एक्स्प्लोर

Tujha Laal Dupatta : ‘तुझा लाल दुपट्टा’ची सोशल मीडियावर हवा! बॉलिवूडचा फिल देणारं प्रशांत नाकतीचं नवं गाणं प्रेक्षकांच्या भेटीला

Tujha Laal Dupatta : निखिल नमित आणि प्रशांत नाकती निर्मित ‘तुझा लाल दुपट्टा’ (Tujha Laal Dupatta) हे नवीन रोमँटिक गाणं लवकरच ‘नादखुळा म्युझिक’ या युट्युब चॅनेलवर पाहायला मिळणार आहे.

Tujha Laal Dupatta : प्रशांत नाकती (Prashant Nakti ) यांच्या प्रॉडक्शन हाऊसने त्यांच्या नावासारखंच संपूर्ण महाराष्ट्राला मराठी गाण्यांच्या माध्यमातून ‘नादखुळा’ केलं आहे. प्रशांत नाकती यांना संगीत विश्वातील ‘मिलिनिअर’ का म्हणतात हे सर्वांनाच ठाऊक आहे, त्यांच्या गाण्याला महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यातील प्रेक्षकांकडून मिलिअन प्रेम मिळाले आहे आणि त्या प्रेक्षकांच्या प्रेमाखातरच ते नवनवीन गाणी तयार करतात. असंच एक त्यांचं नवीन गाणं लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येतंय.

निखिल नमित आणि प्रशांत नाकती निर्मित ‘तुझा लाल दुपट्टा’ (Tujha Laal Dupatta) हे नवीन रोमँटिक गाणं लवकरच ‘नादखुळा म्युझिक’ या युट्युब चॅनेलवर पाहायला मिळणार आहे. बऱ्याच विशेष कारणांमुळे हे गाणं अतिशय विशेष ठरलं आहे. त्यातील पहिलं विशेष कारण म्हणजे या गाण्याच्या निमित्ताने बॉलिवूडचा गायक नकाश अजीज आणि प्रशांत नाकती पहिल्यांदा एकत्र आले आहेत. नकाश अजीजने हे गाणं गायले असून, मोस्ट पॉप्युलर, जिचा आवाज सतत कानावर पडत राहावा असं वाटतं, जिचे सूर थेट मनाला भिडतात अशी गायिका सोनाली सोनावणेने त्याला साथ दिली आहे.

निक शिंदे- तृप्ती राणेची जोडी झळकणार!

आणखी विशेष कारण असं की, या गाण्यात युथ स्टार निक शिंदे आणि ‘बनी’ उर्फ तृप्ती राणे ही जोडी पहिल्यांदा एकत्र दिसणार आहे. हे गाणं अगदी रोमँटिक, प्रेमळ असं आहे ज्यात प्रेमाच्या भावना आहेत, सुंदर असा डान्स आहे आणि जोडीला बॉलिवूडचा फिल देणारे व्हाईब्स आहेत.

पाहा गाणे :

‘तुझा लाल दुपट्टा’ हे गाणं देखील मॅजिकलच असणार आहे, कारण या गाण्याचे बोल प्रशांत यांनी लिहिले असून संगीतही त्यांनीच दिले आहे. प्रशांत नाकती यांची गाणी जशी ऐकण्यास खूप छान वाटतात, तशीच तिला पाहण्यात देखील एक वेगळीच मजा असते. नाशिकमध्ये शूट झालेल्या या गाण्याचे दिग्दर्शन सचिन कांबळे यांनी केले आहे. म्युझिक अरेंजरची जबाबदारी संकेत गुरवने पार पाडली असून, रोहित जाधव आणि स्वप्नील पाटील यांनी प्रॉडक्शनचे काम पाहिले आहे.

गेले कित्येक वर्षांच्या मिलिअनच्या परंपरेनुसार, यंदाच्या वर्षीचं ‘तुझा लाल दुपट्टा’ हे गाणं पण मिलिअन पटीने वाजणार आणि गाजणार सुध्दा याची खात्री आहे.

हेही वाचा :

Entertainment News Live Updates 4 July : टीव्हीपासून ते बॉलिवूडपर्यंत... मनोरंजन विश्वात काय घडतंय जाणून घ्या एका क्लिकवर!

