Prabhas Wedding : ‘डार्लिंग’ प्रभास अजूनही अविवाहित का? पाहा काय म्हणाला ‘बाहुबली’...
Prabhas : सध्या प्रभास त्याच्या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. या दरम्यान तो माध्यमांना मुलाखती देखील देत आहे. यावेळी एका मुलाखतीत त्याने आपल्या लग्नाबद्दल देखील खुलासा केला.
Prabhas : सध्या सिनेसृष्टीतील ‘मोस्ट एलिजिबल बॅचलर’च्या यादीत अभिनेता प्रभास (Prabhas) आघाडीवर आहे. प्रभासच्या लग्नाच्या बातमीची लाखो चाहते वाट पाहत आहेत. पण, प्रभास चाहत्यांना आणखी काही काळ ताटकळत ठेवणार, असे वाटेत आहे. त्याचा आगामी ‘राधे श्याम’ (Radhe Shyam) हा चित्रपट सध्या प्रचंड चर्चेत आहे. सोशल मीडियावर लोक चित्रपटाचा ट्रेलर पाहून त्याच्या रिलीजची आतुरतेने वाट पाहत आहेत.
सध्या प्रभास त्याच्या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. या दरम्यान तो माध्यमांना मुलाखती देखील देत आहे. यावेळी एका मुलाखतीत त्याने आपल्या लग्नाबद्दल देखील खुलासा केला. अद्याप लग्न का केलं नाहीस, असा प्रश्न प्रभासला विचारला गेला. यावर उत्तर देताना प्रभासने सांगितले की, त्याचा प्रेमाबाबतचा अंदाज नेहमीच चुकीचा ठरतो, त्यामुळे त्याने अद्याप लग्न केलेले नाही.
आईचा लग्नासाठी तगादा!
पॅन इंडियाचा स्टार प्रभासने असाही खुलासा केला आहे की, त्याच्या आईने त्याला लग्नासाठी अनेकदा विचारले आहे. तो म्हणतो, ‘या गोष्टी घरात नेहमीच घडतात. ही एक अतिशय सामान्य गोष्ट आहे. आपल्या मुलाने लग्न करावे, त्याला मुले व्हावीत अशी प्रत्येक आईची इच्छा असते.’ अभिनेत्याची आई त्याला नेहमी सेटल होण्यास सांगत असते. ‘बाहुबली’दरम्यान देखील त्याची आई लग्नासाठी आग्रह करत होती.
‘राधे श्याम’ची प्रतीक्षा!
दाक्षिणात्य सुपरस्टार प्रभास 'राधे श्याम' चित्रपटात मुख्य भूमिकेत झळकणार आहे. प्रभाससोबत पूजा हेडगेदेखील (Pooja Hegde) मुख्य भूमिकेत आहे. हा चित्रपट तामिळ, तेलुगू, मल्याळम आणि हिंदी भाषेत प्रदर्शित होणार आहे. त्यामुळे प्रभासचे चाहते ‘राधे श्याम’ चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत आहेत. 'राधे श्याम' चित्रपट जानेवारीच्या सुरुवातील प्रदर्शित होणार होता. पण कोरोनामुळे चित्रपटाची रिलीज डेट पुढे ढकलण्यात आली. आता हा चित्रपट 11 मार्च 2022 रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
हेही वाचा :
- Pawankhind : 'पावनखिंड' ला मिळालेल्या प्रतिसादावर चिन्मय मांडलेकरची भावनिक पोस्ट ; म्हणाला, 'आम्ही धन्य झालो!'
- Gangubai Kathiawadi : कोण आहे 'गंगूबाई काठियावाडी' मधील शांतनु महेश्वरी ? आलियासोबतच्या केमिस्ट्रीमुळे चर्चेत
- Majhi Tujhi Reshmigath : ‘मैं भी गुलाबी तू है गुलाबी...’, प्रेमाच्या धाग्याने विणली जाणार यश-नेहाची रेशीमगाठ!
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha