एक्स्प्लोर
MI 7 Leaked Details: टॉम क्रूझ आणि प्रभासची जोडी जमणार? मिशन इम्पॉसिबल 7 साठी जुळवाजुळव सुरु असल्याची बातमी व्हायरल
सध्या जगभरातून एक पोस्ट व्हायरल होते आहे. त्यानुसार प्रभास टॉम क्रूझसोबत मिशन इम्पॉसिबल म्हणजे एमआय 7 मध्ये दिसणार असल्याच्या चर्चा सुरू झाल्या आहेत.
मुंबई : बाहुबली आणि बाहुबली 2 असे दोन भाग भारतासह जगभरात प्रदर्शित झाले आणि या सिनेमाने इतिहास घडवला. प्रभास हा कलाकार जगभरात पोचला. त्याचं आपलं असं फॅनफॉलोइंग निर्माण झालं. आता त्याची क्रेझ हॉलिवूडमध्येही जाऊन पोचली आहे. म्हणूनच सध्या जगभरातून एक पोस्ट व्हायरल होते आहे. त्यानुसार प्रभास टॉम क्रूझसोबत मिशन इम्पॉसिबल म्हणजे एमआय 7 मध्ये दिसणार असल्याच्या चर्चा सुरू झाल्या आहेत.
गेल्या दोन दिवसांपासून एक पोस्ट व्हायरल होते आहे. ही पोस्ट कुठली आहे, कुणी दिली आहे याबाबत तपशीलात अद्याप माहीती मिळत नाहीय. पण त्यानुसार एमआय 7 चे दिग्दर्शक ख्रिस्तोफर मॅक्येरी यांनी प्रभासची भेटही घेतली आहे. प्रभास आणि पूजा हेगडे राधेश्याम या चित्रपटाचं इटली मध्ये चित्रिकरण करत होते. तेव्हा या चित्रपटाच्या दिग्दर्शकाने प्रभासची भेट घेतल्याचं कळतं. इतकंच नव्हे, तर त्याला एमआय ७ चा स्क्रीन प्लेही ऐकवण्यात आला आहे. टॉम क्रूझ आणि प्रभास ही जोडी या सिनेमात वापरता यावी म्हणून दिग्दर्शकाने यात विशेष रुची घेतल्याचं कळतं. प्रभासकडून मात्र अद्याप या वृत्तावर कोणतंही स्पष्टीकरण आलेलं नाही.
प्रभास बाहुबली नंतर बराच चर्चेत आला. सध्या प्रभासकडे चार मोठे प्रोजेक्ट्स आहेत. यात एक राधेश्याम तर आहेच. दुसरा ओम राऊत दिग्दर्शित करत असलेला आदिपुरूष आहे. सालार हा प्रशांत नील यांचा मोठा सिनेमा आहे. शिवाय अमिताभ बच्चन, दीपिका पडुकोण यांच्यासोबतही तो एक चित्रपट करतो आहे. आमआय७ हा चित्रपट प्रभासने स्वीकारला तर हॉलिवूडच्या आघाडीच्या फळीत प्रभास जाऊन बसेल यात शंका नाही.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
पुणे
महाराष्ट्र
बीड
Advertisement