एक्स्प्लोर

Entertainment News Live Updates 4 July : टीव्हीपासून ते बॉलिवूडपर्यंत... मनोरंजन विश्वात काय घडतंय जाणून घ्या एका क्लिकवर!

Entertainment Live : मनोरंजन विश्वात सध्या काय नवं घडतंय, याची देखील सर्वांनाच उत्सुकत असतेच. या माध्यमातून अशाच काही चटपटीत बातम्या आम्ही सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोहचवणार आहोत.

LIVE

Key Events
Entertainment News Live Updates 4 July : टीव्हीपासून ते बॉलिवूडपर्यंत... मनोरंजन विश्वात काय घडतंय जाणून घ्या एका क्लिकवर!

Background

Entertainment Live : मनोरंजन विश्व म्हटलं की, रोज नवनवे गॉसिप हे आलेच. याशिवाय रोज मालिकांमध्ये काय घडतंय? बॉलिवूड विश्वात सध्या काय सुरु आहे? आपल्या लाडक्या अभिनेत्री आणि अभिनेत्यांच्या आयुष्यात काय सुरु आहे, या सगळ्याची संपूर्ण आणि जलद माहिती आम्ही तुम्हाला देणार आहोत. आपल्या लाडक्या सेलेब्सबद्दल जाणून घेण्यासाठी सगळेच चाहते उत्सुक असतात. इतकंच नाही तर मनोरंजन विश्वात सध्या काय नवं घडतंय, याची देखील सर्वांनाच उत्सुकत असतेच. या माध्यमातून अशाच काही चटपटीत बातम्या आम्ही सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोहचवणार आहोत.

अभिनेता किशोर दासचे निधन

आसाम चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेता किशोर दासचे निधन झालं आहे. किशोर दासनं वयाच्या 30 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास घेतला. किशोर हा कॅन्सरवर उपचार घेत होता. चैन्नईमधील एका रुग्णालयात किशोर हा कॅन्सरवर उपचार घेत होता. काही दिवसांपूर्वी किशोरनं रुग्णालयातील एक फोटो शेअर केला होता. फोटो शेअर करुन किशोरनं त्याला जाणवत असलेल्या समस्यांबाबत सांगितलं होतं.

'ज्ञानेश्वर माउली' मालिकेत अभिनेत्री तितिक्षा तावडे साकारणार संत कान्होपात्रा!

'ज्ञानेश्वर माऊली' या मालिकेने प्रेक्षकांना भक्तिरसात तल्लीन केलं आहे. संतांची परंपरा उलगडणारी ही मालिका अल्पावधीतच प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली आहे. आता या मालिकेत संत कान्होपात्रा ही व्यक्तिरेखा अभिनेत्री तितिक्षा तावडे साकारणार आहे.

'स्टेपनी' सिनेमाचा होणार वर्ल्ड टेलिव्हिजन प्रीमियर

'पावनखिंड', 'झिम्मा', 'कारखानीसांची वारी' नंतर आता 'स्टेपनी' या सिनेमाचा वर्ल्ड टेलिव्हिजन प्रीमियर होणार आहे. रविवारी 10 जुलैला दुपारी एक वाजता हा सिनेमा प्रेक्षकांना प्रवाह पिक्चरवर पाहायला मिळणार आहे. या सिनेमात विनोदाचा बादशहा भरत जाधव मुख्य भूमिकेत आहे.

राजामौलींच्या 'आरआरआर' सिनेमाची बॉक्स ऑफिसवर शंभरी

एसएस राजामौलींच्या 'आरआरआर' या सिनेमाने रिलीजनंतर अनेक रेकॉर्ड केले आहेत. नुकतेच या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर 100 दिवस पूर्ण केले आहेत. या सिनेमाने फक्त दाक्षिणात्य सिनेसृष्टीत लोकप्रियता मिळवली नसून संपूर्ण जगभरातील सिनेप्रेक्षकांच्या पसंतीस 'आरआरआर' सिनेमा उतरत आहे.

धनुषच्या 'कॅप्टन मिलर'चा टीझर आऊट

दाक्षिणात्य सुपरस्टार धनुष पुन्हा एकदा रुपेरी पडद्यावर झळकण्यासाठी सज्ज झाला आहे. धनुषच्या 'कॅप्टन मिलर'चा टीझर आऊट झाला आहे. धनुषने टीझर शेअर करत आगामी सिनेमाची घोषणा केली आहे. सध्या हा टीझर सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.

