एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Rishi Kapoor | ऋषी कपूर यांना बॉलिवूडची श्रद्धांजली, लतादीदी, बिग बी, रजनीकांत, आमीरसह दिग्गज गहिवरले
अभिनेता इरफान खानच्या निधनाला 24 तासदेखील पूर्ण होत नाहीत तोच कलाक्षेत्रातील दुसरी दु:खद बातमी समोर आली आहे.ज्येष्ठ अभिनेते ऋषी कपूर यांचे मुंबईत निधन झाले. ते 67 वर्षांचे होते.
मुंबई : एप्रिल 2020 च्या अखेरीस बॉलिवूडने दोन दिग्गज कलाकारांना गमावलं आहे. यामुळं बॉलिवूडवर शोककळा पसरली आहे. काल, 29 एप्रिलला अभिनेता इरफान खान तर आज ज्येष्ठ अभिनेते ऋषी कपूर यांनी दुनियेला अलविदा केलं. ऋषी कपूर यांच्या निधनाने बॉलिवूडसह अनेक क्षेत्रातील दिग्गज गहिवरले आहेत. पाठोपाठ दोन दिग्गज अभिनेत्यांना गमावल्यामुळे बॉलिवूडला मोठा धक्का बसला आहे. सोशल मीडियावर बॉलिवूडकरांनी ऋषी कपूर यांच्या निधनावर शोक व्यक्त केला आहे. ऋषी कपूर यांनी बॉलिवूडला एकापेक्षा एक हिट सिनेमे दिलेत. पहिलाच सिनेमा ‘बॉबी’ सुपरडुपर हिट झाला आणि त्यानंतर अनेक वर्षे ऋषी कपूर यांनी प्रेक्षकांचे मनोरंजन केले.
बिग बी अमिताभ बच्चन आणि ऋषी कपूर यांचं खास नातं होतं. त्यांच्या निधनानं बिग बींना प्रचंड मोठा धक्का बसला आहे. ' आज सकाळीतो निघून गेला…ऋषी कपूर… तो निघून गेला… त्याचा मृत्यु झाला आहे मी खरंच खचलोय, उद्धवस्त झालोय”, असं ट्विट अमिताभ बच्चन यांनी केलं होतं. नंतर त्यांनी ते ट्वीट डिलीट केलं.
भारतरत्न लता मंगेशकर यांना देखील ऋषी कपूर यांच्या जाण्याने धक्का बसला आहे. 'काय बोलू?, काय लिहू काही समजत नाहीये, ऋषीजींच्या जाण्याने खूप दु:ख झाले आहे. त्यांच्या जाण्याने सिनेक्षेत्राची मोठी हानी झालीय. हे दु:ख सहन करणं माझ्यासाठी कठिण आहे. ईश्वर त्यांच्या आत्म्याला शांती प्रदान करो' असं लता मंगेशकर यांनी ट्वीट करत म्हटलं आहे.
अभिनेता आमीर खान यानं देखील ऋषी कपूर यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे. ऋषी कपूर यांच्या निधनाने खूप मोठी हानी झालीय. ते जबरदस्त कलाकार तर होतेच मात्र एक चांगले माणूस देखील होते. आम्हाला आनंद दिल्याबद्दल आभार, तुम्ही आमच्या स्मरणात नेहमी राहाल, असं आमीरने म्हटलं आहे.Kya kahun? Kya likhu kuch samajh mein nahi aaraha hai.Rishi ji ke nidhan se mujhe bahut dukh ho raha hai.Unke jaane se film industry ki bahut haani hui hai. Ye dukh sehena mere liye bahut mushkil hai.Bhagwan unki aatma ko shanti pradan karein.
— Lata Mangeshkar (@mangeshkarlata) April 30, 2020
ज्येष्ठ अभिनेते रजनीकांत यांनी देखील ट्वीट करत ऋषी कपूर यांना आदरांजली अर्पण केलीय. माझ्या प्रिय मित्रा, रेस्ट इन पीस असं त्यांनी ट्वीटमध्ये म्हटलंय.We have lost one of the greats today. An amazing actor, a wonderful human being, and 100% a child of Cinema. Thank you for all the joy you brought to our lives. Thank you for being the actor and human being that you were. You will be badly missed Rishiji. Love. a.
— Aamir Khan (@aamir_khan) April 30, 2020
Heartbroken ... Rest In Peace ... my dearest friend #RishiKapoor
— Rajinikanth (@rajinikanth) April 30, 2020
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
निवडणूक
निवडणूक
बॉलीवूड
Advertisement