80s Villain Ranjeet Daughter Divyanka Bedi: ऐंशीच्या दशकातल्या खुंखार विलनची अप्सरेसारखी सुंदर मुलगी; अभिनय सोडून निवडला भलताच मार्ग, आज वडिलांना वाटतोय गर्व
80s Villain Ranjeet Daughter Divyanka Bedi : कधीकाळी रुपेरी पडदा गाजवणाऱ्या कलाकारांची मुलंही त्यांच्या पावलावर पाऊल ठेवत, इंडस्ट्रीत येतात. पण, काही स्टार किड्स असेही आहेत, जे आपला वेगळा मार्ग निवडतात.

80s Villain Ranjeet Daughter Divyanka Bedi: ऐंशी आणि नव्वदच्या दशकात असे अनेक खलनायक होते, ज्यांनी पडद्यावरच्या त्यांच्या खुंखार रुपानं सर्वांना खिळवून ठेवलेलं. त्यांचं उग्र रूप, भयावह अंदाज प्रेक्षकांना खूप आवडायचा. कित्येक सिनेमे तर हिरोपेक्षा, विलन कोण आहे? यावरुन चालायचे. यापैकीच एक नाव म्हणजे, रणजीत (Ranjeet).
सर्वात क्रूर आणि खतरनाक खलनायकांपैकी एक, रणजीत यांनी असंख्य चित्रपटांमध्ये नकारात्मक भूमिका साकारल्यात, ज्या अजूनही प्रेक्षकांच्या मनात भीती निर्माण करतात आणि हिरोपेक्षाही जास्त प्रसिद्धी मिळवतात. हा विलन हिंदी चित्रपटसृष्टीतील (Hindi Movies) त्याच्या अनोख्या विनोदी शैलीसाठी देखील ओळखला जातो, पण या खतरनाक विलनच्या मुलीनं मात्र फिल्म इंडस्ट्रीपासून दूर राहण्याचं ठरवलं आणि आपली वेगळी वाट धरुन स्वतःला ग्लॅमरस जगापासून खूप दूर ठेवलं. खतरनाक विलन असलेल्या शक्ती कपूर यांची मुलगी श्रद्धा कपूर आज बॉलिवूडची टॉप स्टार आहे, पण शक्ती कपूर यांच्याच पिढीतले विलन असलेल्या रणजीत यांची मुलगी अभियन सोडून दुसऱ्याच क्षेत्रात आपलं वर्चस्व गाजवत आहे.
अभिनय सोडून निवडला दुसरा मार्ग (Divyanka Bedi Left Acting Chose Another Path)
कधीकाळी रुपेरी पडदा गाजवणाऱ्या कलाकारांची मुलंही त्यांच्या पावलावर पाऊल ठेवत, इंडस्ट्रीत येतात. पण, काही स्टार किड्स असेही आहेत, जे आपला वेगळा मार्ग निवडतात. रणजीत यांच्या मुलीनंही वेगळा मार्ग निवडला आणि अभिनयाच्या जगात प्रवेश करण्याचा निर्णय घेतला. त्यांची मुलगी दिव्यांका (Divyanka Bedi), इतर स्टार किड्सप्रमाणे, सिनेक्षेत्रात आली नाही, पण दिव्यांका बेदी सोशल मीडियावर बरीच सक्रिय आहे.
विलन रणजीत यांची मुलगी नेमकं करतेय काय? (Bollywood Actor Ranjeet Daughter Divyanka Bedi)
रणजीत यांची मुलगी दिव्यांकानं आपल्या इन्स्टा बायोमध्ये लिहिलंय की, ती ज्वेलरी डिझायनर आहे. या फिल्डमध्ये ती बऱ्याच काळापासून अॅक्टिव्ह आहे. ज्वेलरी डिझायनिंगसोबत ती फॅशन डिझायनिंगही करते. तिच्या सोशल मीडियावरच्या पोस्ट पाहून हे स्पष्ट होतं की, ती फिटनेस फ्रिक आहे. ती आपलं जिम आणि वर्कआउटचे अनेक व्हिडीओ आणि फोटो सोशल मीडियावर शेअर करत असते. तिच्या इंस्टाग्रामवर उत्तम फॉलोअर्स आहेत.
बिग बॉस 8 मध्ये दिसलेला खुंखार विलन (Bollywood Actor Ranjeet)
रणजीत यांनी आपल्या करिअरमध्ये अनेक भूमिका साकारल्यात, पण त्यांना खरी ओळख मिळाली ती, खलनायकाच्या भूमिकांनीच. त्यांनी इंडस्ट्री आपली सुरुवात विलनच्या रुपात केलेली. ज्यामध्ये 200 हून अधिक फिल्म्समध्ये त्यांनी काम केलेलं. 1971 मध्ये 'शर्मीली' सिनेमातून विलनच्या रुपाय त्यांना खरी ओळख मिळाली आणि त्यानंतर 'नमक हलाल', 'जालिम' आणि 'जिम्मेदार' यांसारख्या सिनेमांमध्ये त्यांनी दमदार भूमिकांनी प्रेक्षकांना आपलंसं केलं. रणजीत 2024 मध्ये रिअॅलिटी टेलिव्हिजन शो 'बिग बॉस 8'मध्ये एक स्पर्धक म्हणून दिसलेले.
महत्त्वाच्या इतर बातम्या :























