Pushpa 2 Box Office Collection Worldwide: झुकेगा नहीं साला! अवघ्या तीनच दिवसांत जगभरात कमावले 500 कोटी, पुष्पा 2 ची बॉक्स ऑफिसवर यशस्वी घोडदौड
Pushpa 2 Box Office Collection Worldwide: 'पुष्पा 2' सिनेमा हा सर्वात जलद जगभरातील बॉक्स ऑफिसवर 500 कोटींची कमाई करणारा पहिला सिनेमा ठरला आहे.
Pushpa 2 Box Office Collection Worldwide: बॉक्स ऑफिसवर (Box Office Collection) अनेक दिवसांपासून प्रतीक्षा असलेला पुष्पा 2 (Pushpa 2) सिनेमा प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत असल्याचं चित्र आहे. अवघ्या तीनच दिवसांतच बॉक्स ऑफिसवर या सिनेमाने 300 कोटींची कमाई केली आहे. त्यातच आता जगभरातील बॉक्स ऑफिसवर सर्वात जलद 500 कोटींची कमाई करणारा पुष्पा 2 हा पहिला भारतीय सिनेमा ठरला आहे. त्यामुळे सध्या अल्लू अर्जुनचा (Allu Arjun) हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत असल्याचं चित्र सध्या आहे.
माइथ्री मूवी मेकर्स यांनी त्यांच्या अधिकृत सोशल मीडियावरील अकाऊंटवर यासंदर्भात माहिती दिली आहे. त्यांनी म्हटलं की, पुष्पा 2 ने जगभरात 500 कोटींची कमाई केली आहे. तसेच सर्वात जलद एवढी कमाई करणारा हा पहिला भारतीय सिनेमा ठरला आहे.
याआधी अॅनिमल सिनेमाने केला होता रेकॉर्ड
रणबीर कपूरचा 2023 मध्ये रिलीज झालेल्या ॲनिमल या चित्रपटाने जगभरात बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला होता. या चित्रपटाने अवघ्या 6 दिवसांत जगभरात 500 कोटींची कमाई केली होती. पुष्पा 2 च्या आधी, रणबीर कपूरच्या ॲनिमलने जगभरात सर्वात जलद 500 कोटी कमाई करण्याचा रेकॉर्ड केला होता.
पुष्पा 2 ने केले हे रेकॉर्ड्स
पुष्पा 2 हा सर्वात मोठा ओपनिंग करणारा भारतीय चित्रपट ठरला आहे. सॅनसिल्कच्या वृत्तानुसार, चित्रपटाने पहिल्या दिवशी 164.25 कोटींची ओपनिंग करून बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला. तसेच, अल्लू अर्जुनच्या चित्रपटाने पीके, टायगर जिंदा है, लिओ, संजू आणि जेलर सारख्या ब्लॉकबस्टर चित्रपटांच्या आजीवन कलेक्शनला मागे टाकत 3 दिवसात भारतात 380 कोटींहून अधिक कमाई केली आहे.
पुष्पा 2 चे बजेट
पुष्पा 2 जवळपास 500 कोटी रुपयांमध्ये बनवण्यात आला असून या चित्रपटाने हे बजेट ओलांडले आहे. लवकरच हा चित्रपट 1000 कोटींचा आकडा गाठेल अशी अपेक्षा आहे.पुष्पा 2 चे दिग्दर्शन दिग्दर्शक सुकुमार यांनी केले आहे. त्याने या चित्रपटाचा पहिला भाग 2021 साली बनवला जो ब्लॉकबस्टर ठरला. त्या चित्रपटाप्रमाणे या चित्रपटातही अल्लू अर्जुन, रश्मिका मंदान्ना आणि फहद फासिल यांनी महत्त्वाच्या भूमिका साकारल्या आहेत.
View this post on Instagram