एक्स्प्लोर

ट्रोलिंग? चालायचंच!, सेलिब्रिटींवरील टोमण्यांबद्दल श्रिया पिळगांवकरचं स्पष्ट मत

श्रिया ही सचिन आणि सुप्रिया पिळगांवकर यांची मुलगी हे अवघा महाराष्ट्र जाणतो. असं असलं तरी श्रियाने आपली अशी वेगळी ओळख निर्माण केली आहे.

मुंबई : एक ट्रीप माणसाला शहाणं करते का? तर होय. त्या ट्रीपमध्ये तुम्हाला आलेले अनुभव.. तुम्ही केलेल्या तडजोडी.. आलेल्या अडचणींवर केलेली मात यातून तुम्ही शहाणं होता. असं कुणीतरी म्हटलं आहे. ते खोटं नाही. अभिनेत्री श्रिया पिळगांवकरलाही अशाच ट्रीपने खूप काही दिलं. ही ट्रीप होती जपानची. ती एकटी जपानला गेली. त्यानंतर तिथे तिला जे अनुभव आले.. तिथे तिचा जो कााही संवाद झाला स्वत:शी त्यातून तिला जगण्याचं खूप मोठं बळ मिळालं असं ती सांगते. श्रियाची नवी फिल्म येतेय नेटफ्लिक्सवर. या निमित्त ती एबीपी माझाशी बोलती झाली. निमित्त सिनेमाचं असलं, तरी बऱ्याच गोष्टींवर या गप्पा झाल्या. अगदी ती करत असलेले प्रोजेक्टस, तिच्या आई-वडिलांनी तिला दिलेली शिकवण या अनेक गोष्टींवर ती बोलती झाली. अली फजल आणि श्रिया नेटफ्लिक्सवरच्या 'हाऊस अरेस्ट' या सिनेमातून एकत्र येत आहेत. हा सिनेमा 15 नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. यात ती एका पत्रकाराची भूमिका साकारतेय. या फिल्मबद्दल ती म्हणाली, "या सिनेमाची कन्सेप्ट मला खूप आवडली. काही कारणाने घराबाहेर न पडणारा मुलगा.. त्यातून येणारे प्रसंग आणि ते कळल्यानंतर त्याची मुलाखत घ्यायला आलेली पत्रकार.. गोष्ट आवडल्यामुळे ही ती स्वीकारली." श्रिया ही सचिन आणि सुप्रिया पिळगांवकर यांची मुलगी हे अवघा महाराष्ट्र जाणतो. असं असलं तरी श्रियाने आपली अशी वेगळी ओळख निर्माण केली आहे. तिने शॉर्ट फिल्म्स दिग्दर्शित केल्या आहेत. शिवाय मराठी सिनेमात कामही केलं आहे. फॅन, मिर्झापूर आणि आता तिचा हाऊस अरेस्ट हा सिनेमा येतोय. खूप वेगवेगळ्या व्यासपीठांवर ती काम करते आहे. तिच्याशी बोलताना ते जाणवतं. अनेक दिग्दर्शकांसोबत काम करण्याचा अनुभवही तिच्या पाठीशी आहे. अलिकडे आलेल्या वेबसीरिजच्या माध्यमाचंही तिला आकर्षण आहे. या अनुभवाबद्दल बोलताना ती म्हणाली, "अनेक दिग्दर्शकांच्या हाताखाली काम केल्यानंतर एक लक्षात येते ती म्हणजे त्यांची पॅशन. सगळे झपाटून काम करत असतात. शिवाय माध्यम वेगवेगळी असल्यामुळे तिथे काम करायची मजा असते. वेबसीरीज हे त्यापैकी एक माध्यम आहे." सोशल मीडियावरही श्रियाचं मोठं फॉलोईंग आहे. सोशल मीडियावर सेलिब्रिटींना सतत मारल्या जाणाऱ्या टोमण्यांबद्दल बोलताना ती म्हणते, "आपण सोशल मीडियावर आलो तेव्हाच हे लक्षात घ्यायला हवं की आपल्याला नव्या माध्यमाला सामोरं जायचं आहे. इथे लोक बोलणारच. कारण हाताच्या एका बोटावर त्यांना मोठं व्यासपीठ उपलब्ध झालं आहे. अशावेळी आपण शांत राहणं महत्त्वाचं." श्रियाशी बोलताना तिचं प्रगल्भ व्यक्तिमत्व सतत जाणवत राहतं. याशिवाय इतर अनेक गोष्टींवर तिने ठामपणे आपली मतं मांडली आहेत. त्यासाठी एबीपी माझाच्या वेबसाईटवरचा हा व्हिडीओ तुम्हाला पाहावा लागेल.

