एक्स्प्लोर

BE Rojgaar : तीन बेरोजगारांची गोष्ट; ‘BE Rojgaar’ चा पहिला एपिसोड पाहिलात?

ही कथा आहे भाडिपाच्या नवीन वेबसिरीज ‘B.E.Rojgaar’ची.

BE Rojgaar : पापड्या, पियु आणि अक्षय हे तीन बेरोजगार इंजिनिअर करियरची एक वेगळी वाट निवडतात आणि स्वतःचा व्यवसाय सुरू करतात. ही कथा आहे भाडिपाच्या नवीन वेबसिरीज ‘B.E.Rojgaar’ची. पुणे आणि इचलकरंजी येथे शूट झालेल्या या वेबसिरीजचा पहिला भाग नुकताच भाडिपाच्या युट्यूब चॅनलवर प्रदर्शित झाला आहे. तो तुम्ही अगदी फुकटात पाहू शकता. B.E. Rojgaarमध्ये प्रसिद्ध अभिनेत्री सई ताम्हणकर ही आधी कधीही न पाहिलेल्या, आगळ्या वेगळ्या भूमिकेतून आपल्याला दिसणार आहे. कामाच्या शोधत असलेली विदर्भातन आलेली मेकॅनिकल इंजिनीअरचं 'पियु' पात्र सई साकारत आहे. तिच्यासोबत आपल्याला कोल्हापूरी भूमिका सहजरीत्या साकारणारा संभाजी ससाणे ‘पापड्या’च्या भूमिकेत दिसणार आहे. त्याच्यासोबत स्मार्ट आणि तितकंच गुंतागुंतीचं ‘अक्षय’ हे पात्र साकारताना जगदीश कन्नम दिसतोय. तीन इंजिनिअरची आयुष्यात दिशा शोधण्यासाठीच्या धडपडीची ही चित्तवेधक कथा आहे.

लेखक सौरभ शामराज आणि दिग्दर्शक सारंग साठये यांनी भाडिपाची वास्तववादी सिरीज बनवण्याची विशेष शैली इथे पण तशीच सांभाळली आहे. पात्र, लोकेशन आणि घटना सगळेच अतिशय वास्तववादी आहे. एक स्टँड-अप कॉमेडियन असलेल्या सारंग साठये याचं विनोदी काम अधिक प्रचलित आहे, मात्र या सिरीजमध्ये हलके क्षण तितक्याच  खुबिनं टिपूनदेखील कथानकाचे आणि पात्रांचे गांभीर्य कमी झालेल नाही. या सहा भागांच्या सिरीजचा दर शुक्रवारी एक एपिसोड प्रदर्शित होईल. 

बेरोजगाऱ्यांची एक वेगळी बाज आणि अभियंत्यांचा संघर्ष या सीरमजमधून आपण पाहणार आहोत. भाडीपाच्या ही तीन मित्रांची प्रेरणादायी कहाणी प्रेक्षकांसाठी खास मेजवानी ठरेल.

“B.E. Rojgaarने मला वास्तवाचा एक नवीन आयाम दाखवला. ऑनलाइन कॉटेंन्टमध्ये, आणि खास करून मराठीमध्ये वेगळ्या बाजाचा कॉटेन्ट आणण्यामध्ये भाडिपा आघाडीवर आहे. परफॉर्म करताना आपल्या हसवणारी भूमिका साकारताना नेहमीच मजा येते. विदर्भातील माझ्या चाहत्यांना खुष करण्याचा हा माझा धाडसी आणि प्रामाणिक प्रयत्न आहे. सगळे भाग प्रदर्शित झाल्यावर  ते बिज वॉच करण्यासाठी मी प्रचंड उत्सुक आहे. मला खात्री आहे की सगळ्यांना B.E. Rojgaar खुप आवडणार आहे.” - सई ताम्हणकर (पियु)

“भाडिपा सोबत काम करायची कोणाची इच्छा नसते? या सीरिजसाठी भाडिपाने मला निवडलं. ही सीरिज माझ्या करिअरला नवीन वळण देणारी ठरली. सई आणि संभाजी ह्यांनी मला सांभाळून घेतलं, सारंगनी मला अविस्मरणीय अनुभव दिलाय, तो आयुष्यभर माझ्यासोबत राहील. ही सीरिज पूर्ण होण्यामागे भाडिपाची पूर्ण टीम आहे, त्यांच्याकडून सतत एक ऊर्जा मिळते, आयुष्यभर मला भाडिपा सोबत काम करायला आवडल!” – जगदीश कन्नम  (अक्षय)

