Marco 13 Days Box Office Collection: 'पुष्पा 2' ऐवजी बॉक्स ऑफिसवर सध्या 'या' साऊथ फिल्मचा बोलबाला; फक्त 13 दिवसांत वसुल केलं बजेट; कमावला कोट्यवधींचा गल्ला!
Marco Box Office Collection Day 13: बॉक्स ऑफिसवर राज्य करत असलेल्या 'पुष्पा 2' ची प्रचंड कमाई सुरू असतानाच, आणखी एक साऊथ फिल्म 'मार्को'नं बेबी जॉनला खूप मागे सोडलं आहे.
Marco 13 Days Box Office Collection: जगभरात नवं वर्षाचं दिमाखात स्वागत करण्यात आलं आहे. नव्या वर्षात मनोरंजन क्षेत्रात मात्र, जिथे तिथे फक्त आणि फक्त 'पुष्पा 2'च्याच चर्चा आहेत. पुष्पा 2 (Pushpa 2 The Rule) अजूनही बॉक्स ऑफिसवर (Box Office) राज्य करत असल्याचं पाहायला मिळतंय. तर, काही नवे चित्रपट थिएटरमध्ये दाखल झाले आहेत. पण, पुष्पा 2 नंतर ज्या चित्रपटाची सर्वाधिक चर्चा रंगली आहे, ती देखील एक साऊथची फिल्म आहे. नुकत्याच प्रदर्शित झालेल्या वरुण धवनच्या बेबी जॉनला मागे टाकत साऊथचा अॅक्शन थ्रिल चित्रपट मार्को सध्या बॉक्स ऑफिस गाजवत आहे. रिलीज झाल्यनंतर काहीच दिवसांत मार्कोनं बॉक्स ऑफिसवर आपली पकड मजबूत केली आहे. रिलीजनंतर फक्त 13 दिवसांतच आपलं बजेट वसूल केलं आहे.
आश्चर्याची गोष्ट म्हणजे, रिलीज झाल्यापासून बॉक्स ऑफिसचा ताबा घेतलेला अल्लू अर्जुनचा चित्रपट पुष्पा 2 केवळ 14 कोटींची कमाई करू शकला, तर मार्कोनं 13 दिवसांत दुप्पट कमाईचा आकडा पार करत चित्रपटाला मागे टाकलं आहे. बॉक्स ऑफिस ट्रॅकर सॅकनिल्कनं दिलेल्या माहितीनुसार, मार्कोचं बजेट 30 कोटी रुपये आहे. 13 दिवसांत चित्रपटाचं कलेक्शन 42.15 कोटींवर पोहोचलं आहे. यामध्ये चित्रपटानं मल्याळममध्ये 36.67 कोटी रुपये, हिंदीमध्ये 4.33 कोटी रुपये आणि तेलुगूमध्ये 1.15 कोटी रुपयांचे कलेक्शन केलं आहे. या चित्रपटाचा जगभरातील आकडा 45 कोटींच्या जवळ पोहोचला आहे.
View this post on Instagram
13 दिवसांच्या कलेक्शनचा आकडा पाहिला तर, 4.3 कोटींची दमदार ओपनिंग फिल्मनं बॉक्स ऑफिसवर केली होती. दुसऱ्या दिवशी 4.65 कोटी, तिसऱ्या दिवशी 5.2 कोटी, चौथ्या दिवशी 3.9 कोटी, पाचव्या दिवशी 3.5 कोटी, सहाव्या दिवशी 3.5 कोटी, सातव्या दिवशी 2.55 कोटी, आठव्या दिवशी 2.3 कोटी, नवव्या दिवशी 2.7 कोटी, दहाव्या दिवशी 3.1 कोटी, अकराव्या दिवशी 1.6 कोटी, बाराव्या दिवशी 1.35 कोटी आणि तेराव्या दिवशी 3.5 कोटींची कमाई केली आहे. विशेष बाब म्हणजे, सुरुवातीला मार्कोटं हिंदीमधील कलेक्शन 2 किंवा 3 लाखांवर होतं. पण, जसजसे दिवस गेले तसतसं ते, 85 लाखांवर पोहोचलं आहे. जर पुष्पा 2 बाबात बोलायचं झालं तर, मल्याळम भाषेत 14.14 कोटींचा गल्ला केला आहे.
दरम्यान, 20 डिसेंबर रोजी रिलीज झालेला अभिनेता उन्नी मुकुंदनची अॅक्शन थ्रिलर फिल्म मार्को मलयालम भाषेतील फिल्म आहे, जी हनीफ अडेनीनं दिग्दर्शित केली आहे. यामध्ये सिद्दीकी, जगदीश, अभिमन्यु एस थिलाकन, कबीर दुहान सिंह, एंसन पॉल आणि युक्ति तरेजा मुख्य भूमिकेत दिसून आले आहेत.
महत्त्वाच्या इतर बातम्या :