23:30 PM (IST)  •  04 Jul 2022

'देवमाणूस 2' मालिकेत नवा ट्विस्ट; जामकरच्या पत्नीची होणार एन्ट्री

Snehal Shidam : 'देवमाणूस' (Devmanus) या मालिकेने सुरुवातीपासूनच प्रेक्षकांना खिळवून ठेवलं आहे. जामकर आणि देवयानीच्या एन्ट्रीनंतर ही मालिका विलक्षण वळणावर आली आहे. जामकरने अजितकुमारला पुरता अडकवलं आहे. त्याला गुन्हेगाराच्या पिंजऱ्यात अडकण्याचा निश्चय जामकरने केला आहे. त्यासाठी लागणारा सर्व तपास जामकर करतो आहे. आता या मालिकेत प्रेक्षकांना अजून एक नवीन चेहरा पाहायला मिळणार आहे. जामकरच्या पत्नीची आता मालिकेत एन्ट्री होणार आहे. 

18:04 PM (IST)  •  04 Jul 2022

RRR : 'Every thing Every Where All At Once' यंदाचा पुरस्कार राजमौलींच्या 'आरआरआर'ला; हॉलिवूड सिनेमांना टाकलं मागे

RRR Beats Hollywood Films : एस.एस. राजामौली (SS Rajamouli) दिग्दर्शित 'आरआरआर' (RRR) सिनेमा दिवसेंदिवस नव-नवे रेकॉर्ड करत आहे. या सिनेमात ज्यूनियर एनटीआर आणि राम चरण मुख्य भूमिकेत आहेत. या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर अनेक रेकॉर्ड तोडले आहेत. जगभरात या सिनेमाने 1115 कोटींची कमाई केली आहे. आता या सिनेमाने हॉलिवूडच्या अनेक सिनेमांना मागे टाकलं आहे. 

RRR : 'Every thing Every Where All At Once' यंदाचा पुरस्कार राजमौलींच्या 'आरआरआर'ला; हॉलिवूड सिनेमांना टाकलं मागे

16:39 PM (IST)  •  04 Jul 2022

Jhalak Dikhhla Jaa 10 : करण जोहरसोबत परीक्षण करणार धक-धक गर्ल

Karan Johar JUdge Jhalak Dikhhla Jaa : छोट्या पडद्यावरचा लोकप्रिय कार्यक्रम 'झलक दिखला जा' (Jhalak Dikhhla Jaa) हा कार्यक्रम प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला. आता या कार्यक्रमाच्या दहाव्या सीझनला सुरुवात होणार आहे. हा कार्यक्रम टीआरपीच्या शर्यतीत नेहमीच पहिल्या क्रमांकावर होता. या कार्यक्रमात सेलिब्रिटींच्या नृत्याची झलक प्रेक्षकांना पाहायला मिळत असते. या कार्यक्रमाचे परिक्षण वेगवेगळे सेलिब्रिटी करत असतात. 'झलक दिखला जा' या कार्यक्रमाच्या दहाव्या पर्वाच्या परिक्षणाची धुरा बॉलिवूड दिग्दर्शक करण जोहर सांभाळणार आहे. काजोलने या कार्यक्रमाची ऑफर धुडकावली आहे. 

16:03 PM (IST)  •  04 Jul 2022

अजय देवगण पुन्हा एकदा दिग्दर्शकाच्या भूमिकेत

बॉलिवूड अभिनेता अजय देवगणचा (Ajay Devgn) 'रनवे 34' (Runway 34) हा सिनेमा नुकताच प्रेक्षकांच्या भेटीला आला. या सिनेमात रकुल प्रीत सिंह (Rakul Preet Singh) आणि अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) मुख्य भूमिकेत आहे. अजयचा आगामी 'भोला' (Bholaa) हा सिनेमा आता प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 'कॅथी' (Kaithi) या दाक्षिणात्य सिनेमाचा हा हिंदी रिमेक आहे. या सिनेमात अजय भोला हे पात्र साकारण्यासोबतच या सिनेमाच्या दिग्दर्शनाची धुरा सांभाळणार आहे. 

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Ajay Devgn (@ajaydevgn)

15:59 PM (IST)  •  04 Jul 2022

'साई तुझं लेकरू'; 'टाइमपास 3' मधील धम्माल गाणे प्रेक्षकांच्या भेटीला

पाहा गाणं:

14:59 PM (IST)  •  04 Jul 2022

Vikram : महेश बाबूकडून विक्रम चित्रपटाच्या टीमचं कौतुक; कमल हसन यांच्याविषयी बोलताना म्हणाला...