“अप्रतिम कलाकार आणि निर्मात्यांसोबत काम करण्याचा हा अनुभव मी कायम जपुन ठेवेन. तुम्हाला प्रेरणा देणारी पात्र साकारणं हे एक अभिनेता म्हणून माझ्यासाठी खुप इंटरेस्टिंग आहे. ‘पापड्या’ हा माझ्यातील अभिनेत्यासाठी अनोखा प्रवास होता. आमची ही सिरीज 3 इंजिनिअर  मुलांच्या आशा आकांक्षांची गोष्ट आहे, ज्यांचं स्वप्न आहे त्यांची स्वतःची कंपनी सरू करणं. मी पापड्याची भूमिका साकारतोय, जो वडा आणि अक्षय या त्याच्या मित्रांना त्यांच्या स्ट्रगलमध्ये मदत करण्यासाठी सतत जुगाड करत  असतो. त्यांच्या स्वप्नपुर्तीच्या प्रवासात त्यांना अनेक चढ उतारांचा सामना करावा लागतो. मला वाटतं कुठल्याही शाखेतील विद्यार्थी या 3 मित्रांच्या स्वप्नांसोबत रिलेट करू शकतात. प्रत्येक तरुण या गोष्टीशी स्वतःला रिलेट करू शकतो. तुम्हाला तुमच्या आजबाजू ला वडा, पिया आणि अक्षय दिसतील.”- संभाजी ससाणे (पापड्या)

“हा शो माझ्यातील ‘स्पिरिट’ दाखवतो जे मला माझ्या वडिलांकडून मिळालं. ते स्वतः इंजिनिअर होते आणि त्यांनी मला शिकवलं की भूतकाळातील चुकांचा विचारकरू नका. हा शो तीन बेरोजगार अभियंता मित्रांबद्दल आहे, जे हार मानत नाहीत. ही स्वप्नांची आणि रिवर्स मायग्रेशनची कथा आहे.” - सारंग साठये (शो क्रिएटर)

संबंधित बातम्या

महत्त्वाच्या बातम्या

Aaishvary Thackeray Cyber ​​Fraud: बाळासाहेब ठाकरेंच्या नातवाची सायबर फसवणूक, परदेशातून सहा वेळा पैसे काढले, पोलिसांकडून भामट्याचा शोध सुरू
बाळासाहेब ठाकरेंच्या नातवाची सायबर फसवणूक, परदेशातून सहा वेळा पैसे काढले, पोलिसांकडून भामट्याचा शोध सुरू
Radhika Apte On Alia Bhatt Deepika Padukone: 'मी आलिया भट्ट किंवा दीपिका पादुकोण नाही...', राधिका आपटेचं थेट वक्तव्य, बॉक्स ऑफिसच्या समीकरणांवर म्हणाली...
'मी आलिया भट्ट किंवा दीपिका पादुकोण नाही...', राधिका आपटेचं थेट वक्तव्य, बॉक्स ऑफिसच्या समीकरणांवर म्हणाली...
टायगर श्रॉफ गोळीबार प्रकरण! मुंबई गुन्हे शाखेची मोठी कारवाई,  हरियाणातील कर्नाल जिल्ह्यातून 22 वर्षीय महिला आरोपीला अटक 
टायगर श्रॉफ गोळीबार प्रकरण! मुंबई गुन्हे शाखेची मोठी कारवाई,  हरियाणातील कर्नाल जिल्ह्यातून 22 वर्षीय महिला आरोपीला अटक 
Vinay Apte Short Film Competition : कै. विनय आपटे यांच्या 13 व्या स्मृतीदिनानिमित्त राष्ट्रीय लघुपट स्पर्धा; 30 नोव्हेंबरपर्यंत पाठवा प्रवेशिका
कै. विनय आपटे यांच्या 13 व्या स्मृतीदिनानिमित्त राष्ट्रीय लघुपट स्पर्धा; 30 नोव्हेंबरपर्यंत पाठवा प्रवेशिका

