक पूर्व मतदारसंघात थेट लढत, ढिकले की गीते? कोण मारणार बाजी?
मोठी बातमी! दाऊद इब्राहिम अन् लॉरेन्स बिश्नोईच्या फोटोंचे टी-शर्ट; फ्लिपकार्टसह विक्रेत्यांवर गुन्हा दाखल
मोठी बातमी! दाऊद इब्राहिम अन् लॉरेन्स बिश्नोईच्या फोटोंचे टी-शर्ट; फ्लिपकार्टसह विक्रेत्यांवर गुन्हा दाखल
Supreme Court on POCSO : 'पाॅस्को' केस परस्पर सामंजस्याने मिटवता येणार नाही, सर्वोच्च न्यायालयाकडून उच्च न्यायालयाचा निर्णय रद्द
'पाॅस्को' केस परस्पर सामंजस्याने मिटवता येणार नाही, सर्वोच्च न्यायालयाकडून उच्च न्यायालयाचा निर्णय रद्द
Pusad Assembly Election:  पुसदमध्ये इंद्रनील नाईक यांच्या विरुद्ध शरद मेंद यांचं आव्हान, दोन्ही राष्ट्रवादी आमने सामने, कोण बाजी मारणार?
पुसदमध्ये इंद्रनील नाईक यांच्या विरुद्ध शरद मेंद यांचं आव्हान, दोन्ही राष्ट्रवादी आमने सामने, कोण बाजी मारणार?
Embed widget