एक्स्प्लोर

Nora Fatehi : अभिनेत्री नोरा फतेहीची आज पुन्हा ईडी चौकशी, अडचणी वाढणार?

Nora Fatehi Ed Summons : सुकेश चंद्रशेखर (Sukesh Chandra Shekhar Case) मनी लॉंड्रिंग प्रकरणी जॅकलीन (Jacqueline Fernandez) नंतर आज अभिनेत्री नोरा फतेहीची चौकशी होणार आहे.

Nora Fatehi Ed Summons : बॉलिवूड अभिनेत्री नोरा फतेहीच्या (Nora Fatehi) अडचणीत वाढ झाली आहे. सुकेश चंद्रशेखर (Sukesh Chandra Shekhar Case) मनी लॉंड्रिंग प्रकरणी अभिनेत्री जॅकलीन फर्नांडीस (Jacqueline Fernandez) नंतर आता नोरा फतेहीची चौकशी होणार आहे. ईडी नोरा फतेहीची आज सुकेश चंद्रशेखर मनी लॉंड्रिंग प्रकरणी चौकशी करणार आहे. नोरा फतेही आज सकाळी (15 सप्टेंबर) 11 वाजता दिल्लीच्या ईडी कार्यालयात हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. याआधीदेखील नोराची ईडीकडून चौकशी करण्यात आली होती. त्यावेळी तब्बल सहा तास नोराची चौकशी झाली. त्यावेळी त्यांनी नोराचा जबाबदेखील नोंदवून घेण्यात आला होता.

सुकेश चंद्रशेखर मनी लॉंड्रिंग प्रकरणी चौकशी

ईडी नोरा फतेहीची आज सुकेश चंद्रशेखर मनी लॉंड्रिंग प्रकरणी चौकशी करणार आहे. नोरा फतेही गुरुवारी सकाळी (15 सप्टेंबर) 11 वाजता ईडी कार्यालयात हजर राहण्याची शक्यता आहे. याआधीदेखील नोराची ईडीकडून चौकशी करण्यात आली होती. त्यावेळी तब्बल सहा तास नोराची चौकशी सुरू होती. त्यावेळी त्यांनी नोराचा जबाबदेखील नोंदवून घेतला होता.

नेमकं काय आहे मनी लॉंड्रिंग प्रकरण?

200 कोटी रुपयांच्या मनी लाँड्रिंग प्रकरणामुळे चर्चेत असलेल्या सुकेश चंद्रशेखर  सोबत  बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिसचं नाव जोडले जात  होते. त्यानंतर जॅकलिन आणि सुकेशचा एक फोटोदेखील व्हायरल झाला होता. पण आता याप्रकरणात आणखी काही अभिनेत्रींचा सहभाग असल्याचं समोर आले आहे. 

सुकेश चंद्रशेखरने पिंकी इराणीच्या माध्यमातून भूमी पेडणेकर (bhumi Pednekar), सारा अली खान (Sara Ali Khan) आणि जान्हवी कपूर (Jhanvi Kapoor) सारख्या काही अभिनेत्रींवर प्रभाव टाकण्याचा प्रयत्न केला असल्याचे ईडीच्या तपासात उघड झालं आहे. सुकेशने या अभिनेत्रींना महागड्या भेटवस्तू पाठवल्या आहेत. काही अभिनेत्रींनी या भेटवस्तूंचा स्वीकार केला तर काहींनी नाकारल्या होत्या. 

जॅकलीन फर्नांडीसचीही आठ तास चौकशी

दरम्यान, बॉलिवूड अभिनेत्री जॅकलीन फर्नांडीसही (Jacqueline Fernandez) सध्या सुकेश चंद्रशेखर मनी लॉंड्रिंग प्रकरणी चर्चेत आहे. जॅकलीनला ईडीने 14 सप्टेंबरला न्यायालयात हजर राहण्याचे निर्देश दिले होते. त्यानुसार जॅकलीन न्यायालयात चौकशीसाठी हजर राहिली. बुधवारी जॅकलीनची तब्बल आठ तास जॅकलीनची चौकशी झाली.

