शिल्पा शेट्टीला मोठा दिलासा! कोर्टाकडून फौजदारी खटला रद्द, नेमकं प्रकरण काय?
Shilpa Shetty : बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीला राजस्थान कोर्टाकडून मोठा दिलासा मिळाला आहे.
Shilpa Shetty Gets Relief From Rajasthan High Court: बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टी (Shilpa Shetty) राजस्थान उच्च न्यायालयाने मोठा दिलासा दिला आहे. कारण राजस्थान हायकोर्टाने शिल्पा शेट्टीविरोधात दाखल केलेला एफआयआर रद्द केला आहे. एका टिव्ही शोमध्ये दिलेल्या मुलाखतीत जातीय सूचक भाषा वापरल्याबद्दल सलमान खान आणि शिल्पा शेट्टी यांच्याविरुद्ध राजस्थानच्या चुरू पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
पण आता राजस्थान उच्च न्यायालयाने अभिनेत्री शिल्पा शेट्टीवरील फौजदारी खटला रद्द केला आहे. शिल्पा शेट्टीविरोधात 2017 मध्ये गुन्हा दाखल करण्यात आला होता. शिल्पा शेट्टीने 2013मधील एका मुलाखतीमध्ये आक्षेपार्ह शब्द वापरला होता. यावेळी तिच्यासोबत अभिनेता सलमान खानही उपस्थित होता. राजस्थान उच्च न्यायालयातील वकील प्रशांत पाटील यांनी सर्वोच्च न्यायालयाच्या एका जुन्या आदेशाचा यावेळी हवाला दिला.
वकिलांनी काय म्हटलं?
या प्रकरणी अभिनेत्री शिल्पा शेट्टीने आधीच माफी मागितली आहे. त्यामुळे तिने केलेल्या वक्तव्याचा विपर्ययास करण्यात आल्याचं वकिलांनी यावेळी म्हटलं आहे. राजस्थान हायकोर्टाने वकिलांचा युक्तिवाद ग्राह्य धरत शिल्पा शेट्टीला मोठा दिलासा देण्यात आला आहे. त्याचप्रमाणे तिच्याविरोधातला एफआयआर देखील रद्द करण्यात आलाय.
शिल्पा शेट्टीचा विपर्यास
शिल्पा शेट्टी ही 90च्या दशकातील लोकप्रिय अभिनेत्री आहे. तिने तिच्या करिअरमध्ये अनेक हिट सिनेमांमधून कामं केली आहेत. शिल्पा शेट्टीने तिच्या करिअरमध्ये अनेक हिट सिनेमे दिले आहेत. तिने बरेच डान्स रिऍलिटी शोमध्ये परीक्षकाची देखील भूमिका निभावली आहे.
ही बातमी वाचा :
Marathi actress : 'लग्न करताना जात बदलण्याची सोय...', मराठी अभिनेत्रीच्या पोस्टने वेधलं लक्ष