![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/Premium-ad-Icon.png)
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
मराठी अभिनेत्री दिपाली सय्यदला फोन करून धमकावणाऱ्या अटक
अभिनेत्री दिपाली सय्यद यांना एका निनावी फोन करून धमकावणाऱ्या आणि अश्लील भाषेत शिवीगाळ करत जीवे ठार मारण्याची धमकी दिली होती.
![मराठी अभिनेत्री दिपाली सय्यदला फोन करून धमकावणाऱ्या अटक Mumbai police arrested Man for threatening Marathi actress Deepali Sayyed मराठी अभिनेत्री दिपाली सय्यदला फोन करून धमकावणाऱ्या अटक](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2020/10/22131522/WhatsApp-Image-2020-10-22-at-7.43.04-AM.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
मुंबई : मराठी अभिनेत्री दिपाली सय्यद यांना फोन करून धमकावणाऱ्या आणि अश्लील भाषेत शिवीगाळ करणाऱ्या आरोपीला मुंबई पोलिसांनी अटक केली आहे. संदीप वाघ असं अटक केलेल्या आरोपीचं नाव असून तो अहमदनगर येथे राहणारा आहे.
प्रसिद्ध मराठी अभिनेत्री दिपाली सय्यद यांना 4 ऑक्टोबर रोजी एका निनावी नंबरवरून फोन आला होता. फोन करून समोरच्याने दीपाली सय्यद यांना एका कार्यक्रमासाठी आमंत्रित केलं होतं. कार्यक्रमासाठी किती मानधन असेल याची बोलणी करत असताना समोरच्या व्यक्तीने दीपाली सय्यद यांना अश्लील भाषेत शिवीगाळ सुरू केली आणि आणि जीवे ठार मारण्याची धमकी दिली. तसेच "नगरला येऊनच दाखव" अशी धमकी सुद्धा दिली.
सुरुवातीला दीपाली सय्यद यांनी याकडे दुर्लक्ष केलं मात्र वारंवार कोण येत असल्याने दीपाली सय्यद या अस्वस्थ झाल्या. त्यानंतर दिपाली यांनी त्यांच्या एका मानलेल्या भावाकडे या फोननंबर बाबत चौकशी केली. त्यांच्या भावाने त्या नंबरवर फोन करून त्याला पोलिसांची भीती दाखवली असता. उलट फोनवरील आरोपीनेच दिपाली या माझाकडून ड्रग्ज घेत असल्याचे सर्वांना सांगिन असे धमकावले.
यानंतर दीपाली सय्यद यांनी 5 ऑक्टोबर रोजी ओशिवारा पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा नोंदवला. पोलिसांनी प्रकरणाची गंभीर दखल हे तात्काळ गुन्हा नोंद करुन घेत युद्धपातळीवर तपास सुरू केला. या आरोपीला शोधण्यासाठी पोलीसांकडून पथक तयार करण्यात आले आणि टेक्निकल टीमची सुद्धा मदत घेण्यात आली.
2019 मध्ये दिपाली या अहमदनगर येथे पाणी प्रश्नावर उपोषण केले होते. तसेच पाण्यावरून त्यांनी तेथील 35 गावांमध्ये जनजागृती केली होती. त्यावेळी दीपाली सय्यद यांनी गावकऱ्यांच्या अनेक समस्यांबाबत काळजी व्यक्त करत ते प्रश्न मार्गी लावण्याचा प्रयत्न केला होता मात्र याचाच राग मनात धरून संदीप वाघ ने हे कृत्य केलं आहे का हे अद्याप कळू शकलेलं नाही.
त्यावेळी त्यांना एका निनावी नंबरहून व्हॉट्सअॅप मेसेज केले होते. त्याचा नंबरदेखील ट्रू काँलरवर तपासला असता. त्यावर संदीप वाघ असे नाव लिहून आले होते. तो आणि आता धमकीसाठी आलेला फोन हा एकाच व्यक्तीने केल्याचा संशय दिपाली यांना आहे. या प्रकरणी दिपाली यांनी ओशिवरा पोलिस ठाण्यात तक्रार नोंदवली होती ज्या नंतर पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला.
19 ऑक्टोबर रोजी पोलिसांना मिळालेल्या माहितीच्या आधारे संदीप वाघ नावाच्या व्यक्तीने दीपाली सय्यद यांना फोनवरून धमकावले असल्याचे कळले आणि तो अहमदनगर येथील कनाळा गावचा रहिवाशी आहे. 19 ऑक्टोबरला पोलिसांनी संदीप वाघला अटक केली. त्याने हे कृत्य का केलं याचा तपास आता पोलीस लावत आहेत.
सदर तपास ओशिवारा पोलिस स्टेशनचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक दयानंद बांगर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक आर जाधव, हेडकॉन्स्टेबल सुनील खैरे पोलीस कॉन्स्टेबल गणेश साळुंके आणि पंकज चव्हाण या पथकाकडून करण्यात आलं.
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)