एक्स्प्लोर

Nikhil Nanda: अमिताभ बच्चन यांच्या जावयाविरोधात फसवणुकीचा गुन्हा; व्यक्तीला जीव द्यायला भाग पाडलं, नेमकं प्रकरण काय?

Nikhil Nanda Booked Abetment To Suicide Fraud Case: अमिताभ बच्चन यांचे जावई निखिल नंदा आणि इतर अधिकाऱ्यांवर ट्रॅक्टर एजन्सी मालकाला आत्महत्या करण्यास प्रवृत्त केल्याचा आरोप आहे.

Nikhil Nanda Booked Abetment To Suicide Fraud Case: बॉलिवूडचे (Bollywood) बिग बी अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) यांच्या कुटुंबाच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. अमिताभ बच्चन यांची कन्या श्वेता नंदाचे (Shweta Bachchan-Nanda) पती निखिल नंदा (Nikhil Nanda) यांच्यावर गुन्हा दाखल झाल्याची माहिती मिळत आहे. निखिल नंदा यांच्यावर फसवणूक आणि आत्महत्येला प्रवृत्त केल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, हे प्रकरण न्यायालयात पोहोचलं, त्यानंतर न्यायालयानं दिलेल्या निर्देशांनंतर खटला दाखल करण्यात आला. निखिल नंदा यांच्यासोबतच 9 जणांविरोधात फसवणूक आणि आत्महत्येला प्रवृत्त केल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलाय. 

'ईटीव्ही भारत'च्या वृत्तानुसार, कंपनीचे सीएमडी निखिल नंदा, फर्मचे उत्तर प्रदेश प्रमुख, क्षेत्र व्यवस्थापक, विक्री व्यवस्थापक, शाहजहांपूर डीलर आणि इतर तीन अधिकाऱ्यांची नावे यादीत समाविष्ट आहेत. त्यांच्यावर ट्रॅक्टर एजन्सीचे मालक जितेंद्र सिंह यांना आत्महत्या करण्यास भाग पाडल्याचा आरोप आहे. वृत्तानुसार, पापड हमजापूर गावातील रहिवासी ज्ञानेंद्र यांनी ही तक्रार दाखल केली आहे. ज्ञानेंद्र यांचा भाऊ जितेंद्र सिंह दातागंजमध्ये जय किसान ट्रेडर्स नावाची ट्रॅक्टर एजन्सी चालवत होता. 

निखिल नंदा आणि इतर 9 जणांविरोधात गुन्हा दाखल 

सुरुवातीला जितेंद्र त्यांचा सहकारी लल्ला बाबू यांच्यासोबत व्यवसाय सांभाळायचा. पण, कौटुंबिक वादामुळे बाबू तुरुंगात गेल्यानंतर, जितेंद्र एकटाच एजन्सीचं काम सांभाळत होता. ज्ञानेंद्र यांनी आरोप केला की, निखिल नंदा यांनी कंपनीचे अधिकारी आशिष बालियान (एरिया मॅनेजर), सुमित राघव (सेल्स मॅनेजर), दिनेश पंत (यूपी हेड), पंकज भास्कर (फायनान्स कलेक्शन ऑफिसर), अमित पंत (सेल्स मॅनेजर), नीरज मेहरा (सेल्स हेड) आणि शिशांत गुप्ता (शाहजहांपूर डीलर) यांच्यासह जितेंद्रवर विक्री वाढवण्यासाठी वारंवार दबाव आणला. 

मिळालेल्या माहितीनुसार, त्या सर्वांनी विक्रीचं लक्ष्य पूर्ण न झाल्यास त्यांचा डीलरशिप परवाना रद्द करण्याची आणि त्याच्या मालमत्तेचा लिलाव करण्याची धमकी दिली होती. असं म्हटलं जातंय की, जितेंद्र खूप तणावाखाली होता आणि त्यानं त्याच्या कुटुंब आणि मित्रांसोबत त्याच्या समस्या शेअर केल्या होत्या.

