Ranu Mondal : रानू मंडलचं बंगाली गाण्यात पदार्पण; बांग्लादेशी सुपरस्टार हिरो आलोमसोबत गायली गाणं, पाहा हा व्हिडीओ
Ranu Mondal new song : आलोम या बंगाली सुपरस्टारबरोबर रानू गाणं गात असल्याचा व्हि़डीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
Ranu Mondal new song : बॉलिवूडच्या गानसम्राज्ञी लता मंगेशर यांचे 'एक प्यार का नगमा है' हे सुपरहिट गाणे गाऊन रातोरात इंटरनेट सेन्सेशन बनलेली रानू मंडल सोशल मीडियावर अनेक कारणांनी चर्चेत राहते. आजकाल ती सोशल मीडियावर सर्वाधिक ट्रेंड होत असलेली गाणी गाताना दिसते. नुकताच रानू मंडलचा एक व्हिडीओ समोर आला आहे. यामध्ये रानू बांग्लादेशी सुपरस्टार आलोमबरोबर गाणं गाताना दिसतेय.
सोशल मीडियावर बांग्लादेशी सुपरस्टार आलोमची मोठी फॅन फॉलोईंग आहे. या सुपरस्टारबरोबर रानू बंगाली गाणं गात असल्याचा व्हि़डीओ नुकताच समोर आला आहे. जे पाहून सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला आहे. वास्तविक हा व्हिडिओ बांग्लादेशी सुपरस्टार हिरो आलोमच्या रेकॉर्डिंग सेशनचा आहे, ज्यामध्ये दोघे बंगाली गाणे 'तुमी चारा अमी' रेकॉर्ड करताना दिसत आहेत.
पाहा हा व्हिडीओ :
गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये बांग्लादेशातील लोकप्रिय व्यक्ती असलेल्या हिरो आलोमने आपल्या फेसबुक हँडलवरून रानू मंडलला सहकार्याची घोषणा केली होती. त्यानंतर आता तिचा हा व्हिडीओ समोर आला आहे, व्हायरल होत असलेल्या क्लिपमध्ये रानू काही प्रश्नांची उत्तरे देताना दिसत आहे. हा व्हिडीओ प्रचंड व्हायरल झाला आहे.
रानू मंडल सुमारे दोन वर्षांपूर्वी राणाघाट रेल्वे स्टेशनवर लता मंगेशर यांचे सुपरहिट गाणे 'एक प्यार का नगमा है' गाताना दिसली होती. या गाण्यानंतर रानू रातोरात इंटरनेट सेन्सेशन बनली आणि तिची सर्वत्र चर्चा होत आहे. यानंतर राणूही अनेक शोमध्ये दिसली, प्रसिद्ध गायक आणि संगीत दिग्दर्शक हिमेश रेशमियाने तिला गाणे रेकॉर्ड करायलाही लावले. त्यानंतर हळूहळू रानूच्या वागण्यामुळे तिच्यावर टीका होऊ लागली आणि ती सोशल मीडियावर रोज ट्रोल होऊ लागली.
महत्वाच्या बातम्या :
- Ranu Mondal : रानू मंडल झाली नवरी, 'कच्चा बदाम' गाण्याचं नवं व्हर्जन गातानाचा व्हिडीओ व्हायरल
- Sher Shivraj : अफजलखानाच्या वधाचा थरार प्रेक्षक अनुभवणार....प्रतापगडाची यशोगाथा 'शेर शिवराज' शुक्रवारी होणार प्रदर्शित
- Ajay Devgn, The Kapil Sharma Show : 'तू चांगले कपडे घालत नाही'; अजय देवगणनं उडवली कपिल शर्माची खिल्ली