व्हिडीओ

Punjab Operation Lotus Bhagwant Mann : ऑपरेशन लोटस ऑन अडचणीत भगवंत मान? Special Report
NCP Internal Clash Parth Pawar : अंतर्गत वादावादी? प्रचंड 'शाह'वादी! Special Report
Dia Mirza vs BMC on Diwali Pollution : व्हिडीओवरून कुरबूर बीएमसीत 'मिर्झा'पूर Special Report
Sanjay Raut : अमित शहांची केंद्रीय गृहमंत्रिपदावरून तातडीने हकालपट्टी करा; संजय राऊतांची थेट मागणी
Coffee With Kaushik Sandeep Tamgadge : चीनची घुसखोरी ते म्यानमारमधील तस्करी, भिडणारा अधिकारी

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Maharashtra Live blog updates: कोयना धरणाच्या पाण्यावरून सातारा-सांगलीत राजकारण तापलं! राजू शेट्टींच्या टीकेला पालकमंत्र्यांचं उत्तर!
Maharashtra Live blog updates: कोयना धरणाच्या पाण्यावरून सातारा-सांगलीत राजकारण तापलं! राजू शेट्टींच्या टीकेला पालकमंत्र्यांचं उत्तर!
सेंट्रल बँकेच्या खात्यातून 13.96 कोटी RTGS द्वारे लंपास, 107 जणांच्या अकाऊंटमध्ये जमा; सायबर पोलिसांकडून आरोपीला बेड्या
सेंट्रल बँकेच्या खात्यातून 13.96 कोटी RTGS द्वारे लंपास, 107 जणांच्या अकाऊंटमध्ये जमा; सायबर पोलिसांकडून आरोपीला बेड्या
Amit Shah Vs Rahul Gandhi : 'किमान नकली संसदेत तरी पंतप्रधान व्हा',  अमित शाहांचा राहुल गांधींना टोला; भाजपच्या 'लोकतंत्र बचावो' पदयात्रेत काँग्रेसला झोडपलं
'किमान नकली संसदेत तरी पंतप्रधान व्हा',  अमित शाहांचा राहुल गांधींना टोला; भाजपच्या 'लोकतंत्र बचावो' पदयात्रेत काँग्रेसला झोडपलं
पदवीधरच्या निकालानंतर सतीश चव्हाण म्हणाले, माझा घात झाला; अब्दुल सत्तारांनी पुन्हा डिवचलं, शायरीतून टोला
पदवीधरच्या निकालानंतर सतीश चव्हाण म्हणाले, माझा घात झाला; अब्दुल सत्तारांनी पुन्हा डिवचलं, शायरीतून टोला
सराफ व्यावसायिकाचं भरदिवसा इनोव्हातून अपहरण, सर्वत्र खळबळ; पोलीस तपासात धक्कादायक ट्विस्ट, तेलंगणा कनेक्शन
सराफ व्यावसायिकाचं भरदिवसा इनोव्हातून अपहरण, सर्वत्र खळबळ; पोलीस तपासात धक्कादायक ट्विस्ट, तेलंगणा कनेक्शन
देशाला मोदीजी हवे आहेत, राहुल गांधींना अतिडावी व्यवस्था उभी करायचीय, मुख्यमंत्री फडणवीसांचा हल्लाबोल, म्हणाले संविधान वाचवण्यासाठी आम्ही रस्त्यावर 
देशाला मोदीजी हवे आहेत, राहुल गांधींना अतिडावी व्यवस्था उभी करायचीय, मुख्यमंत्री फडणवीसांचा हल्लाबोल, म्हणाले संविधान वाचवण्यासाठी आम्ही रस्त्यावर 
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 02 नोव्हेंबर 2026 | सोमवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 02 नोव्हेंबर 2026 | सोमवार
Imran Khan : OCI कार्डधारक असताना SIR आंदोलनात का गेला? तुमचा आणि भारतातील आंदोलनाचा काय संबंध? इम्रान खानला न्यायालयाने फटकारले
OCI कार्डधारक असताना SIR आंदोलनात का गेला? तुमचा आणि भारतातील आंदोलनाचा काय संबंध? इम्रान खानला न्यायालयाने फटकारले
Embed widget