Vaastav Movie : 'वास्तव'च्या मराठी रिमेकमध्ये कोणाला पाहायला आवडेल? महेश मांजरेकर म्हणाले 'मी लगेच सिद्धार्थचं...'
Vaastav Movie : महेश मांजरेकर यांनी अभिनेता सिद्धार्थ जाधवचं महेश मांजरेकर यांनी तोंडभरुन कौतुक केलं असल्याचं पाहायला मिळालं आहे.
Vaastav Movie : बॉलीवूडमधला वास्तव (Vaastav) हा सिनेमा आजही प्रेक्षकांच्या पसंतीस उतरतो. दिग्दर्शक म्हणून महेश मांजरेकर (Mahesh Manjrekar) यांनी पदार्पणासाठी याच बॉलीवूड (Bollywood) सिनेमाची निर्मिती केली. संजय दत्तसह अनेक कलाकार या सिनेमात झळकले होते. 1999 मध्ये रिलीज झालेला हा सिनेमा रिलीज होऊन 24 ते 25 वर्षे झाली आहेत. पण हा सिनेमा मराठीत झाला तर त्यामध्ये कोणाला पाहायला आवडेल याविषयी महेश मांजरेकरांनीच खुलासा केला आहे.
लोकशाही मराठीला दिलेल्या मुलाखतीमध्ये महेश मांजरेकरांनी याविषयी भाष्य केलं आहे. त्यामुळे जर हा सिनेमा झाला तर कोणत्या अभिनेत्याची या सिनेमात वर्णी लागणार याचं उत्तर अखेर सापडलं आहे. तसेच महेश मांजरेकरांनी अभिनेत्याचं नाव घेत त्याचं तोंडभरुन कौतुक देखील केलं आहे.
महेश मांजरेकरांनी कोणत्या अभिनेत्याचं नाव घेतलं?
वास्तवचा रिमेक झाल्यास कोणत्या अभिनेत्याला पाहायला आवडेल? या प्रश्नाचं उत्तर देताना महेश मांजरेकर यांनी म्हटलं की, आपल्या मराठीमध्ये सगळेच नट चांगले आहेत. पण कुणीही विचारलं तर माझ्या डोक्यामध्ये लगेच सिद्धार्थ जाधवचं नाव येईल. कारण तो फक्त कॉमेडी करत नाही. जेव्हा त्याची लालबाग परळसारख्या सिनेमामध्ये निवड झाली होती, त्यावेळी अनेकांनी सांगितलं की त्याला घेणं रिस्की आहे. पण त्या पात्रासाठी इंटेन्स रोल तो चांगला निभावेल या गोष्टीची मला खात्री होती. कारण तो वर्सटाईल नट आहे.
View this post on Instagram
वास्तव हा सिनेमा 1999 साली ऑक्टोबर महिन्यात रिलीज करण्यात आला होता. या सिनेमात संजय दत्त, नम्रता शिरोडकर, संजय नार्वेकर यांच्यासह मोहनीश बहल, परेश रावल, रिमा लागून आणि शिवाजी साटम हे देखील महत्त्वाच्या भूमिकांमध्ये होते. पण या सिनेमाचा मराठीत रिमेक होणार का याची उत्सुकता सध्या प्रेक्षकांना लागून राहिली आहे.