नखरेल चाल, कमरेत लचकणं अन् मानेत मुरडणं, 'फुलवंती'च्या 'बायजा'ची भूमिका साकारताना; अभिनेता निखिल राऊत म्हणाला, हा 'बायजा ...'
Marathi Movie : फुलवंती या सिनेमात अभिनेता निखिल राऊतने बाजयाची भूमिका साकारली आहे. निखिलने या भूमिकेविषयी त्याच्या भावना व्यक्त केल्या आहेत.
Phulwanti Marathi Movie : बाबासाहेब पुरंदरे यांच्या कादंबरीवर आधारित फुलवंती हा सिनेमा नुकताच प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. या सिनेमाच्या माध्यमातून अभिनेत्री स्नेहल तरडेने दिग्दर्शन क्षेत्रात आणि अभिनेत्री प्राजक्ता माळी हिने निर्मिती क्षेत्रात पाऊल ठेवलं आहे. अभिनेत्री प्राजक्ता माळी (Prajakta Mali) हिनेच या सिनेमात फुलवंती साकारली आहे. तसेच बॉक्स ऑफिसवरही यश मिळवलं. या सिनेमात अभिनेता निखिल राऊतने (Nikhil Raut) बाजयाची भूमिका साकारली आहे. निखिलने सिनेमाच प्रदर्शित झाला त्या दिवशी पोस्ट करत या बायजाच्या भूमिकेचा अनुभव सांगितला होता.
निखिलची पोस्ट काय?
निखिलने त्याचे काही फोटो शेअर करत म्हटलं की, मला आव्हानात्मक भूमिका साकारायला नेहमीच आवडतं मग ती लहान असो अथवा मोठी ,अशीच एक' बायजा ' ही भूमिका ' फुलवंती' या सिनेमात मला देऊ केली ती माझ्या दोन मैत्रिणींनी स्नेहल तरडे आणि प्राजक्ता माळी.ह्या दोघींचा दिग्दर्शिका आणि निर्माती म्हणून पाहिला प्रयत्न तुम्हा दोघींना खूप खूप शुभेच्छा.
'तो साडी नेसला असता तरी तिघीत 'चौथी' शोभला असता!'
निखिलने पुढे म्हटलं की, 'मनात धाकधूक होती हि छोटीशी भूमिका साकारताना प्रेक्षक ती कशी स्वीकारतील...लहानपणी एकदा बाबासाहेबांच्या घरी भेटायला गेलो असताना स्वतः बाबासाहेबांच्या तोंडून ह्या कथेचा उल्लेख केला गेला तेंव्हा आवर्जून ही कथा वाचून काढली होती . त्यात त्यांनी लिहिलेले शब्द होते ..."या पोरींत अशाच नखऱ्यात चालला होता, एक नाजूक पोरगा, जरीची लखनवी टोपी घातलेला. अंगात अशीच जरी-मखमलीची पेशावरी मिरजाई घातलेला. पोराचं रूप होतं कोवळ्या कबुतरासारखं. तो पोर त्या तीन पोरींसारखाच हसत होता, मुरकत होता. डोळे मिचकावीत होत्या. पोरींशी तो सलगीने वागत होता. त्याची झुलपं टोपीबाहेर झुपकत होती. तो साडी नेसला असता तरी तिघीत 'चौथी' शोभला असता! डोळ्यांत काजळ, तोंडात पान, उडत्या भिवया, नखरेल चाल, कमरेत लचकणं अन् मानेत मुरडणं असा या कबुतराचा आणि त्या मैनांचा ढंग होता.'इतकं कमाल वर्णन केलं होतं कथेत . हे शब्द वाचताना त्यांचा आवाज घुमतो कानात अजूनही त्यांच्या खास शैलीतला. विनम्र अभिवादन त्यांना
चित्रपटात सुध्दा हा 'बायजा...'
चित्रपटात सुध्दा हा 'बायजा ' फुलवंतीच्या पाठीशी सावली प्रमाणे उभा राहिला आहे.वेशभूषा मानसी अत्तरदे आणि रंगभूषा महेश बराटे ह्याचं विशेष कौतुक हा बायजा ह्या सगळ्यामुळे मला साकारायला खूप मदत झाली. प्राजक्ता माळी, श्वेता माळी,स्नेहल तरडे, प्रविण तरडे, महेश लिमये , उमेश जाधव, एकनाथ कदम, मयूर हरदास,विक्रम धाकतोडे, मंगेश पवार, मुरलीधर छतवानी, रवींद्र औटी, अमोल जोशी , कुमार मंगत पाठक सर ,माझे सगळे सहकलाकार, तंत्रज्ञ सगळ्यांचे आभार, चित्रपट कसा वाटला ते कळवा. इतर दिग्गज कलाकारांच्या भूमिकां मध्ये माझा हा 'बायजा 'तुमच्या लक्षात राहील न राहील माहीत नाही,पण माझा प्रयत्न कसा वाटला ते जरूर कळवा. तूमचे आशिर्वाद आणि प्रेम् असू द्याअसं म्हणत निखिलने या भूमिकेविषयीच्या त्याच्या भावना व्यक्त केल्या आहेत.
View this post on Instagram