'माझं दोन-तीन वेळा लैंगिक शोषण अन्...'; सुप्रसिद्ध अभिनेत्यासोबत अनुचित प्रकार, स्वतःच केलाय खळबळजनक खुलासा
Priya Mohan Husband Actor Nihal Pillai On Childhood Abuse: एका युट्यूब व्हिडीओमध्ये निहाल पिल्लईनं खुलासा केला की, त्याला दोनदा अशा प्रकारची अश्लील वागणूक देण्यात आलेली आणि त्यावेळी त्याच्या मनावर झालेला आघात अजूनही त्याला सतावतोय.

Priya Mohan Husband Actor Nihal Pillai On Childhood Abuse: साऊथची सुपरस्टार (South Superstar) अभिनेत्री प्रिया मोहनचे (Priya Mohan) पती आणि पूर्णिमा इंद्रजीतचा (पूर्णिमा इंद्रजीत) मेहुणा, सुप्रसिद्ध अभिनेता निहाल पिल्लई (Actor Nihal Pillai)... पृथ्वीराज सुकुमारन (Prithviraj Sukumaran) यांच्या 'मुंबई पुलिस', 'तियान' यांसारख्या चित्रपटांमध्ये अभिनेत्यानं महत्त्वाच्या भूमिका साकारल्या आहेत. पण, यावेळी तो त्याच्या प्रोफेशनल आयुष्यामुळे नाहीतर, त्याच्या पर्सनल लाईफमुळे चर्चेत आहे. नुकत्याच एका मुलाखतीत बोलताना निहाल पिल्लईनं अत्यंत खळबळजनक खुलासा केला आहे. त्यानं बालपणी त्याच्यासोबत झालेल्या शारीरिक छळाबद्दल सांगितलं आहे.
एका युट्यूब व्हिडीओमध्ये निहाल पिल्लईनं खुलासा केला की, त्याला दोनदा अशा प्रकारची अश्लील वागणूक देण्यात आलेली आणि त्यावेळी त्याच्या मनावर झालेला आघात अजूनही त्याला सतावतोय. इतक्या वर्षांनंतरही बोलण्याचं त्यानं एक विशिष्ट कारण सांगितलं.
अभिनेता निहाल पिल्लई स्वतः 'ओरु हैप्पी फॅमिली' नावाचा युट्यूब चॅनेल चालवतो. त्या माध्यमातून आगामी प्रोजेक्टसह वैयक्तिक आयुष्याबद्दल अपडेट्स देत असतो. अशातच नुकतंच एका व्हिडीओमध्ये अभिनेत्यानं स्वतःच्या आयुष्याबाबत खळबळजनक खुलासा केला आहे. ज्यामध्ये त्यानं बालपणीच्या काही कटू आठवणी सांगितल्या. या व्हिडीओमध्ये अभिनेत्यानं त्याचा लहानपणी लैंगिक छळ झाला होता, असं सांगितलं आहे. आपल्या युट्यूब चॅनेलवर शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये त्यानं म्हटलंय की, लहान असताना त्याच्या घराजवळील एका दुकानदाराकडून त्याला विचित्र अनुभव आला होता. ही आयुष्यातील एक वाईट आठवण आहे, जी कधीच विसरू शकत नाही, असं तो म्हणाला.
View this post on Instagram
अभिनेता निहाल पिल्लई नेमकं काय म्हणाला? (Actor Nihal Pillai On Sexual Abuse)
लहानपणी त्याच्यासोबत घडलेल्या गोष्टींबाबत सांगताना निहाल पिल्लई म्हणाला की, "मी याबद्दल बोलण्याचा निर्णय घेतला कारण माझ्या जवळच्या एका व्यक्तीने त्यांच्या मुलासोबतही असं घडल्याचं सांगितलं. शिवाय हल्ली बाल लैंगिक शोषणाच्या घटना वाढत आहेत. मी सुद्धा अशाच अनुभवातून गेलो आहे. मला कधीच वाटलं नव्हतं की मी याबद्दल बोलेन. माझं दोन-तीन वेळा लैंगिक शोषण झालं आणि त्यापैकी दोन घटना खूप वाईट होत्या."
"माझ्या घराजवळ एक चपलांचं दुकान होतं. त्या दुकानामध्ये एक माणूस काम करायचा. तेव्हा मी साधारण 8-9 वर्षांचा असेन. तेव्हा त्या दुकानातील तो माणूस आम्हाला फुटबॉल स्टिकर्स देतो असं म्हणून बोलावायचा. असंच एकेदिवशी तो आम्हाला म्हणाला, जर आम्ही आत आलो तर तो आम्हाला अजून जास्त स्टिकर्स देईल. आम्ही तीन मुले होतो. त्यानंतर आम्ही दुकानाच्या आत गेलो आणि त्याने आमच्या खाजगी भागांना स्पर्श केला की नाही हे मला नक्की आठवत नाही, पण त्याने दुसऱ्या एका मुलाला आत बोलावून त्याचे शॉर्ट्स ओढण्याचा प्रयत्न केला हे मला आठवते. त्यानंतर आम्ही कधीच तिथे गेलो नाही...", असा धक्कादायक खुलासा निहाल पिल्लईनं आपल्या युट्यूब चॅनेलवर केला.
महत्त्वाच्या इतर बातम्या :























