एक्स्प्लोर

Bhirkit : 'भिरकीट'चा भन्नाट ट्रेलर रिलीज; 'या' दिवशी चित्रपट होणार रिलीज

भिरकीट (Bhirkit) या चित्रपटामधील गाण्यांना प्रेक्षकांची पसंती मिळत आहे.

Bhirkit : मराठी चित्रपटसृष्टीमध्ये सध्या 'भिरकीट' (Bhirkit) नावाचे हास्याचे वादळ येत आहे. 'भिरकीट' या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला असून हे वादळ १७ जून रोजी संपूर्ण महाराष्ट्रातील चित्रपटगृहांत येणार आहे.  काही दिवसांपूर्वीच या चित्रपटाचा संगीत सोहळा पार पडला. चित्रपटाची गाणी प्रेक्षकांच्या पसंतीस आल्यानंतर आता चित्रपटाबद्दलची उत्सुकता वाढवणारा ट्रेलरही भेटीला आहे. ट्रेलरमध्ये आपल्याला तात्या पाहायला मिळत आहे, ज्यांची सगळ्यांच्या मदतीसाठीची धडपड दिसत आहे. त्यात असे काही घडल्याचे दिसतेय की, त्यातून अवघ्या गावाची दृष्टी बदलते.  आता अशी कोणती घटना घडते, ज्यातून हा बदल घडतो, हे चित्रपट पाहिल्यावरच कळेल. हसवता हसवता मनाला स्पर्शून जाणारा हा चित्रपट आहे.

यात  गिरीश कुलकर्णी, ऋषिकेश जोशी, कुशल बद्रिके, सागर कारंडे, मोनालिसा बागल, लंगड्या उर्फ तानाजी गालगुंडे, कैलास वाघमारे, उषा नाईक, याकूब सय्यद, श्रीकांत यादव, मीनल बाळ, शिल्पा ठाकरे, दिप्ती धोत्रे, आर्या घारे, सेवा मोरे, रोहित चव्हाण, बाळकृष्ण शिंदे, नामदेव मिरकुटे, राधा सागर, अश्विनी बागल यांच्या प्रमुख भूमिका आहेत. 

चित्रपटाचे दिग्दर्शक अनुप जगदाळे म्हणतात," 'भिरकीट' ही गावच्या मातीची कथा आहे. राजकारण, कौटुंबिक नाते, प्रेमकहाणी , विनोद हे संपूर्ण रस या चित्रपटात आपल्याला पाहायला मिळणार आहे. या चित्रपटाची गाणी तर प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत आहेत. तसाच चित्रपटाला देखील असाच भरभरून प्रेक्षक प्रतिसाद देतील याची मला खात्री आहे. ‘भिरकीट’चा ट्रेलर आज प्रदर्शित होत आहे.संपूर्ण कुटुंबाने एकत्र पाहावा, असा हा चित्रपट आहे.

क्लासिक एंटरप्राइज प्रस्तुत व अनुप जगदाळे दिग्दर्शित 'भिरकीट' या चित्रपटाची निर्मिती सुरेश जामतराज ओसवाल आणि भाग्यवंती ओसवाल यांनी केली असून पटकथा, संवाद प्रताप गंगावणे यांचे आहेत.या चित्रपटाचे ,छायाचित्रण मीर आणि संकलन फैजल महाडिक यांनी केले आहे. तर या चित्रपटाच्या वितरणाची धुरा युएफओने सांभाळली आहे.

संबंधित बातम्या

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

IPL 2025 बाबत मोठी अपडेट, 10 संघाची बीसीसीआयकडे मोठी मागणी, खेळाडूंना होणार फायदा
IPL 2025 बाबत मोठी अपडेट, 10 संघाची बीसीसीआयकडे मोठी मागणी, खेळाडूंना होणार फायदा
IND vs ZIM: ध्रुव जुरेल की जितेश शर्मा... संजू सॅमसनच्या जागी विकेटकीपर कोण?
IND vs ZIM: ध्रुव जुरेल की जितेश शर्मा... संजू सॅमसनच्या जागी विकेटकीपर कोण?
जिम्बाब्वे दौऱ्यासाठी टीम इंडिया रवाना, पाहा फोटो
जिम्बाब्वे दौऱ्यासाठी टीम इंडिया रवाना, पाहा फोटो
Photos: शाहिद कपूर ते युवराज सिंह... लग्नाआधी सानियाचं नाव कुणा कुणासोबत जोडलं?
Photos: शाहिद कपूर ते युवराज सिंह... लग्नाआधी सानियाचं नाव कुणा कुणासोबत जोडलं?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Nawab Malik at Ajit Pawar : अजित पवार यांच्या घरी डिनर डिप्लोमसी, नवाब मलिकांची खास उपस्थिती!Deekshabhoomi Underground Parking Issue : नागपूर दीक्षाभूमी आंदोलन कुणी भडकवलं? Spcial ReportTop 25 : रात्रीच्या राज्यातील 25 बातम्यांचा वेगवान आढावा सुपरफास्ट : 02 July 2024 : ABP MajhaVidhan Parishad Election Special Report : घेणार माघार की होणार घोडेबाजार? विधानपरिषदेत कुणाचा गेम?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
IPL 2025 बाबत मोठी अपडेट, 10 संघाची बीसीसीआयकडे मोठी मागणी, खेळाडूंना होणार फायदा
IPL 2025 बाबत मोठी अपडेट, 10 संघाची बीसीसीआयकडे मोठी मागणी, खेळाडूंना होणार फायदा
IND vs ZIM: ध्रुव जुरेल की जितेश शर्मा... संजू सॅमसनच्या जागी विकेटकीपर कोण?
IND vs ZIM: ध्रुव जुरेल की जितेश शर्मा... संजू सॅमसनच्या जागी विकेटकीपर कोण?
जिम्बाब्वे दौऱ्यासाठी टीम इंडिया रवाना, पाहा फोटो
जिम्बाब्वे दौऱ्यासाठी टीम इंडिया रवाना, पाहा फोटो
Photos: शाहिद कपूर ते युवराज सिंह... लग्नाआधी सानियाचं नाव कुणा कुणासोबत जोडलं?
Photos: शाहिद कपूर ते युवराज सिंह... लग्नाआधी सानियाचं नाव कुणा कुणासोबत जोडलं?
उत्पन्नची अट ते मुदतवाढ, लाडकी बहिण योजनेत महत्वाचे 7 मोठे बदल
उत्पन्नची अट ते मुदतवाढ, लाडकी बहिण योजनेत महत्वाचे 7 मोठे बदल
पुणे-सोलापूर महामार्गावर टायर फुटल्यानं भीषण अपघात, 4 जणांचा जागीच मृत्यू
पुणे-सोलापूर महामार्गावर टायर फुटल्यानं भीषण अपघात, 4 जणांचा जागीच मृत्यू
आषाढीसाठी पंढरी सज्ज, भंडीशेगावपासून पंढरपूरपर्यंत होणार आकर्षक विद्युत रोषणाई  
आषाढीसाठी पंढरी सज्ज, भंडीशेगावपासून पंढरपूरपर्यंत होणार आकर्षक विद्युत रोषणाई  
Pune Metro : धक्कादायक! पुणे मेट्रो स्थानकात सरकत्या जिन्यावरून उतरताना खाली पडून प्रवाशाचा मृत्यू
धक्कादायक! पुणे मेट्रो स्थानकात सरकत्या जिन्यावरून उतरताना खाली पडून प्रवाशाचा मृत्यू
Embed widget