Pushpa 2 Box Office Collection Day 7: आठवड्याभरातच सगळ्यात जास्त कमाई करणारा चौथा मोठा सिनेमा, 'पुष्पा 2' ने 'कल्कि'चाही रेकॉर्ड मोडला
Pushpa 2 Box Office Collection Day 7: 'पुष्पा 2: द रुल'ने आता प्रभासच्या 'कल्की 2898 एडी'ला मागे टाकले आहे. अल्लू अर्जुनचा चित्रपट एका आठवड्यात सर्वाधिक कमाई करणारा भारतातील चौथा चित्रपट ठरला आहे.
Pushpa 2 The Rule Box Office Collection Day 7: अल्लू अर्जुनचा (Allu Arjun) 'पुष्पा 2: द रुल' (Pushpa 2 The Rule) बॉक्स ऑफिसवर दररोज एकामागून एक रेकॉर्ड मोडीत काढत आहे. भारतातील सर्वाधिक कमाई करणाऱ्या चित्रपटांच्या यादीत हा सिनेमा लवकरच अव्वल स्थानी येईल असंही सांगण्यात येत आहे. बॉक्स ऑफिसवर (Box Office) दररोज करोडोंची कमाई करणाऱ्या 'पुष्पा 2: द रुल'ने आता प्रभासच्या 'कल्की 2898 एडी'ला मागे टाकले आहे.
'पुष्पा 2: द रुल' ने पहिल्या दिवशी पेड प्रीव्यूहसह 174.95 कोटी रुपयांनी जबरदस्त ओपनिंग केली होती. चित्रपटाने दुसऱ्या दिवशी 93.8 कोटी रुपये, तिसऱ्या दिवशी 119.25 कोटी रुपये आणि चौथ्या दिवशी 141.05 कोटी रुपयांची कमाई केली आहे. 'पुष्पा 2: द रुल'चे कलेक्शन पाचव्या दिवशी 64.45 कोटी रुपये आणि सहाव्या दिवशी 51.55 कोटी रुपये होते. आता सातव्या दिवशी या चित्रपटाने आतापर्यंत (रात्री 10 वाजेपर्यंत) 41 कोटींची कमाई केली आहे.
पुष्पाने कल्किलाही मागे टाकलं
'पुष्पा 2: द रुल' ने देशांतर्गत बॉक्स ऑफिसवर एका आठवड्यात एकूण 686 कोटींची कमाई केली आहे. यासह अल्लू अर्जुनच्या चित्रपटाने यावर्षी प्रदर्शित झालेल्या प्रभासच्या 'कल्की 2898 एडी' या चित्रपटाला मागे टाकले आहे. 'कल्की 2898 एडी'ने भारतात एकूण 646.31 कोटी रुपयांचा व्यवसाय केला. 'पुष्पा 2: द रुल'ने हा आकडा ओलांडला आहे आणि आता हा भारतातील चौथा सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट ठरला आहे.
जगभरातील 1000 कोटी क्लबमध्ये 'पुष्पा 2: द रुल'ची एन्ट्री
'पुष्पा 2: द रुल'चे दिग्दर्शन सुकुमार यांनी केले आहे. या चित्रपटाला जगभरात प्रचंड लोकप्रियताही मिळत आहे. अल्लू अर्जुन स्टारर या चित्रपटाने अवघ्या 6 दिवसांत जगभरात 1000 कोटींहून अधिक कमाई केली आहे.
पुष्पा 2 जवळपास 500 कोटी रुपयांमध्ये बनवण्यात आला असून या चित्रपटाने हे बजेट ओलांडले आहे. लवकरच हा चित्रपट 1000 कोटींचा आकडा गाठेल अशी अपेक्षा आहे.पुष्पा 2 चे दिग्दर्शन दिग्दर्शक सुकुमार यांनी केले आहे. त्याने या चित्रपटाचा पहिला भाग 2021 साली बनवला जो ब्लॉकबस्टर ठरला. त्या चित्रपटाप्रमाणे या चित्रपटातही अल्लू अर्जुन, रश्मिका मंदान्ना आणि फहद फासिल यांनी महत्त्वाच्या भूमिका साकारल्या आहेत.