(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Mirzapur 3 : 'मिर्झापूर'मध्ये पंचायतमधील सचिवजींची स्पेशल एन्ट्री, जीतू भैयाने किती मानधन घेतलं?
Mirzapur 3 Web Series : मिर्झापूर 3 सीझन ओटीटीवर प्रदर्शित झाली आहे. तुम्ही ॲमेझॉन प्राईम या ओटीटी प्लॅटफॉर्मवर मिर्झापूर 3 पाहू शकता.
Mirzapur 3 Jitendra Kumar Fees : बहुप्रतिक्षित मिर्झापूर 3 (Mirzapur 3) वेब सीरीज चाहत्यांच्या भेटीला आली आहे. कालीन भैया आणि गुड्डू भैया यांच्या चाहत्यांची प्रतिक्षा अखेर संपली आहे. ॲमेझॉन प्राईम या ओटीटी प्लॅटफॉर्मवर 5 जुलैपासून मिर्झापूर 3 स्ट्रीमिंग सुरु झालं आहे. चाहत्यांकडून मिर्झापूरला चांगला प्रतिसाद मिळताना दिसत आहे. कालिन भैया आणि गुड्डू भैया पूर्वांचलचं सिंहासन बळकावण्याच्या तयारीत आहेत.
'मिर्झापूर'मध्ये पंचायतमधील सचिवजींची स्पेशल एन्ट्री
मिर्झापूरचा नवीन सीझन रिलीज झाल्यापासून सोशल मीडियावर ट्रेंड करत आहे. लोक विविध प्रतिक्रिया शेअर करत आहेत आणि त्यांना मिर्झापूर सीझन 3 आवडल्याचं सांगत आहेत. यावेळी सीरीजमध्ये फक्त जुने कलाकारच नाहीत तर पंचायत वेब सीरीजमधील खास कलाकारांची एन्ट्रीही पाहायला मिळाली आहे. पंचायत स्टार्सने या मिर्झापूरमधील खास एन्ट्रीसाठी किती मानधन घेतलं आहे, जाणून घ्या.
मिर्झापूर 3 मध्ये जितेंद्र कुमारने किती फी घेतली?
जितेंद्र कुमार पंचायत वेब सिरीजमधील सचिवजी या भूमिकेसाठी लोकांमध्ये प्रसिद्ध आहेत. या सचिवजींच्या भूमिकेने प्रक्षेतांच्या मनामध्ये खास छाप सोडली आहे. जितेंद्र कुमारला कोटा कारखान्याचे जीतू भैय्या म्हणूनही ओळखलं जातं. काही दिवसांपूर्वीच मिर्झापूरच्या गुड्डू पंडित म्हणजेच अली फजलने गौप्यस्फोट करत माहिती दिली होती की, जितेंद्र कुमार मिर्झापूर 3 मध्येही दिसणार आहे. हे समजल्यानंतर चाहते अधिकच उत्सुक होते. जीतेंद्र कुमारने मिर्झापूर सीझन 3 साठी प्रति एपिसोड 4-5 लाख रुपये मानधन आकारलं असल्याचं बोललं जात आहे. मात्र, याबाबत अद्याप अधिकृत माहिती समोर आलेली नाही.
'पंचायत'चे सचिवजी 'मिर्झापूर'मध्ये
पंचायत वेब सीरीजमध्ये जितेंद्र कुमारने एका एपिसोडसाठी चार लाख रुपये मानधन घेतलं आहे. काही दिवसांपूर्वी अली फजलने मुलाखतीदरम्यान मिर्झापूरमधील जितेंद्र कुमारच्या भूमिकेबद्दल खुलासा केला होता. यावेळी त्याने सांगितल होतं की, कालिन भैय्या यांच्या मृत्यूशी संबंधित काही पेपर वर्कसाठी सचिव जी मिर्झापूरमध्ये दिसणार आहेत. अली फजलने जितेंद्र कुमारच्या मिर्झापूरमध्ये हजेरी लावण्याचे संकेत दिले होते.
कसा आहे मिर्झापूरचा नवा सीझन?
गुड्डू पंडितचा गुंडगिरी आता मिर्झापूरची गादी ताब्यात घेण्याच्या मार्गावर आहे. कालिन भैय्याचा मुलगा मुन्ना त्रिपाठी याची गुड्डू पंडितने हत्या केली आहे. जौनपूरचे शरद शुक्ला पूर्वांचलला धरून राहून वडिलांचं स्वप्न पूर्ण करण्याचा प्रयत्न करत आहेत. या सगळ्या गोंधळात कालिन भैय्या पुन्हा एकदा प्रवेश करतो. एकंदरीत ही मालिका मजेशीर असल्याचे बोललं जात असून यावेळी या शोमध्ये स्त्री व्यक्तिरेखादेखील मजेदार आहेत.
महत्त्वाच्या इतर बातम्या :