TOP 10 Entertainment News : दिवसभरातील दहा महत्त्वाच्या मनोरंजनविषयक बातम्या

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

मावळमधील जमीनीवर विनापरवाना उत्खनन, हजारो झाडांची कत्तल; आमदार सुनील शेळकेंच्या नातेवाईकांवर गंभीर आरोप
मावळमधील जमिनीवर विनापरवाना उत्खनन, हजारो झाडांची कत्तल; आमदार सुनील शेळकेंच्या नातेवाईकांवर गंभीर आरोप
Manikrao Kokate : माणिकराव कोकाटेंच्या राजीनाम्याला विलंब का? शशिकांत शिदेंनी भाजप- सेनेंच्या मंत्र्यांवरील आरोपांचा संदर्भ सांगितला
माणिकराव कोकाटेंच्या राजीनाम्याला विलंब का? शशिकांत शिदेंनी भाजप- सेनेंच्या मंत्र्यांवरील आरोपांचा संदर्भ सांगितला
गुटखा विकणाऱ्यांवर नव्या वर्षात थेट मोक्का; 'हार्म आणि हर्ट'नुसार कायद्यात बदल, नरहरी झिरवळांनी स्पष्टच सांगितलं
गुटखा विकणाऱ्यांवर नव्या वर्षात थेट मोक्का; 'हार्म आणि हर्ट'नुसार कायद्यात बदल, नरहरी झिरवळांनी स्पष्टच सांगितलं
Crime News: आई होण्यासाठी मला मदत करा अन् 25 लाख मिळवा; सायबर चोरट्यांकडून प्रेग्नन्सी मेसेजचा फ्रॉड, तुम्हीही सावधान !
आई होण्यासाठी मला मदत करा अन् 25 लाख मिळवा; सायबर चोरट्यांकडून प्रेग्नन्सी मेसेजचा फ्रॉड, तुम्हीही सावधान !

व्हिडीओ

Manikrao Kokate Resign : फडणवीसांची शिफारस, मंत्रिपद काढलं; माणिकराव कोकाटे बिनखात्याचे मंत्री
Manikrao Kokate Resign : माणिकराव कोकाटे यांचा मंत्रिपदाचा राजीनामा : ABP Majha
Eknath Shinde Brother Drugs Case : 115 कोटींचं ड्रग्ज...सावरी गाव अन् शिंदे; अंधारेंचे खळबळजनक दावे
Manikrao Kokate News Update : कोकाटेंचं मंत्रिपद जाणार, आमदारकीही रद्द होणार?
Dhananjay Munde meet Amit shah : कोकाटे आऊट, मुंडे इन? ; धनंजय मुंडेंनी घेतली अमित शाहांची भेट

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
मावळमधील जमीनीवर विनापरवाना उत्खनन, हजारो झाडांची कत्तल; आमदार सुनील शेळकेंच्या नातेवाईकांवर गंभीर आरोप
मावळमधील जमिनीवर विनापरवाना उत्खनन, हजारो झाडांची कत्तल; आमदार सुनील शेळकेंच्या नातेवाईकांवर गंभीर आरोप
Manikrao Kokate : माणिकराव कोकाटेंच्या राजीनाम्याला विलंब का? शशिकांत शिदेंनी भाजप- सेनेंच्या मंत्र्यांवरील आरोपांचा संदर्भ सांगितला
माणिकराव कोकाटेंच्या राजीनाम्याला विलंब का? शशिकांत शिदेंनी भाजप- सेनेंच्या मंत्र्यांवरील आरोपांचा संदर्भ सांगितला
गुटखा विकणाऱ्यांवर नव्या वर्षात थेट मोक्का; 'हार्म आणि हर्ट'नुसार कायद्यात बदल, नरहरी झिरवळांनी स्पष्टच सांगितलं
गुटखा विकणाऱ्यांवर नव्या वर्षात थेट मोक्का; 'हार्म आणि हर्ट'नुसार कायद्यात बदल, नरहरी झिरवळांनी स्पष्टच सांगितलं
Crime News: आई होण्यासाठी मला मदत करा अन् 25 लाख मिळवा; सायबर चोरट्यांकडून प्रेग्नन्सी मेसेजचा फ्रॉड, तुम्हीही सावधान !
आई होण्यासाठी मला मदत करा अन् 25 लाख मिळवा; सायबर चोरट्यांकडून प्रेग्नन्सी मेसेजचा फ्रॉड, तुम्हीही सावधान !
मोठी बातमी! क्रीडामंत्री माणिकराव कोकाटेंचा राजीनामा; राज्यपालांकडूनही मंजूर, खाते अजित पवारांकडे वर्ग
मोठी बातमी! क्रीडामंत्री माणिकराव कोकाटेंचा राजीनामा; राज्यपालांकडूनही मंजूर, खाते अजित पवारांकडे वर्ग
अजित पवारांचा आणखी एक आमदार अडचणीत, पोलिसांनी शिवीगाळ भोवली; कारेमोरेंना कोर्टाकडून 2 वर्षांची तंबी
अजित पवारांचा आणखी एक आमदार अडचणीत, पोलिसांनी शिवीगाळ भोवली; कारेमोरेंना कोर्टाकडून 2 वर्षांची तंबी
Share Market Update : शेअर बाजारात सलग तिसऱ्या दिवशी घसरण, गुंतवणूकदारांचे एका दिवसात 1.6 लाख कोटी स्वाहा
सेन्सेक्स- निफ्टीमध्ये सलग तिसऱ्या दिवशी घसरण, भारतीय गुंतवणूकदारांचे 1.6 लाख कोटी बुडाले
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 17 डिसेंबर 2025 | बुधवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 17 डिसेंबर 2025 | बुधवार
Embed widget