Happy Birthday Aamir Khan : आयुष्यातील सर्वात महत्वाचं गिफ्ट 'या' व्यक्तीनं दिलं; आमिरनं दिली माहिती
आमिरनं (Aamir Khan) त्याच्या वाढदिवसानिमित्त पत्रकारांसोबत संवाद साधला. यावेळी त्यानं आयुष्यात मिळालेल्या महत्वाच्या गिफ्टबद्दल सांगितलं.
Aamir Khan : बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेता आमिर खानचा (Aamir Khan) आज 57 वा वाढदिवस. आमिरला मिस्टर परफेक्शनिस्ट देखील म्हटले जाते. वाढदिवसानिमित्त आमिरनं पत्रकारांसोबत संवाद साधला. यावेळी आमिरनं लाल सिंह चड्ढा (Laal Singh Chaddh) या त्याच्या आगामी चित्रपटाच्या रिलीज डेटबाबत सांगितलं. तसेच आमिरनं वाढदिवसाला त्याला मिळालेल्या बेस्ट गिफ्टबाबत देखील सांगितलं.
पत्ररकांसोबत संवाद साधताना आमिर म्हणाला, 'कोरोनामुळे आपल्याला भेटता आलं नाही. तुम्हाला सर्वांना भेटून आनंद झाला. ' आमिरनं सांगितलं की तो चांगला माणूस होण्याचा प्रयत्न करणार आहे.
आयुष्यातील महत्वाच्या गिफ्टची दिली माहिती
'आयुष्यात सर्वात महत्त्वाचं गिफ्ट किरणने दिलं. ती मला सर्वात जवळून ओळखते. माझ्यात काय कमी आहे, माझ्यात काय सुधारणा आवश्यक आहेत याबद्दल मी विचारणा केली, त्याबद्दल किरणने मला मनापासून सांगितलं आणि तेच गिफ्ट माझ्यासाठी बेस्ट ठरलं', असं आमिरनं सांगितलं. लाल सिंह चड्ढा हा चित्रपट 11 ऑगस्टला रिलीज होणार आहे, अशी माहिती या वेळी आमिरनं दिली.
'कोरोनामुळे मला कळालं की आयुष्यात वेळ महत्वाची आहे. त्यामुळे जवळच्या व्यक्तींसोबत राहण्याचा प्रयत्न मी करणार आहे, मला परेक्शनिस्ट हे टायटल तुम्ही दिले. पण मी स्वत:ला बदलण्याचा प्रयत्न करत आहे.', असं ही आमिरनं सांगितलं.
कश्मीर फाइल्स चित्रपटाच्या टीमचे अभिनंदन करतो: आमिर खान
पत्रकारांनी आमिरला कश्मीर फाइल्स या चित्रपटाबद्दल प्रश्न विचारला तेव्हा तो म्हणाला, 'मी हा चित्रपट अजून पाहिला नाही. मी असं ऐकलं आहे की हा चित्रपट प्रेक्षकांच्या पसंतीस पडत आहे. त्याबद्दल मी टीमचे अभिनंदन करतो.'
महत्वाच्या बातम्या
- Happy Birthday Aamir Khan : दोन घटस्फोट, अफेअरच्या चर्चा, अन् बरचं काही; मिस्टर परफेक्शनिस्टबद्दलच्या 'या' गोष्टी माहितीयेत?
- Kangana Ranaut On The Kashmir Files : 'द कश्मीर फाईल्स' सिनेमावर 'पंगा क्वीन'ने दिली प्रतिक्रिया, म्हणाली...
- Jui Gadkari : जुई गडकरीची पोस्ट चर्चेत; गंभीर आजाराबद्दल दिली माहिती
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha