एक्स्प्लोर

Mirzapur 3 Fees : मिर्झापूर वेब सीरीजसाठी कोणत्या कलाकाराने किती मानधन घेतलं? कालीन भैय्या ठरले सर्वात महागडे स्टार

Mirzapur 3 Cast Fees : मिर्झापूर वेब सीरीजसाठी कोणत्या कलाकाराने किती मानधन घेतलं, ते जाणून घ्या.

Mirzapur 3 Actors Fees : ओटीटी प्लॅटफॉर्मवर नुकतीच प्रदर्शित झालेली मिर्झापूर 3 वेब सीरीज चाहत्यांच्या पसंतीला उतरताना दिसत आहे. ॲमेझॉन प्राईमवर 5 जुलैपासून ही वेब सीरीज प्रदर्शित झाली आहे. अनेक लोक नव्या सीझनसह जुने दोन सीझनही बिंज वॉच करताना दिसत आहेत. मिर्झापूर सीझन 3 ची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत होते. आता अखेरीस ही बहुप्रतिक्षित वेब सीरीज चाहत्यांची भेटीला आली आहे.

मिर्झापूरसाठी कोणत्या कलाकाराने किती मानधन घेतलं?

मिर्झापूर वेब सीरीजचा यंदाचा हा तिसरा सीझन असून याआधीचे दोन्ही सीझन सुपरहिट ठरले होते. त्यामुळे चाहत्यांना मिर्झापूरच्या तिसऱ्या सीझनकडून खूप अपेक्षा होत्या. आता नव्याने आलेल्या मिर्झापूर 3 बाबत अनेक जण सोशल मीडियावर कमेंट करत त्यांना या सीझनमध्ये काय आवडलं हे सांगत आहेत. दरम्यान, या चित्रपटासाठी प्रत्येक कलाकाराने किती मानधन घेतलं आहे, असा प्रश्न अनेकांना पडला आहे. तुम्हालाही हा प्रश्न पडला असेल, तर याचं उत्तर जाणून घ्या.

मिर्झापूर वेब सीरीजसाठी कलाकाराचं मानधन

रसिका दुग्गल (Rasika Dugal Mirzapur 3 Fees)

मीडिया रिपोर्ट्सनुसार, मिर्झापूर वेब सीरिजमध्ये तेजस्वी अभिनेत्री रसिका दुग्गल बीना त्रिपाठीच्या भूमिकेत दिसली आहे. रसिका दुग्गलला मिर्झापूर 2 च्या एका एपिसोडसाठी 2 लाख रुपये मानधन मिळालं होतं, तर यावेळी मिर्झापूर 3 मध्ये रसिकाला प्रत्येक एपिसोडसाठी सुमारे 5 लाख रुपये फी देण्यात आल्याचं सांगितलं जात आहे.

श्वेता त्रिपाठी (Shweta Tripathi Mirzapur 3 Fees)

बॉलिवूड चित्रपट आणि वेब सीरिजमध्ये आपल्या अभिनयाचा चाहत्यांच्या मनावर वेगळी छाप पाडलेली अभिनेत्री म्हणजे श्वेता त्रिपाठी. मिर्झापूर वेब सीरिजमध्ये श्वेता त्रिपाठी गोलूची भूमिका साकारत आहे. श्वेताला मिर्झापूर वेब सीरीजमुळे नवी ओळख मिळाली. मीडिया रिपोर्टनुसार, मिर्झापूर 2 वेब सीरीजच्या एका एपिसोडसाठी श्वेता त्रिपाठीला सुमारे 2.20 लाख रुपये देण्यात आले होते, तर मिर्झापूर 3 साठी तिला प्रत्येक एपिसोडसाठी सुमारे 4 लाख रुपये मानधन देण्यात आलं आहे.

अली फजल (Ali Fazal Mirzapur 3 Fees)

अली फजलला मिर्झापूर 2 च्या प्रत्येक एपिसोडसाठी सुमारे 12 लाख रुपये फी मिळाली होती, तर यावेळी त्याला मिर्झापूर 3 साठी प्रति एपिसोड सुमारे 15 लाख रुपये दिले गेल्याचं मीडिया रिपोर्टनुसार सांगितलं जात आहे..

पंकज त्रिपाठी (Pankaj Tripathi Mirzapur 3 Fees)

मिर्झापूर वेब सीरीजमधील  कालिन भैया ही भूमिका खूपच गाजली.  कालिन भैयाची भूमिका साकारणारे ज्येष्ठ अभिनेते पंकज त्रिपाठी यांची कालिन भैयाच्या व्यक्तिरेखेला प्रेक्षकांनी खूप प्रेम दिलं. पंकज त्रिपाठी मिर्झापूरमधील सर्वात महागडे कलाकार ठरले आहेत. मीडिया रिपोर्टनुसार, पंकज त्रिपा यांनी मिर्झापूर 2 साठी सुमारे 10 कोटी रुपये मानधन घेतलं होतं, तर मिर्झापूर 3 साठी त्यांना सुमारे 15 कोटी रुपये फी देण्यात आली आहे.

जीतेंद्र कुमार (Jitendra Kumar Mirzapur 3 Fees)

पंचायत वेब सीरिजमधील सचिवजींची मिर्झापूरमध्ये खास एन्ट्री दाखवण्यात आली आहे. सचिवजींची भूमिका साकारणाऱ्या जीतेंद्र कुमारने मिर्झापूर सीझन 3 साठी प्रति एपिसोड 4-5 लाख रुपये मानधन आकारलं असल्याचं बोललं जात आहे. मात्र, याबाबत अद्याप अधिकृत माहिती समोर आलेली नाही.

महत्त्वाच्या इतर बातम्या :

Mirzapur 3 : 'मिर्झापूर'मध्ये पंचायतमधील सचिवजींची स्पेशल एन्ट्री, जीतू भैयाने किती मानधन घेतलं?

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Donald Trump Narendra Modi: डोनाल्ड ट्रम्प यांच्यासोबत संवाद साधणारे नरेंद्र मोदी पहिले जागतिक नेते ठरले; दोघांमध्ये नेमकं काय बोलणं झालं?
डोनाल्ड ट्रम्प यांच्यासोबत संवाद साधणारे नरेंद्र मोदी पहिले जागतिक नेते ठरले; दोघांमध्ये नेमकं काय बोलणं झालं?
Nashik Crime: विधानसभा निवडणुकीच्या काळात नाशिकमध्ये धक्कादायक प्रकार, बेरोजगार तरुणांच्या मालेगाव मर्चंट बँकेतील खात्यांमध्ये अचानक 125 कोटींची रक्कम जमा
नाशिकमध्ये धक्कादायक प्रकार, 12 बेरोजगार तरुणांच्या बँक खात्यात अचानक 125 कोटींची रक्कम डिपॉझिट
Deepak Kesarkar : ज्याला Today आणि Tomorrow मधील फरक कळत नाही असा माणूस माझ्याविरोधात उभा : दीपक केसरकर
ज्याला Today आणि Tomorrow मधील फरक कळत नाही असा माणूस माझ्याविरोधात उभा : दीपक केसरकर
वर्ध्यातील स्टील कंपनीत भीषण स्फोट, 17 कामगार जखमी; गंभीर जखमींना नागपूरला हलवले
वर्ध्यातील स्टील कंपनीत भीषण स्फोट, 17 कामगार जखमी; गंभीर जखमींना नागपूरला हलवले
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Chhatrapati shivaji maharaj Statue : महाराजांच्या पुतळ्याचा मुद्दा विधानसभेच्या प्रचारात तापणार?Constitution And Politics Special Report : एक संविधान दोन नॅरेटीव्ह आणि राजकीय स्पर्धाZero Hour : अमेरिकन निवडणुकीचं सखोल विश्लेषण, भारतावर काय परिणाम होणार ?Sadabhau Khot Special Report : सदाभाऊ खोत यांची पवारांवर टीका,राष्ट्रवादीच्या नेत्यांचं प्रत्युत्तर

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Donald Trump Narendra Modi: डोनाल्ड ट्रम्प यांच्यासोबत संवाद साधणारे नरेंद्र मोदी पहिले जागतिक नेते ठरले; दोघांमध्ये नेमकं काय बोलणं झालं?
डोनाल्ड ट्रम्प यांच्यासोबत संवाद साधणारे नरेंद्र मोदी पहिले जागतिक नेते ठरले; दोघांमध्ये नेमकं काय बोलणं झालं?
Nashik Crime: विधानसभा निवडणुकीच्या काळात नाशिकमध्ये धक्कादायक प्रकार, बेरोजगार तरुणांच्या मालेगाव मर्चंट बँकेतील खात्यांमध्ये अचानक 125 कोटींची रक्कम जमा
नाशिकमध्ये धक्कादायक प्रकार, 12 बेरोजगार तरुणांच्या बँक खात्यात अचानक 125 कोटींची रक्कम डिपॉझिट
Deepak Kesarkar : ज्याला Today आणि Tomorrow मधील फरक कळत नाही असा माणूस माझ्याविरोधात उभा : दीपक केसरकर
ज्याला Today आणि Tomorrow मधील फरक कळत नाही असा माणूस माझ्याविरोधात उभा : दीपक केसरकर
वर्ध्यातील स्टील कंपनीत भीषण स्फोट, 17 कामगार जखमी; गंभीर जखमींना नागपूरला हलवले
वर्ध्यातील स्टील कंपनीत भीषण स्फोट, 17 कामगार जखमी; गंभीर जखमींना नागपूरला हलवले
भाजपाचे बंडखोर स्वत:चेच चिन्ह विसरले; कार्यकर्त्यांना तुतारी वाजविण्याचे आवाहन, लक्षात येताच गोंधळले
भाजपाचे बंडखोर स्वत:चेच चिन्ह विसरले; कार्यकर्त्यांना तुतारी वाजविण्याचे आवाहन, लक्षात येताच गोंधळले
Narendra Modi : राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत विजय मिळवताच नरेंद्र मोदींचा डोनाल्ड ट्रम्प यांना फोन
राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत विजय मिळवताच नरेंद्र मोदींचा डोनाल्ड ट्रम्प यांना फोन
Varsha Gaikwad : 'भारत जोडो' यात्रेत सहभागी झालेल्या लाखो बहुजनांना देवेंद्र फडणवीस नक्षलवादी समजतात का? वर्षा गायकवाडांचा सवाल
'भारत जोडो' यात्रेत सहभागी झालेल्या लाखो बहुजनांना देवेंद्र फडणवीस नक्षलवादी समजतात का? वर्षा गायकवाडांचा सवाल
मोठी बातमी! शेतकऱ्यांचं 3 लाख रुपयापर्यंतचं कर्ज माफ होणार, नियमीत कर्जफेड करणाऱ्यांना 50000 चं प्रोत्साहन मिळणार, शरद पवारांची घोषणा
मोठी बातमी! शेतकऱ्यांचं 3 लाख रुपयापर्यंतचं कर्ज माफ होणार, नियमीत कर्जफेड करणाऱ्यांना 50000 चं प्रोत्साहन मिळणार, शरद पवारांची घोषणा
Embed widget