![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/Premium-ad-Icon.png)
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
आर्यन खानसोबत अटकेत असलेले अरबाज मर्चंट आणि मुनमुन धमेचा कोण आहेत?
मुंबईमध्ये क्रूझवर चाललेल्या ड्रग्ज पार्टीतून अटक केलेल्या अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान यांच्यासह अरबाज सेठ मर्चंट आणि मुनमुन धामेचा यांना आजपर्यंत (4 ऑगस्ट) NCB कोठडी सुनावण्यात आली.
![आर्यन खानसोबत अटकेत असलेले अरबाज मर्चंट आणि मुनमुन धमेचा कोण आहेत? Mumbai Drugs Case who is arbaaz merchant and munmun dhamecha who was present with aryan khan at the cruise drugs party आर्यन खानसोबत अटकेत असलेले अरबाज मर्चंट आणि मुनमुन धमेचा कोण आहेत?](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2021/10/04/33526f4e9064a0ebffccb27da6743492_original.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
मुंबई: मुंबईमध्ये क्रूझवर चाललेल्या ड्रग्ज पार्टीतून अटक केलेल्या अभिनेता शाहरुख खानचा (Shahrukh Khan) मुलगा आर्यन खान (Aryan Khan) यांच्यासह अरबाज सेठ मर्चंट आणि मुनमुन धामेचा यांना आजपर्यंत (4 ऑगस्ट) NCB कोठडी सुनावण्यात आली. आर्यन खानला कालची रात्र नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोच्या कोठडीत काढावी लागली. क्रूझवरच्या ड्रग्ज पार्टी प्रकरणी अटक केल्यानंतर न्यायालयानं आर्यन खानसह तिघांना एक दिवसाची एनसीबी कोठडी सुनावली होती. आज त्यांच्या जामिनावर सुनावणी होणार आहे. ज्येष्ठ वकील सतीश मानेशिंदे आर्यन खानची बाजू न्यायालयात मांडतील. आर्यन खानचे वकिल सतीश मानेशिंदे यांनी सांगितले होते की, आर्यन खानला क्रूझवर आयोजित केलेल्या कार्यक्रमाच्या आयोजकांनी आमंत्रित केले होते.
पाहूयात अरबाज मर्चंट आणि मुनमुन धमेचा कोण आहेत.
अरबाज मर्चंट
अरबाज मर्चंट हा अभिनेता आहे. त्याचे पुर्ण नाव अरबाज सेठ मर्चेंट असे आहे. अरबाज हा आर्यनबरोबरच शाहरूखची मुलगी सुहानाचा देखील जवळचा मित्र आहे. अनेक वेळा सुहाना आणि आर्यनसोबत अरबाजने अनेक पार्ट्यांमध्ये हजेरी लावली आहे. मुंबईमध्ये क्रूझ प्रकरणानंतर अरबाज आणि आर्यनचे पार्ट्यांमधील फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहेत. काही फोटोमध्ये अरबाज आणि आर्यन हे चंकी पांडे यांची मुलगी अनन्या पांडेसोबत दिसत आहेत. अरबाजचे इन्स्टाग्रामवर 30 हजारपेक्षा अधिक फॉलोअर्स असून तो आर्यन खान, सुहाना खान, शनाया कपूर, अलाया एफ, अनन्या पांडे आणि अंजिनी धवन या प्रसिद्ध कलाकरांना फॉलो करतो.
मुनमुन धमेचा
मुनमुन धमेचा ही फॅशन मॉडेल आहे. एका रिपोर्टनुसार, ती मध्यप्रदेशमधील एका बिझनेस मॅनची मुलगी आहे. मुनमुन सोशल मीडियावर नेहमी अॅक्टिव्ह असते. तिच्या वेगवेगळ्या लूकमधील फोटो ती सोशल मीडियावर शेअर करत असते. तिला इन्स्टाग्रामवर 9402 फोलोवर्स आहेत.
आर्यन खानच्या विरोधात एनडीपीएस कलम-27 (मादक पदार्थांचे सेवन करणे), 8-सी (मादक पदार्थांचे उत्पादन,मादक पदार्थ ठेवणे, खरेदी करणे किंवा विकणे) अशा अन्य निगडीत कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कस्टोडियल अर्जात एनसीबीने म्हटले की, "एनसीबीने केलेल्या प्राथमिक तपासात असे उघड झाले आहे की व्हॉट्सअॅप चॅटच्या स्वरूपात गुन्ह्यात सहभाग दर्शवणारे साहित्य आहे, यात स्पष्ट झाले आहे की, अटक केलेले आरोपी (आर्यन खान आणि इतर दोन) ड्रग्ज पुरवठादार आणि तस्करांशी त्यांचे नियमित संबंध होते.
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)