एक्स्प्लोर

Raju Srivastava Health Update : ‘आता एखाद्या चमत्काराचीच अपेक्षा’, सुनील पाल यांनी दिली राजू श्रीवास्तव यांच्या प्रकृतीची माहिती

Raju Srivastava Health Update : कॉमेडियन राजू श्रीवास्तव (Raju Srivastava) यांची प्रकृती अधिकच बिघडत चालल्याची माहिती समोर येत आहे.

Raju Srivastava Health Update : कॉमेडियन राजू श्रीवास्तव (Raju Srivastava) यांची प्रकृती अधिकच बिघडत चालल्याची माहिती समोर येत आहे. हृदयविकाराचा तीव्र झटका येऊन आता एका आठवड्याहून अधिक काळ लोटला असून, राजू श्रीवास्तव यांना अजूनही शुद्ध आलेली नाही. त्यांच्यावर दिल्लीतील एम्स रूग्णालयामध्ये उपचार सुरू असून, काल रात्रीपासून त्यांची प्रकृती अधिक खालावली आहे. त्यांचा रक्तदाबही सातत्याने घसरत आहे. त्यांचा जवळचा मित्र आणि कॉमेडियन सुनील पाल (Sunil Pal) याने राजू यांच्या मेंदूने काम करणे बंद केल्याच्या माहितीची पुष्टी केली आहे.

सध्या सर्वांच्या नजरा राजू श्रीवास्तव यांच्या प्रकृतीकडे लागल्या आहेत. राजू श्रीवास्तव लवकर बरे होऊन घरी परतावे, अशी प्रार्थना सर्वजण करत आहेत. मात्र, कॉमेडियनची अवस्था पाहून सगळेच चाहते चिंतेत पडले आहेत. राजू श्रीवास्तव यांना शुद्धीवर आणण्यासाठी डॉक्टरांची टीम सर्वतोपरी प्रयत्न करत आहे. आता कोलकाता येथून विशेष डॉक्टरांना पाचारण करण्यात आले आहे. ई-टाईम्सच्या बातमीनुसार, डॉ.पद्म श्रीवास्तव यांना कोलकाताहून दिल्लीला बोलावले गेले आहे.

सुनील पाल यांनी दिली हेल्थ अपडेट

नुकताच सुनील पाल यांनी त्यांच्या सोशल मीडिया अकाऊंटवर एक व्हिडीओ शेअर केला होता. या व्हिडीओमध्ये सुनील पाल खूप भावूक झालेले दिसत आहेत आणि त्यांनी चाहत्यांना राजू श्रीवास्तव यांच्यासाठी प्रार्थना करण्यास सांगितले आहे. माध्यमांशी बोलताना त्यांनी म्हटले की, राजू श्रीवास्तव यांच्या मेंदूने काम करणे बंद केले आहे आणि ते कोणतीही प्रतिक्रिया देत नाहीयत. सुनील पाल यांनी सांगितले की, डॉक्टरांनाही आता पुढे काय करावे, हे समजत नाहीय.

सुनील पाल म्हणाले की, राजू श्रीवास्तव फक्त श्वास घेत आहेत, बाकीचे शरीर अजिबात काम करत नाहीय. केवळ त्याचे चाहतेच नाही, तर अनेक सेलिब्रिटीही राजू श्रीवास्तव यांच्यासाठी प्रार्थना करत आहेत. अशोक पंडित, शेखर सुमन आदींनीही सोशल मीडियावर राजू श्रीवास्तव यांच्यासाठी पोस्ट करून त्यांच्या तब्येतीत सुधारणा होण्यासाठी प्रार्थना करण्याची विनंती केली आहे.

नेमकं काय घडलं?

जिममध्ये व्यायाम करत असताना राजू श्रीवास्तव यांची प्रकृती खालावली होती. राजू श्रीवास्तव जिममध्ये कसरत करत होते, तिथे ट्रेडमिलवर धावत असताना त्यांना छातीत दुखू लागले. त्यावेळी त्यांना तत्काळ रुग्णालयात नेण्यात आले. तेव्हापासून राजू श्रीवास्तव बेशुद्ध असून, अद्याप त्यांना शुद्ध आलेले नाही. कॉमेडियनची प्रकृती चिंताजनक असून, सध्या ते व्हेंटिलेटरवर आहेत. दरम्यान राजू यांची अँजिओग्राफी देखील करण्यात आली होती. त्यामध्ये त्यांच्या हृदयात 100% ब्लॉकेज असल्याचे आढळले होते. राजू श्रीवास्तव लवकर बरे व्हावेत, यासाठी देशभरातील चाहते प्रार्थना करत आहेत.