महत्त्वाच्या इतर बातम्या

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

एका लग्नाची दुसरी गोष्ट! पहिल्या प्रेयसीला मंडपात ताटकळत ठेवलं, दुसऱ्या प्रेयसीसोबत नवरदेव फरार
एका लग्नाची दुसरी गोष्ट! पहिल्या प्रेयसीला मंडपात ताटकळत ठेवलं, दुसऱ्या प्रेयसीसोबत नवरदेव फरार
Madha : माढ्याचा गड राखण्यासाठी खुद्द पंतप्रधान मोदी मैदानात, मोहिते पाटलांच्या होमग्राऊंडवर घेणार विराट सभा
माढ्याचा गड राखण्यासाठी खुद्द पंतप्रधान मोदी मैदानात, मोहिते पाटलांच्या होमग्राऊंडवर घेणार विराट सभा
VIDEO : अखेरच्या चेंडूपर्यंतचा थरार, राशिद लढला, पण गुजरात हरलं, स्टब्सची शानदार फिल्डिंग
VIDEO : अखेरच्या चेंडूपर्यंतचा थरार, राशिद लढला, पण गुजरात हरलं, स्टब्सची शानदार फिल्डिंग
DC vs GT, IPL 2024 : थरारक सामन्यात दिल्लीचा विजय, गुजरातचा चार धावांनी पराभव
DC vs GT, IPL 2024 : थरारक सामन्यात दिल्लीचा विजय, गुजरातचा चार धावांनी पराभव
Advertisement
for smartphones
and tablets

व्हिडीओ

Varsha Gaikwad : धारावीत वर्षा गायकवाड, अनिल देसाईंचा एकत्र प्रचार; ठाकरे-काँग्रेसमधले वाद मिटलेSouth Mumbai Lok Sabha : भाजपसह शिवसेनाही दक्षिण मुंबईसाठी आग्रहीDeepak Sawant : वायव्य मुंबईतून शिवसेनेकडून दीपक सावंत लढण्यास इच्छूकAaditya Thackeray Vs Devendra Fadnavis : सत्तेसाठी विचार सोडणाऱ्यांनी बोलू नये : फडणवीस

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
एका लग्नाची दुसरी गोष्ट! पहिल्या प्रेयसीला मंडपात ताटकळत ठेवलं, दुसऱ्या प्रेयसीसोबत नवरदेव फरार
एका लग्नाची दुसरी गोष्ट! पहिल्या प्रेयसीला मंडपात ताटकळत ठेवलं, दुसऱ्या प्रेयसीसोबत नवरदेव फरार
Madha : माढ्याचा गड राखण्यासाठी खुद्द पंतप्रधान मोदी मैदानात, मोहिते पाटलांच्या होमग्राऊंडवर घेणार विराट सभा
माढ्याचा गड राखण्यासाठी खुद्द पंतप्रधान मोदी मैदानात, मोहिते पाटलांच्या होमग्राऊंडवर घेणार विराट सभा
VIDEO : अखेरच्या चेंडूपर्यंतचा थरार, राशिद लढला, पण गुजरात हरलं, स्टब्सची शानदार फिल्डिंग
VIDEO : अखेरच्या चेंडूपर्यंतचा थरार, राशिद लढला, पण गुजरात हरलं, स्टब्सची शानदार फिल्डिंग
DC vs GT, IPL 2024 : थरारक सामन्यात दिल्लीचा विजय, गुजरातचा चार धावांनी पराभव
DC vs GT, IPL 2024 : थरारक सामन्यात दिल्लीचा विजय, गुजरातचा चार धावांनी पराभव
Pushkar Shrotri : पुष्कर श्रोत्रीचं 55 व्या वाढदिवशी 55 वं नाटक रंगभूमीवर; साकारणार 10 फुटी व्यक्तिरेखा
पुष्कर श्रोत्रीचं 55 व्या वाढदिवशी 55 वं नाटक रंगभूमीवर; साकारणार 10 फुटी व्यक्तिरेखा
ऋषभ पंतकडून विराट कोहलीला टक्कर, विश्वचषकासाठी दावाही ठोकला
ऋषभ पंतकडून विराट कोहलीला टक्कर, विश्वचषकासाठी दावाही ठोकला
मोहित शर्माच्या नावावर लाजीरवाणा विक्रम, IPL च्या इतिहासातील सर्वात महागडा गोलंदाज
मोहित शर्माच्या नावावर लाजीरवाणा विक्रम, IPL च्या इतिहासातील सर्वात महागडा गोलंदाज
OTT Movies : ओटीटीवर हॉरर धमाका! स्वत:च्या सावलीलाही घाबराल, अशा सत्य घटनांवर आधारित चित्रपटांची मेजवानी
ओटीटीवर हॉरर धमाका! स्वत:च्या सावलीलाही घाबराल, अशा सत्य घटनांवर आधारित चित्रपटांची मेजवानी
Embed widget