Majha Katta : आर. अश्विनने संयमी खेरला दिले गोलंदाजीचे धडे, माझा कट्ट्यावर अभिनेत्रीने केला खुलासा
Majha Katta : अभिनेत्री संयमी खेर सध्या घूमर चित्रपटामुळे चर्चेत आहे. या चित्रपटात तिने क्रिकेटरची भूमिका साकारली आहे.
Majha Katta : अभिनेत्री संयमी खेर सध्या घूमर चित्रपटामुळे चर्चेत आहे. या चित्रपटात तिने क्रिकेटरची भूमिका साकारली आहे. लहानपणापासून संयमी क्रिकेट खेळत आली आहे. पण चित्रपटासाठी तिला मेहनत घ्यावी लागली. गोलंदाजीचे धडे घेण्यासाठी संयमीने भारताचा फिरकी गोलंदाज अश्विनची मदत घेतली होती. संयमीने कट्ट्यावर या अनुभवाबाबत सांगितलेय.
अभिनेत्री संयमी खेर आणि निर्माती, दिग्दर्शिका गौरी शिंदे यांनी आज माझा कट्ट्यावर हजेरी लावली. घूमर चित्रपटाच्या प्रमोशनसाठी मराठमोळ्या संयमी खेर आणि गौरी शिंदे यांनी कट्ट्यावर हजेरी लावली. क्रिकेट खेळाडूच्या अभेद्या इच्छाशक्तीची कहानी घुमर या चित्रपटातून दाखवण्यात आली आहे. धेयवेडी मुलगी आपलं स्वप्न पूर्ण करण्यासाठी किती टोकाचा संघर्ष करु शकते, याचीच गोष्ट या चित्रपटातून अभिषेक बच्चन आणि संयमी खेर यांच्या माध्यमातून उतरवली आहे.
गौरी शिंदे काय म्हणाल्या -
घूमर चित्रपटासाठी मी फक्त निर्माती आहे. घुमर चित्रपटाची कथा चांगली आहे. गेल्या काही दिवसांपासून मी लिखान करत आहे. पण अद्याप इन्ट्रेस्टिंग मिळालेले नाही. काहीतरी चांगले मिळाल्याशिवाय करण्यात रस नाही, असे गौरी शिंदे म्हणाल्या. नेहमी वेगळा चित्रपट करण्याचा विचार असतो. 2019 मध्ये स्टोरी लिहिली होती. पण 2020 मध्ये कोरोना आला, त्यामुळे चित्रपट तयार नाही झाला. दोन वर्षांमध्ये खूप बदल झाला. त्या कथनकाला बाजूला ठवेलेय.
घुमर चित्रपटासाठी संयमीने कशी मेहनत घेतली -
घुमर माझ्यासाठी खास चित्रपट आहे. गौरीच्या वाढदिवसाला आम्ही मुळशीमध्ये गेलो होतो. तिथे आम्ही क्रिकेट खेळत होतो. त्यावेळी बाल्की यांनी मला क्रिकेट खेळताना पाहिले. त्यांच्या डोक्यात आधीच घुमरची स्क्रीप्ट होतीच. मला क्रिकेट खेळताना बाल्की यांनी पाहिल्यानंतर घूमर या चित्रपटासाठी निवड केली, असे संयमी खेर हिने सांगितले. घूमर चित्रपटात अभिषक बच्चन याने क्रिकेटमधील कोचची भूमिका साकारली आहे, असेही खेर म्हणाली.
संयमी आठ प्रकारच्या खेळात तरबेज -
संयमी क्रिकेट, बॅडमिंटन, स्विमिंगसह आठ खेळ कॉलेजसाठी खेळली आहे. शाळा बंक करण्यासाठी क्रिकेट खेळण्यासाठी सुरुवात झाली होती. क्रिकेट माझ्यासाठी लाईफ आहे. सचिन तेंडुलकर सर्वांसाठी देवच आहे. क्रिकेटची आवड लहानपनापासूनच होती.
अश्विनकडून घेतले गोलंदाजीचे धडे -
आर. अश्विन आणि मुरली कार्तिक यांच्याकडून गोलंदाजीचे धडे घतले. मी उजव्या हाताने लहानपणापासून खेळत आलेय. पण चित्रपटासाठी मला डाव्या हाताने गोलंदाजी करावी लागत होती. यासाठी मी आर. अश्विन आणि मुरली कार्तिक यांच्याकडून मदत घेतली. गोलंदाजी करतानाचे व्हिडीओ मी अश्विन याला पाठवत होती. तो मला काय बदल करायला हवा, ते सांगत होता. टेक्निकली क्रिकेट शिकण्यासाठी त्यांच्याकडून धडे घेतले. मी डाव्या हाताने चायनामन आणि गुगली गोलंदाजी केली. चेंडूही फरकी घेत होता, असे संयमी खेर हिने आपला अनुभव सांगितला. तू आयपीएलमध्ये का खेळत नाही, असा प्रश्न विचारल्यावर संयमी म्हणाली की, किरण मोरे यांनी क्रिकेटच्या सिलेक्शनसाठी मला बोलवले होते. पण दोन्ही एकत्र करणं शक्य नाही.
नाशिकची संयमी खेर आणि पुण्याची गौरी शिंदे यांच्याबद्दल -
संयमी खेर हिने मिर्झा सिनेमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. त्यानंतर तिने माऊली आणि इतर अनेक चित्रपटात अभिनय केला आहे. संयमीने आतापर्यंत वेगवेगळ्या धाटनीची पात्रे साकारली आहेत. आता घुमरमधून हात गमावलेल्या क्रिकेटरची गोष्ट पडद्यावर उतरवणार आहे. घुमर चित्रपटाची निर्मीती गौरी शिंदे यांनी केली आहे. गौरी शिंदे यांनी याआधी डिअर जिंदगी आणि इंग्लिश विंग्लिश यासारखे चित्रपट दिग्दर्शित केले आहेत. बॉलिवूडमध्ये स्त्रीप्रदान आणि संवेदनशील विषय नेमक्या पद्धतीने हातळणे, ही गौरी शिंदे यांची खासियत आहे.