Munawar Faruqui : 'ही कोकणी माणसं चुXX बनवतात', मुनव्वर फारुकीकडून मराठी माणसासाठी अपशब्द; मनसेची आक्रमक भूमिका
Munawar Faruqui : मुनव्वर फारुकीने कोकणी माणासबद्दल बोलताना वापरलेल्या भाषेमुळे मनसे आक्रमक झाली आहे.
Munawar Faruqui : स्टँडअप कॉमेडी शोच्या माध्यमातून मुनव्वर फारुकी (Munawar Faruqui) हा प्रसिद्धीझोतात आला. त्याच्या शोला अगदी हाऊसफुल्ल असा प्रतिसाद देखील कायम मिळतो. तसेच सोशल मीडियावरही त्याचे रिल हे बरेच व्हायरल होतात. त्यामुळे त्याचा एक मोठा चाहतावर्ग आता तयार झाला आहे. पण इतका प्रतिसाद मिळूनही मुनव्वर आता एका वादाच्या भोवऱ्यात अडकल्याचं चित्र आहे. कारण मुनव्वरच्या एका स्टँडअप कॉमेडीच्या शोवरुन आता मनसेने आक्रमक भूमिका घेतली आहे.
मुंबईतील एका स्टँडअप कॉमेडीच्या कार्यक्रमात त्याने मराठी माणसाबद्दल अपशब्द वापरल्याचा मनसेचा आरोप आहे. त्यामुळे आता मुनव्वरच्या विरोधात कारवाई करण्याची मागणी मनसे कार्यकर्त्यांकडून करण्यात आली आहे. त्याचप्रमाणे मनसे कार्यकर्त्यांच्या मागणीनंतर आता मुनव्वरवर काही कारवाई होणार का? हे पाहणंही महत्त्वाचं ठरेल.
मुन्नवरने नेमकं काय म्हटलं?
मुनव्वरच्या एका कार्यक्रमामध्ये लोकांना तो विचारतो की, सगळे मुंबईचेच आहेत ना? इथे येण्यासाठी कुणी प्रवास करुन आलं आहे का? त्यावर प्रेक्षकांमधून एकाने उत्तर दिलं की, मी तळोजावरुन आलोय. आज मी विचारलं तर तळोजा वेगळं झालं आणि जेव्हा यांच्या गावचे लोक विचारतात की, कुठे राहतात, तेव्हा हे लोकं सांगतात की आम्ही मुंबईला राहतो. ही कोकणी माणसं सगळ्यांना च#$ बनवतात. मुनव्वरच्या या जोकवर प्रेक्षकांमधूनही टाळ्या आणि शिट्ट्यांचा कडकडाट झाला.
ह्या मुन्नर्वर फारुकी ने पुन्हा बरळ ओकली ..आता आपल्या कोंकणी लोकांना म्हणतो की कोंकणी लोक चुतीया बनवतात आणि वरून हसतोय ह्याला धडा भेटलाच पाहिजे हा व्हिडिओ कोकण सुपुत्र श्री.अविनाश दादा @avinash_mns जाधव साहेब यांच्या पर्यंत पोचला पाहिजे.तेच ह्याला चांगली अद्दल घडवतील. pic.twitter.com/ElXRleJsV5
— मनसे महाराष्ट्रात फक्त मराठी (@Vashail1) August 12, 2024
याआधीही मुनव्वरवर झाली होती कारवाई
दरम्यान याआधी 2021 मध्ये त्याने एका कार्यक्रमामध्ये हिंदू देव देवतांचा अपमान केल्याचा आरोप त्याच्यावर करण्यात आला होता. त्यामुळे त्याला इंदौर पोलिसांनी अटक देखील केली होती. फारुकीच्या विरोधात भाजप महापौर मालिनी गौर यांचा मुलगा एकलव्य गौरनं तक्रार केली होती. या तक्रारीत त्यांनी म्हटलं होतं की, फारुकीनं नवीन वर्षानिमित्त इंदौरमध्ये आयोजित एका कॉमेडी शोदरम्यान हिंदू देव-देवतांबाबत आणि केंद्रीय गृह मंत्री अमित शाह यांच्या विरुद्ध वादग्रस्त वक्तव्य केलं होतं.
View this post on Instagram