निखिल नंदा यांच्यामुळे केली आत्महत्या? 

21 नोव्हेंबर 2024 रोजी, कंपनीचे काही अधिकारी त्याला पुन्हा भेटल्याचं वृत्त आहे, ज्यामुळे दबाव वाढला. दुसऱ्या दिवशी, 22 नोव्हेंबर रोजी, जितेंद्रनं आत्महत्या केली. जितेंद्रच्या कुटुंबाचा असा दावा आहे की, न्यायालयानं हस्तक्षेप करेपर्यंत पोलिसांनी कोणतीही कारवाई केली नाही. न्यायालयाच्या निर्देशानंतर, आता सर्व आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

जितेंद्रच्या वडिलांनी निखिल नंदा यांच्याबाबत काय म्हटलं?

जितेंद्रचे वडील शिव सिंह म्हणाले की, त्यांना निखिल नंदा यांच्या संबंधांची माहिती नव्हती. परंतु त्यांनी त्यांच्या मुलाच्या दुःखद मृत्यूसाठी कंपनीला जबाबदार धरलं. ते म्हणाला, "मला माहीत नाही तो कोण आहे. आम्हाला न्याय हवा आहे." 

दरम्यान, दातागंज पोलीस स्टेशनचे प्रभारी गौरव विष्णोई यांनी तपास सुरू असल्याची पुष्टी केली. निखिल नंदा केवळ अभिषेक बच्चनचा मेहुणे नाही. तर ते राज कपूरची मुलगी रितू नंदा यांचेही चिरंजीव आहेत. ऋषी कपूर, रणधीर कपूर आणि राजीव कपूर हे त्यांचे मामा आहेत. तर करिश्मा कपूर, करीना कपूर खान आणि रणबीर कपूर ही मावस भावंड आहेत. 

महत्त्वाच्या इतर बातम्या : 

Nana Patekar Wife In Chhaava Movie: 'छावा'मध्ये 'या' दिग्गज मराठमोळ्या अभिनेत्याच्या पत्नीनं साकारलीय 'धाराऊ'; नवऱ्यापासून वेगळी राहते, पण...

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

आज आपण जिवंत आहोत ते केवळ मोदींनी दिलेल्या लसीमुळे : भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण
आज आपण जिवंत आहोत ते केवळ मोदींनी दिलेल्या लसीमुळे : भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण
Gold Rate : सोन्याच्या दरात तेजी सुरु, सोनं 1360 रुपयांनी महागलं, 24 आणि 22 कॅरेट सोन्याचे दर जाणून घ्या
सोन्याच्या दरात तेजी सुरु, सोनं 1360 रुपयांनी महागलं, 24 आणि 22 कॅरेट सोन्याचे दर जाणून घ्या
Kolhapur News:  नामवंत शाळेतील मास्तर महिलेसोबत रंगेहाथ सापडला; गावकऱ्यांनी पहिल्यांदा बेदम चोपला मग नग्न करून तब्बल तीन तास दोरीने बांधून घातला!
कोल्हापूर : नामवंत शाळेतील मास्तर महिलेसोबत रंगेहाथ सापडला; गावकऱ्यांनी पहिल्यांदा बेदम चोपला मग नग्न करून तब्बल तीन तास दोरीने बांधून घातला!
भाजपचा एखादा नगरसेवक निवडून आला तर खूप झालं; जळगावात भाजप अन् शिवसेनेत जुंपली, नेते आमने-सामने
भाजपचा एखादा नगरसेवक निवडून आला तर खूप झालं; जळगावात भाजप अन् शिवसेनेत जुंपली, नेते आमने-सामने
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Nana patole and Chandrashekhar Bawankule : नाना पटोले आणि चंद्रशेखर बावनकुळे यांच्यात चांगलीच जुंपली
Nitesh Rane PC : Nilesh Rane यांचा बळीचा बकरा केला जातोय; नितेश राणेंनी केली भावाची पाठराखण
Raj Thackeray Nashik Tree cutting: दुसरीकडे झाडं लावायला पाचपट जागा असेल तर साधुग्राम तिकडेच करा
Top 100 : टॉप 100 बातम्यांचा वेगवान आढावा एका क्लिकवर सुपरफास्ट 29 नोव्हेंबर 2025
Sayaji Shinde Nashik Tapovan Tree Cutting : एकही झाड तुटू देणार नाही, झाडं तोडल्यास माफी नाही

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
आज आपण जिवंत आहोत ते केवळ मोदींनी दिलेल्या लसीमुळे : भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण
आज आपण जिवंत आहोत ते केवळ मोदींनी दिलेल्या लसीमुळे : भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण
Gold Rate : सोन्याच्या दरात तेजी सुरु, सोनं 1360 रुपयांनी महागलं, 24 आणि 22 कॅरेट सोन्याचे दर जाणून घ्या
सोन्याच्या दरात तेजी सुरु, सोनं 1360 रुपयांनी महागलं, 24 आणि 22 कॅरेट सोन्याचे दर जाणून घ्या
Kolhapur News:  नामवंत शाळेतील मास्तर महिलेसोबत रंगेहाथ सापडला; गावकऱ्यांनी पहिल्यांदा बेदम चोपला मग नग्न करून तब्बल तीन तास दोरीने बांधून घातला!
कोल्हापूर : नामवंत शाळेतील मास्तर महिलेसोबत रंगेहाथ सापडला; गावकऱ्यांनी पहिल्यांदा बेदम चोपला मग नग्न करून तब्बल तीन तास दोरीने बांधून घातला!
भाजपचा एखादा नगरसेवक निवडून आला तर खूप झालं; जळगावात भाजप अन् शिवसेनेत जुंपली, नेते आमने-सामने
भाजपचा एखादा नगरसेवक निवडून आला तर खूप झालं; जळगावात भाजप अन् शिवसेनेत जुंपली, नेते आमने-सामने
पैसे दिले तर काजू, किसमिस म्हणून खाऊन घ्यायचे,धनुष्यबाणाचे बटन दाबायचे; आमदार सत्तारांचे मतदारांना आवाहन
पैसे दिले तर काजू, किसमिस म्हणून खाऊन घ्यायचे,धनुष्यबाणाचे बटन दाबायचे; आमदार सत्तारांचे मतदारांना आवाहन
Devendra Fadnavis : मी कोणावरही टीका करत नाही, आमच्याकडे नीती, नियती आहे अन् निधी देखील आहे; देवेंद्र फडणवीसांचे सूचक वक्तव्य; राज्याच्या तिजोरीबाबत पुनर्उच्चार?
मी कोणावरही टीका करत नाही, आमच्याकडे नीती, नियती आहे अन् निधी देखील आहे; देवेंद्र फडणवीसांचे सूचक वक्तव्य; राज्याच्या तिजोरीबाबत पुनर्उच्चार?
Accident: भरधाव डंपर खडीसकट कारवर कोसळला; 4 वर्षाच्या चिमुरड्यासह एकाच कुटुंबातील 7 जणांचा अंत, काकाच्या अत्यसंस्काराला जाताना अवघं कुटुंब क्षणात उद्ध्वस्त
भरधाव डंपर खडीसकट कारवर कोसळला; 4 वर्षाच्या चिमुरड्यासह एकाच कुटुंबातील 7 जणांचा अंत, काकाच्या अत्यसंस्काराला जाताना अवघं कुटुंब क्षणात उद्ध्वस्त
Kolhapur News: मुरगुडला राष्ट्रवादीच्या उमेदवाराच्या दारात दोन पत्रावळीत लिंबू, नारळ, हळद टाकत भानामती!
मुरगुडला राष्ट्रवादीच्या उमेदवाराच्या दारात दोन पत्रावळीत लिंबू, नारळ, हळद टाकत भानामती!
Embed widget