वाचा इतर बातम्या :

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Dharmveer 2 : काय दाढी, काय टक्कल, काय तो टिळा; धर्मवीर २ सिनेमात शहाजी बापूंची भूमिका एकदम ओक्के
काय दाढी, काय टक्कल, काय तो टिळा; धर्मवीर २ सिनेमात शहाजी बापूंची भूमिका एकदम ओक्के
चार आण्याची कोंबडी, बारा आण्याचा मसाला! पुणे मेट्रोचं तिकीट अवघं 15 रुपये, पण पार्किंगसाठी तासाला 35 रुपये
चार आण्याची कोंबडी, बारा आण्याचा मसाला! पुणे मेट्रोचं तिकीट अवघं 15 रुपये, पण पार्किंगसाठी तासाला 35 रुपये
Ahmednagar News : अहमदनगरमध्ये भाजपमधील इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती सुरु असतानाच गोंधळ, दोन गटातील वाद चव्हाट्यावर
अहमदनगरमध्ये भाजपमधील इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती सुरु असतानाच गोंधळ, दोन गटातील वाद चव्हाट्यावर
मोठी बातमी! अजित पवारांना दे धक्का; विलास लांडे तुतारी फुंकणार, शरद पवारांच्या भेटीनंतर फिक्स
मोठी बातमी! अजित पवारांना दे धक्का; विलास लांडे तुतारी फुंकणार, शरद पवारांच्या भेटीनंतर फिक्स
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Amit Shah on Maharashtra Vidhan Sabha : महाराष्ट्रात यंदा महायुतीचे सरकार, मात्रAmit Shah : यंदा महायुतीचं सरकार येईल, 2029 ला एकट्या भाजपच्या जीवावर सरकार करायचंBadlapur Case : फरार आरोपींना जामीन मिळण्याची पोलीस वाट पाहतायत का?Maharashtra Superfast News : सुपरफास्ट बातम्या एका क्लिकवर : 10 October 2024 : 04 PM : ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Dharmveer 2 : काय दाढी, काय टक्कल, काय तो टिळा; धर्मवीर २ सिनेमात शहाजी बापूंची भूमिका एकदम ओक्के
काय दाढी, काय टक्कल, काय तो टिळा; धर्मवीर २ सिनेमात शहाजी बापूंची भूमिका एकदम ओक्के
चार आण्याची कोंबडी, बारा आण्याचा मसाला! पुणे मेट्रोचं तिकीट अवघं 15 रुपये, पण पार्किंगसाठी तासाला 35 रुपये
चार आण्याची कोंबडी, बारा आण्याचा मसाला! पुणे मेट्रोचं तिकीट अवघं 15 रुपये, पण पार्किंगसाठी तासाला 35 रुपये
Ahmednagar News : अहमदनगरमध्ये भाजपमधील इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती सुरु असतानाच गोंधळ, दोन गटातील वाद चव्हाट्यावर
अहमदनगरमध्ये भाजपमधील इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती सुरु असतानाच गोंधळ, दोन गटातील वाद चव्हाट्यावर
मोठी बातमी! अजित पवारांना दे धक्का; विलास लांडे तुतारी फुंकणार, शरद पवारांच्या भेटीनंतर फिक्स
मोठी बातमी! अजित पवारांना दे धक्का; विलास लांडे तुतारी फुंकणार, शरद पवारांच्या भेटीनंतर फिक्स
Gold Rate: भारतात सोनं चांगलंच महागलंय; पण इराणमध्ये 1 तोळ्याची किंमत किती?
भारतात सोनं चांगलंच महागलंय; पण इराणमध्ये 1 तोळ्याची किंमत किती?
Devendra Fadnavis: उद्धव ठाकरेंचा जनाधार संपलाय, पण ओव्हर कॉन्फिडन्समुळे विकेट पडू देऊ नका: देवेंद्र फडणवीस
उद्धव ठाकरेंचा जनाधार संपलाय, पण ओव्हर कॉन्फिडन्समुळे विकेट पडू देऊ नका: देवेंद्र फडणवीस
लाडक्या बहि‍णींची दिवाळी दणक्यात, रक्षाबंधनला 3000, आता भाऊबीजेलाही; अजित दादांचा वादा
लाडक्या बहि‍णींची दिवाळी दणक्यात, रक्षाबंधनला 3000, आता भाऊबीजेलाही; अजित दादांचा वादा
Prakash Ambedkar : फडणवीस-ठाकरे गुप्त भेटीच्या दाव्यानंतर प्रकाश आंबेडकरांचं मोठं वक्तव्य; म्हणाले..
फडणवीस-ठाकरे गुप्त भेटीच्या दाव्यानंतर प्रकाश आंबेडकरांचं मोठं वक्तव्य; म्हणाले..
Embed widget