Bollywood Kissa: साऊथची 'ती' अभिनेत्री, जिनं पहिल्याच चित्रपटात पटकावलेला नॅशनल अवॉर्ड; अक्षय कुमारलाही वाटलेली लाज, कोण आहे ती?
Malyalam Actress Surabhi Lakshmi: आपल्या पहिल्याच चित्रपटातून राष्ट्रीय पुरस्कार मिळवून अक्षय कुमारला शरमेनं मान खाली झुकवायला लावली होती, ती दाक्षिणात्य अभिनेत्री आहे तरी कोण?
Malyalam Actress Surabhi Lakshmi: बॉलिवूडचा (Bollywood) खिलाडी अक्षय कुमार (Akshay Kumar) आपल्या स्टंटसाठी ओळखला जातो. अक्षयचे देश-विदेशाच लाखो चाहते आहेत. जेव्हा अक्षय कुमारला राष्ट्रीय पुरस्कार (National Award) मिळालेला, तेव्हा तो त्याच्या एका चाहतीला भेटला होता. पण, त्यावेळी तिच्यासोबत झालेल्या संभाषणानंतर त्याची मान शरमेनं झुकल्याचं पाहायला मिळालं होतं. नेमकं काय घडलेलं पाहुयात सविस्तर...
अक्षय कुमारनं 1991 मध्ये बॉलिवूडमध्ये प्रवेश केला. आजही तो धमाकेदार चित्रपट करतोय. त्याच्या ॲक्शन्सनी सर्वांना आश्चर्यचकित केलं. 2017 मध्ये 'रुस्तम' चित्रपटासाठी अक्षय कुमारला राष्ट्रीय पुरस्कार मिळाला होता. मात्र, या कार्यक्रमात त्याचा अपमान करण्यात आला होता. तेही नवख्या अभिनेत्रीकडून. याबाबत दुसरं तिसरं कुणी नाहीतर, खुद्द अक्षय कुमारनं सांगितलेली. अभिनेत्रीला अक्षय कुमारनं एक प्रश्न विचारला, ज्यावर तिनं जे उत्तर दिलं, ते ऐकून अक्षय कुमारची मान शरमेनं खाली झुकली.
पदार्पणाच्या चित्रपटासाठी राष्ट्रीय पुरस्कार पटकावणारी, ही अभिनेत्री कोण?
अक्षय कुमारनं 'आज तक'च्या एका कार्यक्रमात बोलताना सांगितलं होतं की, ज्यावेळी त्यानं राष्ट्रीय पुरस्कार स्विकारला आणि तो जाऊन आपल्या जागेवर बसला. त्यावेळी तिथे त्याला भेटायला एक तरुणी आली. अक्षयजवळ येऊन ती म्हणाली, सर मी तुमची खूप मोठी फॅन आहे. त्यावेळी अक्षयनं तिच्याशी हसत हसत संवाद साधला. अक्षयनं बोलताना सांगितलेलं ती एक मल्याळम अभिनेत्री होती. अक्षयनं सांगितलं की, त्यावेळी मला फार गर्व वाटत होता की, मला राष्ट्रीय पुरस्कार मिळाला आहे. मी खूप आनंदात होतो. त्यावेळी तिनं मला विचारलं की, आजवर किती चित्रपट केलेत? मी सांगितलं तिला, साधारण 135 च्या आसपास... त्यानंतर मी तिला विचारलं की, तू किती चित्रपट केलेत? त्यावेळी ती म्हणाली की, "सर ही माझी पहिली फिल्म आहे." ते ऐकून मात्र माझ्या पायाखालची जमीन सरकली. कारण तिनं पहिल्याच चित्रपटात राष्ट्रीय पुरस्कार पटकावला होता. मला फारच विचित्र वाटलं होतं, असं अक्षय कुमार म्हणाला.
View this post on Instagram
अनुराग कश्यपसोबत करतेय चित्रपट
अक्षय कुमारला ज्या अभिनेत्रीच्या उत्तरानं मान झुकवावी लागली होती. तिचं नाव आहे, सुरभी लक्ष्मी (Surbhi Laxmi). गुणी मल्याळम कलाकारांमध्ये सुरभी लक्ष्मीचं नाव आवर्जुन घेतलं जातं. सध्या सुरभी लक्ष्मी हिंदी चित्रपट निर्माता अनुराग कश्यपसोबत मल्याळम चित्रपट 'रायफल क्लब'मध्ये काम करत आहे.
सुरभी लक्ष्मी मल्याळम अभिनेत्री आहे. मिनामिनुंगु (2016) या चित्रपटासाठी तिला सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला. तिनं 2014 मध्ये विपिन सुधाकरसोबत लग्न केलं, पण तीन वर्षांनी तिचा घटस्फोट झाला. यासाठी काही वैयक्तिक कारणं कारणीभूत असल्याचं बोललं जातं. 2005 पासून सिनेसृष्टीत सक्रिय असलेल्या सुरभीनं आजवर अनेक दमदार भूमिका साकारल्या आहेत. सुरुवातीची काही वर्ष सुरभीच्या वाट्याला फक्त साईड रोल येत होते. पण, 2016 मध्ये सुरभीचं नशीब खऱ्या अर्थानं चमकलं. 2016 मध्ये प्रदर्शित झालेल्या त्या चित्रपटात ती मुख्य भूमिकेत झळकली होती. तेव्हापासूनच तिच्या करिअरला वेगळं वळण मिळालं.
महत्त्वाच्या इतर बातम्या :