पांढऱ्या दाढीतील रहस्यमयी माणूस, भविष्य सांगितलं अन् गायब, विवेक ओबेरॉयने सांगितला भेटलेल्या साधूचा 'तो' प्रसंग!
विवेक ओबेरॉय हा बॉलिवूडमधील मोठा अभिनेता आहे. त्याचे अनेक चित्रपट चांगलेच प्रसिद्ध झालेले आहेत. दरम्यान, त्याने त्याच्या आयुष्यातील एक खास प्रसंग सांगितला आहे.
मुंबई : अभिनेता विवेक ओबेरॉय (Vivek Oberoi) हा असा अभिनेता आहे, ज्याने आपल्या आयुष्यात फार चढ-उतार अनुभवलेले आहेत. हा अभिनेता कोधीकाळी भारतभरात प्रसिद्ध होता. त्याच्या अनेक चित्रपटांनी निर्मात्यांना चांगलेच पैसे कमवून दिले होते. मात्र ज्या वेगाने तो प्रगती, प्रसिद्धीच्या शिखरावर पोहोचला होता, तेवढ्याच वेगाने त्याचा कठीण काळाही चालू झाला. दरम्यान, याच विवेक ओबेरॉयने त्याच्या कठीण काळाबद्दल बोलताना एक अनोखा अनुभव सांगितला. त्याला भेटलेल्या एका पांढ्या दाढीतील एका माणसाबद्दल सांगितलं आहे. विशेष म्हणजे हा माणूस माझ्यासाठी देवासारखा होता, असंही त्यानं म्हटलंय.
विवेक एका सुप्रसिद्ध मंदिरात गेला
विवेक ओबेरायने नुकतेच डॉ. जय मदान यांच्या यूट्यूब चॅनेललला मुलाखत दिली आहे. या मुलाखतीत बोलताना त्यांनी एका रहस्यमयी भेटीबद्दल सांगिलंय. विवेक ओबेरॉय यांनी सांगितल्यानुसार ते 2004 साली दक्षिण भारतात गेले होते. तेथे त्यांची एका रहस्यमयी माणसासोबत भेट झाली होती, असं त्यांनी सांगितलंय. "मी एका वर्षासाठी दक्षिण भारतात राहण्यासाठी गेलो होते. या काळात 2004 साली त्सुनामी आली होती. त्या काळात मी बचावकार्यात सहभागी झालो होते. तिथे एक प्रसिद्ध मंदिर आहे. या मंदिरात मला एक अचंबित करणारा अनुभव आला. मी त्या काळात मानसिकदृष्टीने चिंताग्रस्त होतो. माझ्यापुढे त्या काळात काही अडचणी होत्या. बचावकार्य करताना मी त्सुनामीतून वाचलेल्या लोकांसाठी एक तंबू उभा केला. याच तंबूत मीही राहू लागलो. या काळात मी थोडीसी तमिळ भाषा शिकलो. तेव्हा मला कोणतरी त्या प्रसिद्ध मंदिरात जाण्यास सांगितलं. त्या मंदिरात एक पांढरी दाढी असलेला एक वृद्ध भेटला. त्या वृद्धाने फक्त धोतर नेसलेलं होतं. त्यांनीच मला त्यांच्याकडे बोलवलं होतं," असं विवेक ओबेरॉयने सांगितलं.
मंदिरात भेटली पांढरी दाढी असलेली व्यक्ती
तसेच पुढे बोलताना,"ही वृद्ध व्यक्ती माझ्याशी अस्खलितपणे इंग्रजी बोलत होती. ते मंदिराच्या एका कोपऱ्यात बसलेले होते. त्यांनी मला जवळ बसायला सांगितले आणि तू फार चिंताग्रस्त दिसतो आहेस. तुझा सध्या वाईट काळ चालू आहे. त्यामुळेच तुला या मंदिरा पाठवण्यात आलंय. तुला मोठा आर्थिक फटका बसणार होता. तुझे खूप नुकसान होणार होते. मात्र तू नशिबवान आहेस. तुला जो आर्थिक फटका बसणार होता, तोच पैसा तू बचावकार्यात खर्च करत आहेस. हे तुझं कर्म आहे. तुला तुझ्या कर्माचं फळ नक्की मिळेल, अशी भविष्यवाणीही त्यांनी केली होती," असंही विवेक ओबेरॉयने सांगितले.
View this post on Instagram
त्या व्यक्तीचं गुढ अजूनही कायम
विशेष म्हणजे ही म्हातारी व्यक्ती नंतर गायब झाल्याचंही विवेक ओबेरॉयने सांगितलं. "त्या दाढीवाल्या मृद्ध व्यक्तीने मला काही गोष्टी सांगितल्या. त्यानंतर मला इशाऱ्याने एका दिशेने जाण्यास सांगितले. त्यानंत मी निघून गेलो. मात्र मी परत आलो तेव्हा त्या मंदिरात पांढरी दाढी असलेली ती व्यक्ती नव्हती. मी मंदिराचे रक्षण करणाऱ्याला त्या वृद्धाबाबत विचारले. मात्र मंदिरात तर कोणीही नव्हते, असे मंदिराच्या रक्षणकार्त्याने सांगितले होते. हे सगळं ऐकून मी दंग झाल. मला भेटलेली ती व्यक्ती खरी होती की खोटी, याचा आजही मला प्रश्न पडलेला आहे. ती व्यक्ती कोण होती मला माहिती नाही, पण ती माझ्यासाठी देवासारखीच होती," असंही विवेक ओबेरॉयने सांगितलं.
हेही वाचा :