एक्स्प्लोर

Nikhil Wagle Car Attack : निखिल वागळे, अॅड. असीम सरोदेंवरील हल्ल्याचे पडसाद; मराठी सिनेकलाकारांकडून निषेधाचा आवाज

Nikhil Wagle Car Attack : मराठी कलाकारांनीदेखील या हल्ल्याचा निषेध केला आहे. सोशल मीडियावर पोस्ट लिहून कलाकारांनी भाजप कार्यकर्त्यांनी केलेल्या हल्ल्याचा निषेध केला आहे.

Nikhil Wagle Car Attack : ज्येष्ठ पत्रकार निखील वागळे (Nikhil Wagle), विधीज्ञ अॅड. असीम सरोदे (Aseem Sarode), सामाजिक कार्यकर्ते डॉ. विश्वंभर चौधरी (Vishwambhar Chaudhari) यांच्या कारवर झालेल्या हल्ल्याचे पडसाद उमटू लागले आहेत. या हल्ल्याचा पत्रकार संघटना, सामाजिक संघटनांकडून निषेध व्यक्त होत आहे. मराठी कलाकारांनीदेखील या हल्ल्याचा निषेध केला आहे. सोशल मीडियावर पोस्ट लिहून कलाकारांनी भाजप कार्यकर्त्यांनी केलेल्या हल्ल्याचा निषेध केला आहे. 

पुण्यात राष्ट्र सेवा दलाच्या साने गुरुजी स्मारक सभागृहात निर्भय बनो  सभेचे आयोजन करण्यात आले होते. ही सभा झाल्यास उधळून लावण्याचा इशारा भाजपने दिला होता. मात्र, आयोजक सभा घेण्यावर ठाम राहिले. सभागृहाच्या दिशेने जात असताना ज्येष्ठ पत्रकार निखील वागळे, अॅड. असीम सरोदे आणि डॉ.विश्वंभर चौधरी यांच्या कारवर वाटेतच हल्ला झाला. प्रवास करत असलेली कार चारही बाजूने फोडण्यात आली. त्याशिवाय शाई फेक करण्यात आली.

कलाकारांकडून निषेध व्यक्त 

पुण्यात झालेल्या या हल्ल्याचा निषेध कलाकारांनीदेखील केला आहे. चित्रपट निर्माता-दिग्दर्शक-अभिनेता हेमंत ढोमे याने देखील हल्ल्याच्या विरोधात भूमिका घेतली. त्याने म्हटले की, जेव्हा विचारांनी लढता येत नाहीत तेव्हा झुंडशाही आणि हिंसेचा मार्ग पत्करला जातो. पुर्वापार हेच होत आलं आहे, आपण निर्भय होऊन काल जे केलंत त्याने विचार बळकट झाला आणि झुंडशाही हरली असल्याचे हेमंत ढोमे याने निखिल वागळे यांनी उद्देशून म्हटले. 

 

मराठी अभिनेत्री वीणा जामकर हिने देखील फेसबुकवर हल्ल्याचा निषेध केला. निखिल वागळे, चौधरी सर, आणि असीम सरोदे ह्यांच्यावरील हल्ल्याचा जाहीर निषेध!!! असल्याची पोस्ट वीणा जामकर हिने केली. 

अभिनेता आणि शिवसेना ठाकरे गटाचे उपनेते किरण माने यांनीदेखील या हल्ल्याचा निषेध केला आहे. हमीं पे हमला करके, हमीं को हमलावर बताना...सब याद रखा जाएगा, सबकुछ याद रखा जाएगा ! या कवितेच्या काही ओळी माने यांनी पोस्ट केल्या आहेत. 

 

भाजप, महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांवर अन् निखिल वागळेंवर गुन्हा दाखल

पुण्यात निखील वागळेंच्या गाडीवर झालेला हल्ला आणि कार्यक्रमाच्या ठिकाणी झालेल्या गोंधळाबद्दल पुण्यात पोलिसांनी दोन स्वतंत्र गुन्हे दाखल केलेत. पहिला गुन्हा पत्रकार निखिल वागळेंच्या गाडीवर हल्ला केल्याबद्दल भाजप आणि अजित पवार गटाच्या माजी नगरसेवकांसह पुण्याचे माजी महापौर मुरलीधर मोहोळ यांच्या पुतण्यावर  दाखल करण्यात आला.  गुन्हा दाखल करण्यात आलेल्यांमध्ये भाजपचे माजी नगरसेवक दीपक पोटे, अजित पवार गटाचे माजी नगरसेवक दत्ता सागरे, माजी महापौर मुरलीधर मोहोळ यांचे पुतणे दुष्यंत मोहोळ यांचा समावेश आहे. तर दुसरा गुन्हा कार्यक्रमाच्या ठिकाणी  आंदोलन केल्याबद्दल महायुती आणि महाविकास आघाडीच्या नेत्यांसह पत्रकार निखिल वागळेंवरदेखील दाखल करण्यात आला आहे

