Rang Majha Vegla : होळीच्या दिवशी इनामदारांच्या घरात ‘बॉम्ब’ फुटणार! आयेशा-श्वेता दीपासाठी नवा डाव रचणार
Rang Majha Vegla : श्वेताची काळजी घेण्यासाठी दीपाला इनामदारांच्या घरात घेऊन आली आहे. यावेळी दीपा देखील होळी कार्तिक आणि संपूर्ण कुटुंबासोबत साजरी करणार आहे.
Rang Majha Vegla : सध्या सगळीकडे होळीचा (Holi) आणि रंगाच्या सणाची धामधूम दिसतेय. कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव कमी झाल्यानंतर आता सगळीकडे उत्सवाचा माहोल दिसायला लागला आहे. आता हा होळीचा माहोल मराठी मालिकांमध्ये दिसणार नाही, असं होईल का? अर्थात नाही. मनोरंजनविश्वासाठी होळीचा सण म्हणजे प्रेमाच्या रंगांची उधळण. आता मालिकांमध्येही रंगांची उधळण दिसणार आहे.
होळी हे वाईटाच्या विनाशाचं प्रतीक. मात्र, याच सणाच्या दिवशी ‘रंग माझा वेगळा’ (Rang Majha Vegla) मालिकेत एक मोठी घटना पाहायला मिळणार आहे. दीपा आता इनामदारांच्या घरात राहायला आली आहे. गरोदर असणाऱ्या श्वेताची काळजी घेण्यासाठी दीपाला इनामदारांच्या घरात घेऊन आली आहे. यावेळी दीपा देखील होळी कार्तिक आणि संपूर्ण कुटुंबासोबत साजरी करणार आहे.
दीपाच्या होळीला लागणार आयेशा-श्वेताची नजर!
दीपा घरात आली असली तरी श्वेता आणि आयेशा दोघी मिळून तिला घराबाहेर काढण्यासाठी नव नवे डाव रचत आहेत. आधी त्यांनी कार्तिकी-दीपाचा अपमान करण्याचा प्रयत्न केला. मात्र, सौंदर्याने श्वेताला दीपाची माफी मागण्यास भाग पाडले. यानंतर आता दोघींनी मिळून होळीच्या दिवशी दीपाला त्रास देण्यासाठी नवा डाव आखला आहे.
नारळात लावणार बॉम्ब!
इनामदार कुटुंब अतिशय जोशात होळीचा सण साजरा करणार आहेत. यावेळी दीपादेखील त्यांच्यासोबत पूजेत सामील होणार आहेत. मात्र, आयेशा-श्वेता या रंगाचा भंग करणार आहेत. श्वेताने होळीला अर्पण करण्याच्या नारळांपैकी एका नारळामध्ये बॉम्ब दडवला आहे. ती हाच नारळ मुद्दाम दीपाच्या हातात देणार आहे. जेणेकरून दीपा हा नारळ होळीत टाकेल आणि तो बॉम्ब फुटून तिला दुखापत होईल. मात्र, यावेळी दीपिका आणि कार्तिकी नारळ आम्ही टाकणार म्हणून हट्ट करतात.
यावेळी कार्तिकी दीपाच्या हातून नारळ खेचण्याचा प्रयत्न करत असताना, तो खाली पडतो आणि त्याचे दोन तुकडे होतात. यात बॉम्ब असलेला भाग होळीत पडतो आणि तो बॉम्ब फुटतो. यावेळी कार्तिकी या होळीच्या अगदी जवळ असते. आता या बॉम्बने कुणाला दुखापत होणार का? आणि झालीच तर ती व्यक्ती कोण असणार? याकडे प्रेक्षकांचे लक्ष लागले आहे.
हेही वाचा :
- Sarsenapati Hambirrao Release Date : ठरलं! प्रविण तरडेंचा ‘सरसेनापती हंबीरराव’ चित्रपट ‘या’ दिवशी प्रेक्षकांच्या भेटीला येणार
- Happy Birthday Aamir Khan : आयुष्यातील सर्वात महत्वाचं गिफ्ट 'या' व्यक्तीनं दिलं; आमिरनं दिली माहिती
- The Kashmir Files Box Office Collection Day 3: ‘द काश्मीर फाईल्स’ची रेकॉर्ड ब्रेक कमाई, तिसऱ्याच दिवशी जमवला ‘इतक्या’ कोटींचा गल्ला!
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha