Rekha : 'तुझा अभिनय पाहण्यासाठी मी जिवंत आहे'; रेखा यांनी केले बॉलिवूडमधील 'या' अभिनेत्याचं कौतुक
रेखा यांनी बॉलिवूडमधील एका प्रसिद्ध अभिनेत्याचं कौतुक केलं होतं.
Rekha : बॉलिवूडमधील एव्हरग्रीन अभिनेत्री रेखा (Rekha) यांचा चाहता वर्ग मोठा आहे. पार्टी आणि पुरस्कार सोहळ्याला रेखा या उपस्थित असतात. तेथील त्यांच्या रेड कार्पेट लूकला नेटकऱ्यांची नेहमी पसंती मिळते. काही दिवसांवपूर्वी मुंबईमध्ये आयोजित केलेल्या स्टार स्क्रीन अवॉर्ड्स शोमध्ये रेखा यांनी हजेरी लावली होती. या पुरस्कार सोहळ्यामध्ये अनेक सेलिब्रिटी उपस्थित होते. रणवीर सिंह (Ranveer Singh), शाहिद कपूर (Shahid Kapoor), ह्रतिक रोशन (Hrithik Roshan), अनन्या पांडे (Ananya Pandey), मलायका अरोरा (Malaika Arora) यांनी या पुरस्कार सोहळ्यामध्ये हजेरी लावली होती. तेव्हा रेखा यांनी बॉलिवूडमधील एका प्रसिद्ध अभिनेत्याचं कौतुक केलं होतं.
पुरस्कार सोहळ्यामध्ये रेखाला 'गेस्ट ऑफ ऑनर' म्हणून आमंत्रित करण्यात आले होते. जेव्हा रेखा या स्टेजवर गेल्या तेव्हा स्टेजवर रणवीर सिंह हा त्यांच्या स्वागतासाठी उभा होता. त्यावेळी रेखा यांनी रणवीरचं कौतुक केलं होतं. त्या म्हणाल्या होत्या, 'मी रणवीर सिंहचा अभिनय पाहण्यासाठी जिवंत आहे.' रेखा यांनी केलेलं कौतुक ऐकून रणवीरला आनंदी झाला.
रणवीरचा जयेशभाई जोरदार हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. तसेच रॉकी और रानी की प्रेम कहानी या आगामी चित्रपटामध्ये देखील रणवीरनं प्रमुख भूमिका साकारली आहे. रणवीरबोरबरच या चित्रपटामध्ये धर्मेंद्र, शबाना आझमी, आलिया भट आणि जया बच्चन हे कलाकार देखील प्रमुख भूमिका साकारणार आहेत.
महत्वाच्या बातम्या :
- Cannes Film Festival: 75 व्या कान्स फिल्म फेस्टिव्हलच्या ज्युरी मेंबर्सच्या यादीत दीपिकाचं नाव; पोस्ट शेअर करत चाहत्यांना दिली माहिती
- Alia Bhatt : लग्नानंतर आलियाला मिळाली 'गुड न्यूज'; चित्रपटांबरोबरच सोशल मीडियावरही डंका
- Laal Singh Chaddha : आमिर, करिना अन् नागा चैतन्य; 'लाल सिंह चड्ढा' मध्ये काम करण्यासाठी कलाकारांनी घेतले एवढे मानधन
- OM Teaser : 'एक लढाईला जिंकण्यासाठी...'; आदित्यच्या 'ओम' चित्रपटाचा धमाकेदार ट्रेलर रिलीज