प्रवीण तरडे साऊथमध्ये खलनायकाच्या रोलमध्ये, फोटो पाहून तुम्हीही म्हणाल... अरारारा... खतरनाक
Pravin Tarde South Movie : मराठमोळा अभिनेता, दिग्दर्शक आणि लेखक प्रवीण तरडे याच्या आगामी चित्रापटाचा लूक (Pravin Tarde New Movie) समोर आलाय.
Pravin Tarde South Movie : मराठमोळा अभिनेता, दिग्दर्शक आणि लेखक प्रवीण तरडे याच्या आगामी चित्रापटाचा लूक (Pravin Tarde New Movie) समोर आलाय. हा चित्रपट मराठी नाही तर दक्षिणेतील चित्रपट आहे. गेल्या अनेक दिवसांपासून प्रवीण तरडे दक्षिणेतील चित्रपटात झळकणार (Pravin Tarde New Movie) आहे, शूटिंग सुरु आहेत, यासारख्या बातम्या येत होत्या. आता अखेर या चर्चांना प्रवीण यांनी पूर्णविराम दिला आहे. प्रवीण तरडेच्या चित्रपटाचा पहिला लूक समोर आलाय. ‘अहो विक्रमार्का’ या आगामी दाक्षणित्य चित्रपटात प्रवीण तरडे प्रमुख खलनायकाच्या भूमिकेत आहे. प्रवीण तरडेनं इन्स्टाग्रामवर पोस्ट शेअर केली आहे. त्यानं चित्रपटातील आपला लूक आणि त्यासोबत खास मेसेजही लिहिलाया.
मराठी व हिंदी सिनेसृष्टीनंतर आता प्रवीण तरडे दाक्षिणात्य चित्रपटसृष्टी गाजवण्यास सज्ज झाला आहे. आगामी ‘अहो विक्रमार्का’ या चित्रपटातून तो प्रेक्षकांचं मनोरंजन करणार आहे. प्रवीण तरडेने इन्स्टाग्रामवर चित्रपटाचे नाव आणि भूमिका जाहीर करत याबाबतची माहिती दिली. प्रवीण तरडे अहो विक्रमार्का चित्रपटामध्ये “ असुरा “ नावाची भूमिका साकारत आहे. तो प्रमुख खलनायक आहे.
प्रवीण तरडेची पोस्ट जशीच्या तशी -
दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीत “ मुख्य खलनायक “ म्हणून माझा प्रवेश .. अहो विक्रमार्का मध्ये “ असुरा “ बनून येतोय तुमच्या भेटीला…मराठी बरोबर भारतातल्या सहा भाषांमधे चित्रपट येत आहे. अख्ख्या भारतभर मार्केट आता आपलं आहे.
पाहा प्रवीण तरडेची पोस्ट -
View this post on Instagram
‘अहो विक्रमार्का’ या चित्रपटामध्ये दक्षिणेतील सुपरस्टार अभिनेता देव गिल प्रमुख भूमिका साकारणार आहे. या चित्रपटात प्रवीण तरडे यांच्यासह तेजस्विनी पंडित, सयाजी शिंदे, चित्रा शुक्ला अशा दिग्गज कलाकारांची मांदियाळी आहे. दरम्यान, प्रवीण तरडेंनी ‘अहो विक्रमार्का’ चित्रपटातील आपला पहिला लूक शेअर केल्यावर त्याच्यावर सोशल मीडियातून कौतुकाचा वर्षाव करण्यात येत आहे.
आजवर मराठी सिनेसृष्टीत प्रवीण तरडे यांनी महत्त्वपूर्ण कामगिरी केली आहे. इतकंच नव्हे तर मराठीसह हिंदी सिनेसृष्टीतही छाप पाडली आहे. आजवर नाटक, मालिका, चित्रपट व वेबसीरिज या माध्यमांमधून अभिनयाने प्रेक्षकांची मन जिंकली. अभिनयाबरोबरच लेखन आणि दिग्दर्शनातूनही प्रेक्षकांच्या मनात घर केलेय. ‘मुळशी पॅटर्न’, ‘देऊळ बंद’, ‘धर्मवीर’ या चित्रपटांच्या दिग्दर्शनाची धुरा उत्तमरीत्या पेलवली.