'शिवाजी... राजा शिवाजी... छत्रपती शिवाजी'; नागराज-रितेश रुपेरी पडद्यावर साकारणार 'शिवत्रयी'
फॅन्ड्री, सैराट यांसारख्या रेकॉर्ड ब्रेक चित्रपटांनंतर नागराजचा आगामी चित्रपट 'झुंड' रिलीज होणार आहे. त्याआधीच नागराजने आपल्या आगामी चित्रपटाची घोषणा केली आहे. शिवरायांचा इतिहास उलगडणारी ही 'शिवत्रयी' दिग्दर्शक नागराज मुंजुळे, प्रसिद्ध संगीतकार जोडी अजय-अतुल आणि अभिनेता रितेश देशमुख यांच्या संकल्पनेतून रूपेरी पडद्यावर अवतरणार आहे.
मुंबई : सैराट फेम दिग्दर्शक नागराज मंजुळे सध्या झुंड चित्रपटाच्या पोस्ट प्रॉडक्शनमध्ये बिझी असतानाच त्यांनं आपल्या नव्या चित्रपटाची घोषणा केली आहे. शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्तानं शिवरायांच्या जीवनप्रवासावर तीन सिनेमे बनवणार असल्याची घोषणा नागराज मंजुळेनं केली आहे. यासाठी त्यानं एक खास व्हिडीओही शेअर केला आहे. 'शिवत्रयी' या नावाची चित्रपटांची मालिका असणार आहे.
नागराज मंजुळेने आपल्या ट्विटर हॅन्डलवरून एक व्हिडीओ शेअर केला आहे. व्हिडीओ शेअर करताना नागराजने लिहिलं आहे की, 'एखाद्या स्वप्नाच्या उंबरठ्यावर उभं राहणं म्हणजे हेच असावं कदाचित...आज शिवरायांच्या जन्मदिनाच्या निमित्ताने हे सांगायला लय आनंद वाटतोय की, रितेश देशमुख, अजय-अतुल यांच्या सोबतीने घेऊन येतोय शिवत्रयी... शिवाजी... राजा शिवाजी... छत्रपती शिवाजी. शिवरायांच्या जन्मदिनाच्या खूप साऱ्या सदिच्छा'
एखाद्या स्वप्नाच्या उंबरठ्यावर उभं राहणं म्हणजे हेच असावं कदाचित...आज शिवरायांच्या जन्मदिनाच्या निमित्ताने हे सांगायला लय आनंद वाटतोय की रितेश देशमुख, अजय-अतुल यांच्या सोबतीने घेऊन येतोय शिवत्रयी शिवाजी राजा शिवाजी छत्रपती शिवाजी शिवरायांच्या जन्मदिनाच्या खूप साऱ्या सदिच्छा 🙏🌹 pic.twitter.com/r4GaizGCeE
— nagraj manjule (@Nagrajmanjule) February 19, 2020
फॅन्ड्री, सैराट यांसारख्या रेकॉर्ड ब्रेक चित्रपटांनंतर नागराजचा आगामी चित्रपट 'झुंड' रिलीज होणार आहे. त्याआधीच नागराजने आपल्या आगामी चित्रपटाची घोषणा केली आहे. शिवरायांचा इतिहास उलगडणारी ही 'शिवत्रयी' दिग्दर्शक नागराज मुंजुळे, प्रसिद्ध संगीतकार जोडी अजय-अतुल आणि अभिनेता रितेश देशमुख यांच्या संकल्पनेतून रूपेरी पडद्यावर अवतरणार आहे.
पाहा व्हिडीओ : नागराज मंजुळे आणि रितेश देशमुख साकारणार 'शिवत्रयी'
दरम्यान, दिग्दर्शक नागराज मंजुळे यांचा मराठी चित्रपट सैराट प्रचंड गाजला होता. फक्त महाराष्ट्रातच नाही तर संपूर्ण देशभरात सैराटच्या कथानकाने आणि सैराटच्या गाण्यांनी धुमाकूळ घातला होता. तसेच या चित्रपटाने अनेक पुरस्कार आपल्या नावे केले होते. आता नागराज स्वतः छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास उलगडणारी महागाथ घेऊन येत आहे. नागराजने ट्वीट करताच शिवप्रेमींमध्ये उत्साहाचं वातावरण पाहायला मिळत आहे. तसेच नागराजने साकरलेली 'शिवत्रयी' पाहण्यासाठी शिवप्रेमी उत्सुक आहेत.
संबंधित बातम्या :
बहुप्रतिक्षीत 'झुंड' चित्रपटाचं पोस्टर रिलीज; बॉलिवूडचे महानायक दिसणार मुख्य भूमिकेत
'तान्हाजी'मध्ये इतिहासाचा चुकीचा अर्थ सांगितला, सैफ अली खानच्या वक्तव्याने वाद
लाल साडीमध्ये खुलून दिसतेय जान्हवी; चाहते म्हणाले, 'सेम टू सेम श्रीदेवी'!