महत्त्वाच्या बातम्या

Rashmika Mandanna: 'मी हजार वेळा विचारेन' रश्मिकाने सोडलं मौन, ट्रोलर्सना दिलं सडेतोड उत्तर; म्हणाली माझं हाड मोडलं तेव्हा...
'मी हजार वेळा विचारेन' रश्मिकाने सोडलं मौन, ट्रोलर्सना दिलं सडेतोड उत्तर; म्हणाली माझं हाड मोडलं तेव्हा...
Zee Marathi Award Show: झी मराठी अवॉर्ड्समध्ये 7 आईंची धमाल! परफॉर्मेन्स जबरदस्त अन् मनोरंजनाचा फूल्ल तडका, दिमाखदार रंगला पुरस्कार सोहळा
झी मराठी अवॉर्ड्समध्ये 7 आईंची धमाल! परफॉर्मेन्स जबरदस्त अन् मनोरंजनाचा फूल्ल तडका, दिमाखदार रंगला पुरस्कार सोहळा
Sankarshan Karhade Grandmother: 'माझ्या आजीने चोराला चहा पाजलाय...'; संकर्षण कऱ्हाडेनं सांगितला किस्सा, आजीच्या घरात घुसलेला चोर; पण त्याने चोरी केली नाही कारण...
'माझ्या आजीने चोराला चहा पाजलाय...'; संकर्षण कऱ्हाडेनं सांगितला किस्सा, आजीच्या घरात घुसलेला चोर; पण त्याने चोरी केली नाही कारण...
Sana Makbul HomeWrecker: 'होमब्रेकर...' माही विज अन् जय भानुशालीचा सुखी संसार मोडल्याचा TV अभिनेत्रीवर आरोप; नेटकऱ्यांना दिलं सडेतोड उत्तर
'होमब्रेकर...' माही विज अन् जय भानुशालीचा सुखी संसार मोडल्याचा TV अभिनेत्रीवर आरोप; नेटकऱ्यांना दिलं सडेतोड उत्तर

व्हिडीओ

Karjat Tree Cutting : टोरंट कंपनीच्या जलविद्युत प्रकल्पावरुन राजकारण जोरात : Special Report
Nashik kumbh Mela 2026 : सिंहस्थ कुंभमेळ्याच्या ध्वजारोहणात ऐतिहासिक क्षण, नाशिकमध्ये 501 शंखांचा एकत्रित नाद
Nashik Kumb Mela 2026 : कुंभमेळ्याची परंपरा नेमकी कशी सुरू झाली? History of kumb Mela
Nashik Kumb mela : नाशिक कुंभमेळ्यात विश्वविक्रम, 501 गोदासेवकांचा एकाचवेळी शंखनाद, अमेरिकेचा विक्रम मोडीत
Raj Thackeray Speech | दुचाकी, चारचाकी, सिग्नल ते सरकार... नवी मुंबईतील मेळाव्यातलं राज यांचं भाषण!

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
मोठी बातमी, प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणी मीनाक्षी शिंदेंची चौकशी होणार, ठाणे पोलिसांचं खंडणीविरोधीपथकानं चौकशीला बोलावलं
प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणी मीनाक्षी शिंदेंची चौकशी होणार, ठाणे पोलिसांचं खंडणीविरोधीपथकानं चौकशीला बोलावलं
Election : सरपंचपदाच्या निवडणुकीच्या रिंगणात महिलेचा पराभव..., गावकऱ्यांनी मनाचा मोठेपणा दाखवला, चिडी देवींच्या कुटुंबाला थेट 25 लाखांची आर्थिक मदत
चिडी देवींचा निवडणुकीत पराभव, गावकऱ्यांकडून थेट 25 लाखांची आर्थिक मदत, लोकांच्या एका निर्णयानं कुंटुंबाला आश्चर्याचा धक्का
Mumbai Pune Missing Link : मुंबई-पुणे 'मिसिंग लिंक'वर नवे नियम; पिकअप व्हॅन, मालवाहतूक ट्रकसह अनेक वाहनांना प्रवेशबंदी, 1 नोव्हेंबरपासून बस, कारची वेगमर्यादा निश्चित
मुंबई-पुणे 'मिसिंग लिंक'वर नवे नियम; पिकअप व्हॅन, मालवाहतूक ट्रकसह अनेक वाहनांना प्रवेशबंदी, 1 नोव्हेंबरपासून बस, कारची वेगमर्यादा निश्चित
कॉम्प्युटर क्लास करुन घरी निघाला होता साहिल, मृत्यूला रेल्वेचा गलथान कारभारच जबाबदार; कुटुंबीयांचा आक्रोश
कॉम्प्युटर क्लास करुन घरी निघाला होता साहिल, मृत्यूला रेल्वेचा गलथान कारभारच जबाबदार; कुटुंबीयांचा आक्रोश
Arunachal Border Tension : 'आशा आहे भारत कराराचे पालन करेल'; अरुणाचल सीमेवरील तणावावर चीनच्या उलट्या बोंबा 
'आशा आहे भारत कराराचे पालन करेल'; अरुणाचल सीमेवरील तणावावर चीनच्या उलट्या बोंबा 
Vande Bharat Sleeper Train : मुंबई-बंगळुरु वंदे भारत स्लीपर ट्रेनबाबत केंद्रीय रेल्वे राज्यमंत्र्यांकडून अपडेट, ट्रेन कोणत्या मार्गे धावणार?
मुंबई-बंगळुरु वंदे भारत स्लीपर ट्रेनबाबत केंद्रीय रेल्वे राज्यमंत्र्यांकडून अपडेट, ट्रेन कोणत्या मार्गावरुन धावणार?
खोळंब्यानंतर लोकल सुरळीत, पण तुडूंब गर्दीमुळे प्रवाशांची हाणामारी; ठाणे रेल्वे स्थानकावर चाकरमानी संतप्त
खोळंब्यानंतर लोकल सुरळीत, पण तुडूंब गर्दीमुळे प्रवाशांची हाणामारी; ठाणे रेल्वे स्थानकावर चाकरमानी संतप्त
इंग्रजांकडून होत नव्हता, तेवढा त्रास यांच्याकडून; वृक्षतोडीवरुन जरांगे पाटील संतप्त, साय डोंगर परिसरात भेट देणार
इंग्रजांकडून होत नव्हता, तेवढा त्रास यांच्याकडून; वृक्षतोडीवरुन जरांगे पाटील संतप्त, साय डोंगर परिसरात भेट देणार
Embed widget