महत्त्वाच्या बातम्या

BMM 2026 : सिअॅटलमध्ये रंगणार जागतिक मराठी मेळावा; संस्कृती, ज्ञान, उद्योजकता आणि मनोरंजनाचा चौफेर संगम
सिअॅटलमध्ये रंगणार जागतिक मराठी मेळावा; संस्कृती, ज्ञान, उद्योजकता आणि मनोरंजनाचा चौफेर संगम
Raah : यश राज फिल्म्सच्या ‘राह रेकॉर्ड्स’ची पहिली संगीतपेशी; ‘जादूगरी’ हे गीत प्रदर्शित
यश राज फिल्म्सच्या ‘राह रेकॉर्ड्स’ची पहिली संगीतपेशी; ‘जादूगरी’ हे गीत प्रदर्शित
Lakshmi Nivas Zee Marathi Serial 7 Year Leap: ‘सात वर्षांत बरंच काही बदललंय...’; ‘लक्ष्मी निवास’ मालिकेत 7 वर्षांचा लीप, तर मुख्य अभिनेत्याचीच एक्झिट, चाहतेही गोंधळले, VIDEO
‘सात वर्षांत बरंच काही बदललंय...’; ‘लक्ष्मी निवास’ मालिकेत 7 वर्षांचा लीप, तर मुख्य अभिनेत्याचीच एक्झिट, चाहतेही गोंधळले
Amruta Khanvilkar Himanshu Malhotra Divorce Rumors: अमृता खानविलकरच्या वैवाहिक आयुष्याबाबत उलटसुलट चर्चा; आता पोस्ट करत म्हणाली, ‘बऱ्याचदा प्रेम हरवून जातं...’
अमृता खानविलकरच्या वैवाहिक आयुष्याबाबत उलटसुलट चर्चा; आता पोस्ट करत म्हणाली, ‘बऱ्याचदा प्रेम हरवून जातं...’

व्हिडीओ

Kunbi Certificate Issues Special Report : मराठा आरक्षणाचा पेच वाढला? कुणबी दाखलेच अवैध? | Special Report
Dharashiv News Special Report : धाराशिव जिल्हा परिषदेच्या दोन तास टीव्ही, मोबाईल बंद उपक्रमाला सुरुवात | Special Report
Analogue paneer Special Report : महाराष्ट्रात ॲनालॉग पनीरवर वर्षभराची बंदी, तुकाराम मुंढेंचा तडाखा
Mumbai Mayor Bungalow Special Report : मुंबई महापालिकेचा नव्या टेंडरमुळे वादंग : Ritu Tawade
Gungi Gudiya Special Report : गूंगी गुडिया ते गूंगा गुड्डा, मौनावरून राजकारण की राजकारणासाठी मौन?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
FSSAI Action : Old Monk सह इतर दारू आणि खाद्यपेये FSSAIच्या निशाण्यावर का आहेत? देशभर धडक कारवाई
Old Monk सह इतर दारू आणि खाद्यपेये FSSAIच्या निशाण्यावर का आहेत? देशभर धडक कारवाई
Sunetra Pawar : म्हाडाच्या प्रलंबित गृहनिर्माण प्रकल्पांना तातडीने गती द्या; उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे निर्देश
म्हाडाच्या प्रलंबित गृहनिर्माण प्रकल्पांना तातडीने गती द्या; उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे निर्देश
'एबीपी माझा' इम्पॅक्ट; बिबट्यासह पिल्लांचा वावर, वन अधिकारी थेट वावरात; बिबटे जेरबंद करण्यासाठी पिंजरे तैनात
'एबीपी माझा' इम्पॅक्ट; बिबट्यासह पिल्लांचा वावर, वन अधिकारी थेट वावरात; बिबटे जेरबंद करण्यासाठी पिंजरे तैनात
कोर्टाच्या तारखेला वेळेवर हजर न राहणे भोवले, 2020 चं प्रकरण; मुंबईतील भाजप नगरसेवकास अटक
कोर्टाच्या तारखेला वेळेवर हजर न राहणे भोवले, 2020 चं प्रकरण; मुंबईतील भाजप नगरसेवकास अटक
Congress News : काँग्रेसचे नेतृत्व तळागाळापासून तुटलं, निष्ठावानांना डावललं जातंय, महिला नेत्याचा गंभीर आरोप
काँग्रेसचे नेतृत्व तळागाळापासून तुटलं, निष्ठावानांना डावललं जातंय, महिला नेत्याचा गंभीर आरोप
BMM 2026 : सिअॅटलमध्ये रंगणार जागतिक मराठी मेळावा; संस्कृती, ज्ञान, उद्योजकता आणि मनोरंजनाचा चौफेर संगम
सिअॅटलमध्ये रंगणार जागतिक मराठी मेळावा; संस्कृती, ज्ञान, उद्योजकता आणि मनोरंजनाचा चौफेर संगम
रस्ता आहे की, चिखलमार्ग; गोवा मार्गावर बससह वाहने फसली, विद्यार्थ्यांसह नागरिकांना मोठा त्रास
रस्ता आहे की, चिखलमार्ग; गोवा मार्गावर बससह वाहने फसली, विद्यार्थ्यांसह नागरिकांना मोठा त्रास
विलास घुले मृत्यू प्रकरण! खासदार बजरंग सोनवणेंच्या मुलाला अटक करा नाहीतर आम्ही… बीड जिल्हाधिकारी कार्यालयासमोर घुले कुटुंबीयांचे आमरण उपोषण 
विलास घुले मृत्यू प्रकरण! खासदार बजरंग सोनवणेंच्या मुलाला अटक करा नाहीतर आम्ही… बीड जिल्हाधिकारी कार्यालयासमोर घुले कुटुंबीयांचे आमरण उपोषण 
Embed widget