Vikram : सध्या दाक्षिणात्य चित्रपटांना प्रेक्षकांची पसंती मिळत आहे. तीन जून रोजी कमल हसन (Kamal Hassan)यांचा 'विक्रम' (Vikram)  हा चित्रपट प्रदर्शित झाला. या चित्रपटानं जगभरातील बॉक्स ऑफिसवर 400.2 कोटींपेक्षा जास्त कमाई केली. चित्रपटानं पहिल्या आठवड्यात 135 कोटींची कमाई केली होती. चित्रपटामधील डायलॉग्स आणि कथानकाला प्रेक्षकांची पसंती मिळाली. अनेकांनी या चित्रपटाचं कौतुक केलं. नुकतीच प्रसिद्ध अभिनेता  महेश बाबूनं (Mahesh Babu) विक्रम या चित्रपटाच्या टीमचं कौतुक केलं आहे. त्यानं ट्वीट शेअर करुन या चित्रपटाचं कौतुक केले. 

वाचा सविस्तर बातमी

14:50 PM (IST)  •  04 Jul 2022

हिंदू देवतेची भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्रीच्या हातात सिगारेट अन् LGBTQचा झेंडा, ‘काली’ डॉक्युमेंट्रीचं पोस्टर पाहून संतापले नेटकरी!

Kaali Poster Controversy : बॉलिवूड चित्रपटांमधून सातत्याने हिंदू देवदेवतांचा अपमान केला जातो, यावरून अनेकदा वादही निर्माण झाले आहेत. आताही अशीच एक घटना घडली आहे. मात्र, यावेळी नेटकरी प्रचंड संतापले असून, त्यांनी केंद्रीय गृहमंत्रालय, अमित शाह आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना टॅग करत कारवाई कडक कारवाई करण्याची मागणी केली आहे. इतकेच नाही तर, सदर व्यक्तीला अटक आकारण्यात यावी अशीही मागणी करण्यात आली आहे. ‘काली’ (Kaali Poster Controversy) नावाच्या डॉक्युमेंट्रीच्या पोस्टरवरून हा वाद सुरु झाला आहे. चित्रपट निर्मात्या लीना मणिमेकलाई (Leena Manimekalai) यांच्या 'काली' या माहितीपटाच्या पोस्टरमुळे देशाभरात संतापाची लाट उसळली आहे.

या माहितीपटाच्या पोस्टरमध्ये काली माता साकारणारी अभिनेत्री सिगारेट ओढताना दाखवण्यात आली आहे. इतकेच नाही तर, काली मातेच्या हातात LGBTQ  वर्गाचा झेंडाही दाखवण्यात आला आहे. लीना यांनी हे पोस्टर त्यांच्या ट्विटर अकाऊंटवर शेअर केले होते. यानंतर आता लीना यांना तात्काळ अटक करण्याची मागणी करण्यात येत आहे.

वाचा संपूर्ण बातमी

13:31 PM (IST)  •  04 Jul 2022

सुपरस्टार सिंगरच्या मंचावर 'ड्रीम गर्ल' हेमा मालिनी यांनी केला डान्स

पाहा व्हिडीओ:

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Esha Deol Takhtani (@imeshadeol)

13:01 PM (IST)  •  04 Jul 2022

देबिना आणि गुरमितनं शेअर केला मुलीचा खास फोटो

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Debina Bonnerjee (@debinabon)

12:57 PM (IST)  •  04 Jul 2022

Sumeet Raghvan : ‘आता ह्याच्यावर एकदाचा पडदा पाडा!’, अभिनेता सुमीत राघवन यांची महाराष्ट्र सरकारला विनंती!

Mumbai Metro Car Shed : मुंबईतील मेट्रो कारशेड आरेतच (Aarey Colony) बनवण्याचा निर्णय नवनिर्वाचित शिंदे सरकारनं घेतला आहे. या निर्णयाला पर्यावरणवाद्यांनी मोठा विरोध दर्शवला आहे. आरे जंगलातील मेट्रो कारशेडविरोधात पर्यावरणवाद्यांनी आंदोलनाची हाक दिली आहे. तर, दुसरीकडे काही लोक या आरेतील कारशेडच्या निर्णयाला पाठिंबा देत आहे. यावरून बरेच वादही निर्माण झाले आहेत. आता या प्रकरणी अभिनेते सुमीत राघवन (Sumeet Raghvan) यांनी देखील एक ट्वीट केले आहे. या ट्वीटमधून त्यांनी सरकारला हे काम लवकरात लवकर पूर्ण करण्याची विनंती केली आहे.

मेट्रोचे कारशेड आरेतच बनणार या सरकारच्या निर्णयाला अभिनेते सुमीत राघवन यांनी ट्वीट करत पाठिंबा दर्शवला आहे. त्यांनी ट्विटर पोस्ट लिहित नवनिर्वाचित सरकारला एक विनंती केली आहे.

वाचा संपूर्ण बातमी

Load More
New Update
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Kolhapur News : कोल्हापुरातील शिंदे गटाच्या खासदारांच्या संपत्तीत किती कोटींनी वाढ? माने की मंडलिक कोट्यधीश??
कोल्हापुरातील शिंदे गटाच्या खासदारांच्या संपत्तीत किती कोटींनी वाढ? माने की मंडलिक कोट्यधीश??
BJP :  भाजपच्या नाराज पदाधिकाऱ्यांनी उपसले राजीनामा अस्त्र, नगरमधील 100 कार्यकर्ते- पदाधिकारी देणार सामूहिक राजीनामे
भाजपच्या नाराज पदाधिकाऱ्यांनी उपसले राजीनामा अस्त्र, नगरमधील 100 कार्यकर्ते- पदाधिकारी देणार सामूहिक राजीनामे
Stock Market Opening : शेअर बाजारात घसरण, सेन्सेक्स 73,000 तर, निफ्टी 150 अंकांनी खाली
शेअर बाजारात घसरण, सेन्सेक्स 73,000 तर, निफ्टी 150 अंकांनी खाली
Lok Sabha 2024 : निवडणूक आयोग अलर्ट मोडवर! 4600 कोटी रुपये, कोट्यवधींची दारू जप्त
निवडणूक आयोग अलर्ट मोडवर! 4600 कोटी रुपये, कोट्यवधींची दारू जप्त
Advertisement
for smartphones
and tablets

व्हिडीओ

ABP Majha Headlines : 10AM  :16 April 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्सMaharashtra BJP : महाराष्ट्र भाजपमधील नाराज पदाधिकरी राजीनामा देण्याच्या तयारीतNashik Loksabha : बळीराजाचा मत कुणाला? नाशिक लोकसभेविषयी काय वाटतं? शेतकऱ्यांशी संवादVishwajeet Kadam : सांगलीच्या जागेबाबत काल पटोले आणि थोरातांसोबत चर्चा झाली - विश्वजीत कदम

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Kolhapur News : कोल्हापुरातील शिंदे गटाच्या खासदारांच्या संपत्तीत किती कोटींनी वाढ? माने की मंडलिक कोट्यधीश??
कोल्हापुरातील शिंदे गटाच्या खासदारांच्या संपत्तीत किती कोटींनी वाढ? माने की मंडलिक कोट्यधीश??
BJP :  भाजपच्या नाराज पदाधिकाऱ्यांनी उपसले राजीनामा अस्त्र, नगरमधील 100 कार्यकर्ते- पदाधिकारी देणार सामूहिक राजीनामे
भाजपच्या नाराज पदाधिकाऱ्यांनी उपसले राजीनामा अस्त्र, नगरमधील 100 कार्यकर्ते- पदाधिकारी देणार सामूहिक राजीनामे
Stock Market Opening : शेअर बाजारात घसरण, सेन्सेक्स 73,000 तर, निफ्टी 150 अंकांनी खाली
शेअर बाजारात घसरण, सेन्सेक्स 73,000 तर, निफ्टी 150 अंकांनी खाली
Lok Sabha 2024 : निवडणूक आयोग अलर्ट मोडवर! 4600 कोटी रुपये, कोट्यवधींची दारू जप्त
निवडणूक आयोग अलर्ट मोडवर! 4600 कोटी रुपये, कोट्यवधींची दारू जप्त
Kavya Maran RCB vs SRH: काव्या मारन त्या क्षणी लगेच उठली अन् नाचली; फोटो व्हायरल, नेमकं काय घडलं?, जाणून घ्या
काव्या मारन त्या क्षणी लगेच उठली अन् नाचली; फोटो व्हायरल, नेमकं काय घडलं?, जाणून घ्या
Travis Head: दिल्लीनं 11 वर्षांआधी 30 लाखांत खरेदी केलेलं,आता ट्रॅव्हिस हेडचा पगार किती?, जाणून घ्या सर्वकाही!
दिल्लीनं 11 वर्षांआधी 30 लाखांत खरेदी केलेलं, आता ट्रॅव्हिस हेडचा पगार किती?, जाणून घ्या
Sangli Lok Sabha : विशाल पाटलांची बंडखोरी, मविआची  डोकेदुखी वाढली; सांगलीत आज मोठं शक्तिप्रदर्शन
विशाल पाटलांची बंडखोरी, मविआची डोकेदुखी वाढली; सांगलीत आज मोठं शक्तिप्रदर्शन
Salman Khan House Firing Case : सलमानच्या घरावर गोळीबार केल्यानंतर आरोपींनी शस्त्राचं काय केलं? पोलीस तपासात समोर आली महत्त्वाची माहिती
सलमानच्या घरावर गोळीबार केल्यानंतर आरोपींनी शस्त्राचं काय केलं? पोलीस तपासात समोर आली महत्त्वाची माहिती
Embed widget