सई ताम्हणकर साकारणार बीएएसएफ जवानाच्या पत्नीची भूमिका, ग्राउंड झीरोमध्ये इम्रान हाश्मी सोबत महत्त्वाचा रोल
Sai Tamhankar : श्रीनगर मध्ये पार पडला सईच्या ग्राउंड झीरोचा ग्रँड प्रीमियर !

Sai Tamhankar : सध्या सोशल मीडिया वर जिच्या चर्चा आहेत अशी एकमेव मल्टीटास्किंग क्वीन म्हणजे सई ताम्हणकर ! अभिनय आणि तिचं समीकरण कमालीचं आहे हे तिच्या प्रत्येक प्रोजेक्ट्स मधून अनुभवायला मिळतंय. उत्तम काम आणि तिच्या वैविध्यपूर्ण भूमिका कायम लक्षवेधी ठरत असताना सई आता ग्राउंड झीरो चित्रपटात झळकणार आहे.
इम्रान हाश्मी सोबत सई ग्राउंड झीरो मध्ये दिसणार असून ही फ्रेश जोडी पहिल्यांदाच प्रेक्षकांना बघायला मिळणार आहे. गेल्या काही दिवसांपासून तिच्या बॉलिवूड मधल्या कामाची रेलचेल बघायला मिळते असं म्हणायला हरकत नाही. सातत्यपूर्ण कामगिरी करून सई बॅक टू बॅक बॉलिवुड प्रोजेक्ट्स मध्ये सई तिच्या अभिनयाने प्रेक्षकांचं निखळ मनोरंजन करतेय.
View this post on Instagram
ग्राउंड झीरो प्रदर्शित होण्यापूर्वीच या सिनेमाने एक अनोखा विक्रम केला आहे आणि संपूर्ण चित्रपटसृष्टी मध्ये याबद्दल एक वेगळीच चर्चा रंगली आहे. एक्सेल एंटरटेनमेंट निर्मित आणि मराठमोळ्या तेजस देऊस्करने दिग्दर्शित केलेल्या 'ग्राउंड झीरो' या चित्रपटाचे श्रीनगरमध्ये रेड कार्पेट स्क्रीनिंग झालं आणि
अशाप्रकारे रेड कार्पेट स्क्रीनिंग होणारा गेल्या 38 वर्षातील हा पहिला चित्रपट असल्याने ग्राउंड झीरो'ने एक इतिहास रचला आहे.
भारतीय चित्रपटसृष्टीतील या ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार होण्यासाठी सई सोबतीने इम्रान आणि निर्माता फरहान अख्तर आणि चित्रपटातील इतर मंडळी श्रीनगरमध्ये गेली होती. सई ग्राउंड झीरो सिनेमात बीएसएफ जवान नरेंद्र दुबे यांच्या पत्नीची भूमिका साकारणार असून आता सईला ग्राउंड झीरो मध्ये बघण्यासाठी सगळेच उत्सुक आहेत.
View this post on Instagram
श्रीनगरमध्ये झालेल्या 'ग्राउंड झीरो' च्या ऐतिहासिक स्क्रीनिंगसाठी सईने खास लाल रंगाच्या सलवार सूटला पसंती दिली असून तिने सोशल मीडियावर तिच्या रेड कार्पेट लूकचे काही फोटोही शेअर केले आहेत. येणाऱ्या काळात सई अजून कमालीच्या आणि तितक्याच आव्हानात्मक भूमिका मोठ्या पडद्यावर साकारताना दिसणार आहे यात शंका नाही.
इतर महत्त्वाच्या बातम्या
महेश मांजरेकरांना जीवनगौरव, अनुपम खेर, काजोल, मुक्ता बर्वे अन् भीमराव पांचाळांनाही पुरस्कार जाहीर























