Ranveer Singh photoshoot : 'मुली करु शकतात मग मुलं का नाही?'; रणवीरच्या न्यूड फोटोशूटवर राम गोपाल वर्माची प्रतिक्रिया
चित्रपट निर्माता राम गोपाल वर्मानं (Ram Gopal Varma) 'गली बॉय' रणवीरला सपोर्ट केला आहे.
Ranveer Singh photoshoot : बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेता रणवीर सिंह (Ranveer Singh) त्याच्या न्यूड फोटोशूटमुळे सध्या चर्चेत आहे. रणवीरने Paper magazine website च्या मॅगझीनच्या कव्हरसाठी न्यूड फोटोशूट केलेय. या रणवीरच्या न्यूड फोटोला कमेंट करुन अनेकांनी रणवीरला ट्रोल केलं आहे. काही नेटकऱ्यांनी तर रणवीरच्या या न्यूड फोटोवर भन्नाट मीम्स तयार केले. न्यूड फोटोशूटप्रकरणी रणवीर सिंह विरोधात चेंबुर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. आता चित्रपट निर्माता राम गोपाल वर्मानं (Ram Gopal Varma) 'गली बॉय' रणवीरला सपोर्ट केला आहे.
हे लैंगिक समानतेचं उदाहरण
राम गोपाल वर्मानं एका मुलाखतीमध्ये सांगितलं की, रणवीरचं हे न्यूड फोटोशूट लैंगिक समानतेचे उत्तक उदाहरण आहे. तो म्हणाला, 'जर मुली बॉडी फ्लॉन्ट करु शकतात तर मुलं का नाहीत? पुरुषांना वेगवेगळ्या पॅरामीटर्समध्ये जज केलं जातं ही एक अतिशय दुहेरी मानसिकता आहे. महिलांना जेवढे अधिकार मिळतात तेवढेच पुरुषांना देखील तेवढाच अधिकार मिळाले पाहिजेत.
मे किंवा जूनमध्ये फोटो रिलीज करण्यात येणार होते
रणवीरने Paper magazine website च्या मॅगझीनच्या कव्हरसाठी न्यूड फोटोशूट केले. रणवीरचे हे न्यूड फोटो सोशल मीडियावर मे किंवा जूनमध्ये रिलीज करण्यात येणार होते. पण रणवीरचा चित्रपट तेव्हा रिलीज करण्यात येणार होता. त्यामुळे फोटोशूटचे फोटो उशीरा रिलीज करण्यात आले. रणवीरच्या आधी अनेक सेलिब्रिटींनी न्यूड फोटोशूट केलं आहे. मिलिंद सोमण, मधु सप्रे, आमिर खान, शर्लिन चोप्रा, पूजा बेदी,सपना भवनानी या सेलिब्रिटींनी न्यूड फोटोशूट केले होते.
अभिनेत्री आलिया भट्टनं रणवीरचं समर्थन केलं. तिनं एका मुलाखतीमध्ये सांगितलं की, 'रणवीरबद्दल कोणतीही वाईट गोष्ट ऐकायला मला आवडणार नाही.' रणवीर आणि आलियाचा ‘रॉकी और रानी की प्रेम कहानी' हा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.
हेही वाचा: