प्रसिद्ध वेश्या होती बॉलीवूडची पहिली 'शो वुमन'; सौंदर्य पाहून अन् प्रेमासाठी व्यावसायिकानं धर्मही बदलला; ब्रिटिशांना सुद्धा हेवा वाटला!
nargis dutt mother jaddanbai :प्रसिद्ध वेश्या होती बॉलीवूडची पहिली 'शो वुमन'; सौंदर्य पाहून अन् प्रेमासाठी व्यावसायिकानं धर्मही बदलला; ब्रिटिशांना सुद्धा हेवा वाटला!

nargis dutt mother jaddanbai : राज कपूर त्यांच्या सिनेमांमुळे आणि टॅलेंटमुळे ‘शो मॅन’ म्हणून ओळखले जायचे. मात्र, त्यांच्या अगोदर देखील बॉलिवूड आणि हिंदी सिनेमात एक ‘शो वुमन’ होती. तिच्या आयुष्याबाबत नेहमीच चर्चा होते. ती बिहारमधून आले होती. बनारसच्या एका कोठ्यात असायची. मात्र, नंतरच्या काळात तिनं सिनेमात काम केलं. ती अभिनय करायची, सिनेमे बनवायची आणि गाणी देखील गात होती. ती एवढी सुंदर होती की, मोठ्या घराण्यातील पुरुषांचा देखील तिच्यावर जीव जडला होता. मात्र, इंग्रजांमध्ये तिच्याबाबत द्वेष होता. ही अभिनेत्री दुसरी तिसरी कोणी नसून जद्दनबाई ही आहे.
जद्दनबाई या प्रसिद्ध अभिनेत्री नर्गिस हिच्या आई...त्यांनी 1933 मध्ये रिलीज झालेल्या ‘राजा गोपीचंद’ या सिनेमात आईची भूमिका निभावत प्रसिद्धी मिळवली होती. तिने स्वत:चं प्रॉडक्श हाऊस उघडलं होतं. नर्गिला अवघ्या 6 वर्षांची असताना तिने सिनेक्षेत्रात आणलं होतं. जद्दनबाई यांचा पती प्रसिद्ध बिझनेसमॅन होता. त्यांचं नाव नरोत्तम दास होतं. त्यांनी प्रेमासाठी इस्लाम धर्म स्वीकारला होता. मात्र, मुलगा झाल्यानंतर निरोदत्ता दास यांनी पत्नी जद्दनबाई यांनी सोडून दिले.
बनारस सोडलं आणि कोलकाताची राहिवासी झाली होती जद्दनबाई
जद्दनबाई यांचा दुसरा विवाह मास्टर उत्साद इरशाद यांच्याशी झाला होता. मात्र, हा विवाह देखील जास्त काळ टिकला नाही. जद्दनबाईंच्या वैयक्तिक आयुष्यात अनेक चढ-उतार आले आहेत. मात्र, त्यांची प्रसिद्धी वाढतच राहिली. त्यांच्यावर इंग्रजांकडून हेरगिरी करण्यात येत होती. कारण इंग्रजांना संशय होता की, जद्दनबाई क्रांतिकारकांना आश्रय देतात. त्यानंतर त्या बनारस सोडून कोलकाता येथे गेल्या. जद्दनबाई यांच्या आयुष्यात सर्वांत मोठा उलटफेर झाला तो श्रीमंत कुटुंबाचा वारस मोहन बाबू याची भेट झाल्यानंतर ... त्याने जद्दनबाईसाठी धर्म बदलून टाकला होता. प्रसिद्ध अभिनेत्री नर्गिस ही त्यांची मुलगी आहे.
नर्गिसला तिच्या आई जद्दनबाई फातिमा म्हणत असत तर तिच्या वडिलांनी तिला आश्चर्यकारक नाव दिले होते. बीबीसीच्या वृत्तानुसार, यासर उस्मान म्हणतात, जद्दनबाई चित्रपट बनवायच्या, त्यांची निर्मिती करायच्या, दिग्दर्शन करायच्या, त्यात अभिनय करायच्या आणि त्यांना संगीतही द्यायच्या. गाणी म्हणायची. ती सगळं करायची. आपण नंतर राज कपूरला शोमन म्हटले, पण जर कोणाला शो वुमनची पदवी मिळाली तर ती जद्दनबाई असेल.
इतर महत्त्वाच्या बातम्या























