(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Phulwanti Movie : प्राजक्ता माळीचा फुलवंती पाहून भारवला बाबासाहेब पुरंदरेंचा मुलगा; म्हणाले, 'आज बाबा हवे होते...'
Phulwanti Movie : बाबासाहेब पुरंदरे यांचा मुलगा प्रसाद पुरंदरे यांनी प्राजक्ता माळीच्या फुलवंती सिनेमाचं कौतुक केलं आहे.
Phulwanti Movie : बाबासाहेब पुरंदरे यांच्या कादंबरीवर आधारित फुलवंती (Phulwanti Movie) सिनेमा नुकताच प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. पेशवेकालीन इतिहास समोर ठेवत एका नृत्यांगणची गोष्ट सिनेमातून मांडण्यात आली होती. नितीन देसाई (Nitin Desai) यांच्या जाण्यानंतर एनडी स्टुडिओमध्ये चित्रीत झालेला हा पहिला सिनेमा आहे. त्यामुळे अनेकदृष्ट्या हा सिनेमा भावनिक गाठी बांधणारा ठरलाय. याच सिनेमावर आता बाबासाहेब पुरंदरे (Babasaheb Purandare) यांचा मुलगा प्रसाद पुरंदरे (Prasad Purandare) यांची प्रतिक्रिया समोर आलेली आहे.
प्रसाद पुरंदरे यांनी सहकुटुंब फुलवंती सिनेमा पाहिला. त्यानंतर त्यांनी बाबासाहेब पुरंदरे यांचीही आठवण काढली. प्रसाद पुरंदरे यांनीच पुण्यात फुलवंतीचा स्पेशल शो आयोजित केला होता. त्यावेळी संपूर्ण पुरंदरे कुटुंब उपस्थित होतं. प्राजक्ता माळीने तिच्या सोशल मीडियावर या संदर्भात पोस्ट करत ही स्पेशल आठवण शेअर केली आहे.
प्राजक्ताने शेअर केला खास फोटो
प्राजक्ताने संपूर्ण पुरंदरे कुटुंबियांसोबतचा फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. यामध्ये तिने म्हटलं की, प्रसाद पुरंदरेंनी ‘सकल ललित कलाघर’ (पुणे) मध्ये फुलवंतीचा #specialshow आयोजित केला.संपुर्ण कुटूंबाबरोबर परत चित्रपट पहायचाच होता…सगळे घरचे जमले.पहिल्यांदा निव्वळ प्रेक्षक म्हणून चित्रपट पाहू शकले.“आज बाबा असायला हवे होते, त्यांना फार आनंद झाला असता. तू बाबांच्या कथेला पुर्ण न्याय दिलास.” इति प्रसाद सर.हे ऐकून खूप बरं वाटलं.
सिनेमाची कथा काय?
‘फुलवंती’ ही भारतभर किर्ती असलेली नर्तिका आहे. ज्या भूमिकेत प्राजक्त माळी आहे. ती कार्यक्रमाच्या निमित्तानं तिचं पुण्यात तेही पेशवे दरबारात तिचं येणं होतं. तिथे तिची व्यंकटध्वरी नरसिंह शास्त्री यांच्याशी भेट होते. ही भूमिका अभिनेता गष्मीर महाजनी साकारत आहे. त्यांच्या भेटीनंतर तिच्या आयुष्याला अनपेक्षित वळण लागतं.नृत्यांगना ‘फुलवंती’ आणि प्रकांडपंडीत ‘व्यंकट शास्त्री’ यांच्यातील पैज आणि आव्हानांवर हा सिनेमा आधारित आहे. पद्मविभूषण बाबासाहेब पुरंदरे यांच्या लेखणीतून उतरलेली ‘फुलवंती’ कादंबरी चित्रपटरूपात मांडण्यात आलीये.
View this post on Instagram